AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : पीकविम्यासाठी शेतकरी पुत्रांचा लढा, आसूड मोर्चानंतर लागणार का प्रश्न मार्गी?

कविमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झालेला आहे. असे असतानाही त्यांच्यावर कारवाई न करता वेळकाढूपणा केला जात आहे. पीकविमा कंपन्या ह्या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करतात. शिवाय रखडलेल्या पीकविमा संदर्भात विमा कंपन्यांकडून तक्रारही ऐकूण घेत नाही.

Beed : पीकविम्यासाठी शेतकरी पुत्रांचा लढा, आसूड मोर्चानंतर लागणार का प्रश्न मार्गी?
रखडलेल्या पीकविमा मिळावा या मागणीसाठी बीड मघ्ये जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ककरण्यात आले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 27, 2022 | 2:24 PM
Share

बीड : ज्या पीकविमा पॅटर्नचा उल्लेख आज राज्यभर केला जात आहे त्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2019-20 च्या कालावधीतील (Crop Insurance) पीकविम्याची प्रतिक्षा कायम आहे. (Beed District) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी शेतकरी पुत्रांनी लढा उभा केला आहे. गेल्या 6 महिन्यापासून विविध माध्यमातून या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या (District District Administration) जिल्हा प्रशासनासमोर मांडलेल्या आहेत. मात्र, अद्यापही यश हे मिळालेले नाही. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी शेतकरी पुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढला आहे. त्यामुळे किमान आता तरी त्यांच्या मागण्या मान्य होणार का हे पहावे लागणार आहे. रखडलेल्या पीकविम्यासाठी गावस्तरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलने पार पडली पण यश हे मिळालेलेच नाही.

आसूड घेऊन शेतकरी पूत्र जिल्हाधिकारी कार्यालयात

पीकविमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झालेला आहे. असे असतानाही त्यांच्यावर कारवाई न करता वेळकाढूपणा केला जात आहे. पीकविमा कंपन्या ह्या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करतात. शिवाय रखडलेल्या पीकविमा संदर्भात विमा कंपन्यांकडून तक्रारही ऐकूण घेत नाही. आता 3 वर्षानंतरही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 च्या खरिपातील विमा रकमेचे वेध लागले आहेत.

असा हा शेतकरी पुत्रांचा लढा

विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत म्हणून हक्काच्या पैशासाठी शेतकऱ्यांच्या पुत्रांनी बीडमध्ये लढा सुरु केला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यासांठी संघर्ष सुरु आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रखडलेला पीकविमा तात्काळ मिळावा आणि शेतकऱ्यांची भारनियमनातून सुटका करावी, या मागणी करिता शेतकरी पुत्रांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढला होता. यापूर्वी देखील बीडच्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं, आक्रोश मोर्चा काढला तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळेच बुधवारी आसूड मोर्चा काढून शेतकरी पुत्रांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

अन्यथा आंदोलन अधिक तीव्र

यंदाच्या खरीप हंगामापूर्वीच रखडलेल्या विम्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शेतकऱ्यांना यंदाचा विमाच भरला जाणार नाही. शेतकऱ्यांना हक्काच्या पैशापासून दूर रहावे लगात आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या या समस्या असतानाच दुसरीकडे महावितरणननेही अडचणीत वाढ केली आहे. त्यामुळे रब्बी पिकांची जोपासणा करायची असेल तर ग्रामीण भागातील भारनियमन कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी