AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यथा शेतकऱ्यांच्या : पाऊस अन् पुरामुळे कांद्याचा ‘वांदा’ ; लागवडीपूर्वीच रोप उध्वस्त

यंदा मात्र, पावसामुळे कांद्याच्या रोपाचेच नुकसान झालेले आहे. त्यामुळे लागवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी कांद्याला पसंती देतात परंतू, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दोन्हा हंगामाला मुकणार आहे.

व्यथा शेतकऱ्यांच्या : पाऊस अन् पुरामुळे कांद्याचा 'वांदा' ; लागवडीपूर्वीच रोप उध्वस्त
पावसामुळे कांदा रोपाचे झालेले नुकसान
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 3:20 PM
Share

लातूर : दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांना तर बसलेला आहेच शिवाय कांद्याचे तर लागवडीपूर्वीच नुकसान झाले आहे. खरीप हंगाम संपताच कांद्याच्या लागवडीची लगबग ही सुरु होते. यंदा मात्र, पावसामुळे कांद्याच्या रोपाचेच नुकसान झालेले आहे. त्यामुळे लागवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी कांद्याला पसंती देतात परंतू, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दोन्ही हंगामाला मुकणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसमोरील समस्या ह्या कायम आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. शिवाय अजूनही पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. खरीपाबरोबरच कांद्याचे नुकसान होत आहे. नाशिक जिल्ह्यात योग्य दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. पावसाचे पाणी कांदा चाळीत शिरल्याने नुकसान झाले आहे तर दुसरीकडे खरीपातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी रोपाची लागवड केली होती. मात्र, पाऊस आणि पुरामुळे या रोपाचेही नुकसान झालेले आहे.

रोप लागवडी योग्य राहिलेले नाही. शेतकऱ्यांची मेहनत आणि खर्च वाया गेला आहे. निकृष्ट रोपामुळे कांद्याच्या पेरणीवर परिणाम होईल. भविष्यात ग्राहकांवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परिणाम होईल. दहा दिवसांनी कांदा रोपाची लागवड करायची होती, पण पूर आणि पावसामुळे तयार केलेले शेताचेही नुकसान झाले आहे तर रोपही नष्ट झाले आहे.

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघाळे म्हणाले की, खरीप हंगामातील कांद्याची रोपांची जोपासना ही गेल्या महिन्याभरापासून केली होती. पुढील आठवड्यापासून ते लावले जाणार होते परंतु आता शेती आणि रोप दोन्ही खराब झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी (शेतकरी) 2000 ते 2500 रुपये किलो दराने कांदा बियाणे खरेदी करून लागवड केली होती. पण या नुकसानीमुळे खरीप हंगामातील कांद्याच्या लागवडीवर त्याचा परिणाम होणार आहे. ज्यांच्याकडे कांद्याचे शिल्लक रोप आहे त्याचाच आधार इतर शेतकऱ्यांना घ्यावा लागणार आहे.

या जिल्ह्यात अधिकचे नुकसान

मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस अधिक झाला आहे. त्यामुळे बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि लातूर इत्यादी भागातील नर्सरीचे खूप नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रोप आता लावणे योग्य राहिलेले नाही. दुसरीकडे नाशिक, अहमदनगर, धुळे, सोलापूर आणि जळगावमध्येही नुकसान झाले आहे. जळगावचे शेतकरी विशाल प्रभाकर म्हणाले की, त्यांची कांदा नर्सरी पूर्णपणे उध्वस्त झालेली आहे. शिवाय एप्रिल पासून साठवून ठेवलेल्या कांद्याचेही पावसामुळे खराबी झालेली आहे.

शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या व्यथा

पावसामुळे साठवण केलेला कांदा हा सडलेला आहे. त्यामुळे त्याचा दरावर परिणाम तर होणारच आहे पण व्यापारी कांदा खरेदीसाठी फिरकानाही झाले आहेत. एकतर साठवणूक कलेल्या पीकाचे नुकसान पुन्हा 10 दिवसावर लागवड करण्यायोग्य रोपाचे नुकसान. शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले असून खरीपाबरोबरच नगदी पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या कांद्याचाही वांदा झाल्याची भावना बीडते शेतकरी अमोल तांदळे यांनी व्यक्त केली आहे. (Rain and floods halt onion cultivation, double loss to farmers)

संबंधित बातम्या :

72 तासानंतरही पिक पाण्यात, कसा करणार नुकसानीचा दावा ? काय आहे पर्याय

जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य सरकारचे हजारोंचे अनुदान, असा करा अर्ज

कधी ढगफुटी, कधी दुष्काळ, शेतीचं मोठं नुकसान टाळण्यासाठी पठ्ठ्याने स्वत:च शेतात हवामान केंद्र उभारलं!

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.