‘ड्रोन’ च्या वापराने शेती क्षेत्राला मिळणार चालना, डिजीटल कृषी मिशनवर लक्ष केंद्रीत करा : कृषीमंत्री तोमर

कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारने सुरु केलेल्या डिजीटल कृषी मिशनवर देखील लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. कृषी मंत्रालयाने डिजिटल शेती विकसीत करण्यासाठी खासगी क्षेत्राशी सामंजस्य करार केला आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि त्यांना सर्व प्रकारे फायदा करून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे.

'ड्रोन' च्या वापराने शेती क्षेत्राला मिळणार चालना, डिजीटल कृषी मिशनवर लक्ष केंद्रीत करा : कृषीमंत्री तोमर
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 4:54 PM

मुंबई : शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी (Centre Government) केंद्र सरकार नवनवे प्रयोग करीत आहे. त्या अनुशंगानेच कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारने सुरु केलेल्या डिजीटल कृषी मिशनवर देखील लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. कृषी मंत्रालयाने डिजिटल शेती विकसीत करण्यासाठी खासगी क्षेत्राशी सामंजस्य करार केला आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि त्यांना सर्व प्रकारे फायदा करून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे.

गुरुवारी क्रॉपलाइफ इंडियाच्या (CLI) 41 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान “अॅग्रोकेमिकल सेक्टरचा प्रवास” या विषयावर तोमर यांनी मार्गदर्शन केले. तोमर म्हणाले की, सीएलआय संयुक्तपणे 70 टक्के पीक संरक्षण (Pik Sanrakshan) बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करते. 95 टक्के रेणू देशात आणण्यात सीएलआय ची भूमिका महत्वाची आहे.

सीएलआय सदस्य कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत शिवाय जागतिक स्तरावर संशोधन आणि विकासावर वार्षिक 6 अब्ज डॉलर्स खर्च करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नाविण्यपूरर्ण प्रयोग हे करता येणार आहेत.

कृषी रसायनांच्या उत्पादनात भारत चौथ्या क्रमांकावर

भारत हा कृषी रसायनांच्या उत्पादनात चौथ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्राची क्षमता लक्षात घेता सरकारने कृषी रासायनिक क्षेत्राचा आवाखा वाढविण्यात आला आहे. ज्यामुळे भारत जागतिक पुरवठ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे. नाविन्य उपक्रम, नोंदणी प्रणालीला गती देणे, लवकर पीक संवर्धन करून डिजिटायझेशन मोहीम यांमध्ये रासायनिक क्षेत्राचे नेतृत्व करण्याची मोठी क्षमता आहे.

तोमर म्हणाले की, कोव्हिड-19 हे अभूतपूर्व जागतिक संकट आहे, या युगातही कृषी क्षेत्र लक्षात घेऊन सरकारने घेतलेल्या भुमिकेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. कोव्हिडने संकटाबरोबरच नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रयोग शिकण्याची आणि अंमलबजावणी करण्याची संधी दिली आहे. कृषी क्षेत्रानेही (कृषी क्षेत्र) शेतकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे कौशल्य आणि सरकारच्या प्रयत्नांनी लॉकडाऊन दरम्यान प्रगती केली असल्याचे तोमर यांनी स्पष्ट केले.

कृषी सुधारणांचा फायदा होईल

कृषी सुधारणा कायद्यांचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. उच्च एमएसपी, रोख रकमेची उपलब्धता आणि शेतकऱ्यांना वाटेल त्या ठिकाणी उत्पादने विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. शिवाय कंत्राटी शेती यांसारखे कृषी सुधारणांचे (नवीन कृषी कायदे) निर्णय हे परिवर्तनकारी आहेत. ज्यामुळे कृषी क्षेत्र अधिक स्पर्धात्मक निर्माण होऊन शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कोव्हिड संकटामुळे अनेक देश उत्पादनात विविधता आणण्याचा आणि पुरवठा साखळीत नाविन्य उपक्रम राबवण्याची प्रयत्न करीत आहेत. भारताला या बदलाचा फायदा घेण्याची संधी आहे.

तोमर म्हणाले की, अचूक शेतीमुळे कार्यक्षमता तर वाढेलच पण शेती अधिक फायदेशीर होईल. ज्यामुळे भारताच्या विकास वाढण्यास मदत होणार आहे. क्रॉपलाइफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. के. रवी, पीआय इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सलील सिंघल आणि रॅलिस इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील सिंघल यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असित्वा सेन यांनीही उपस्थितांना संबोधित केले. (Agriculture Minister Tomar confident that state-of-the-art technology will benefit agricultural development)

संबंधित बातम्या :

उशीरा पेरणी झालेले सोयाबीन पडेल पदरात, काढणीची अशी घ्या काळजी

व्यथा शेतकऱ्यांच्या : पाऊस अन् पुरामुळे कांद्याचा ‘वांदा’ ; लागवडीपूर्वीच रोप उध्वस्त

सोयाबीनची आवकही घटली ; दरही स्थिर, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.