AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या पिकाला मिळतो हमीभाव, परंतु कारखानदारांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान

शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी नेहमीच अडचणीत सापडतो, तर एकमेव उसाचा पिकाला एफआरपी प्रमाणे दर दिला जातो. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळतात.

या पिकाला मिळतो हमीभाव, परंतु कारखानदारांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान
ऊसतोड मुकादमाकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे 445 गुन्हे दाखलImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 05, 2023 | 2:08 PM
Share

कुणाल जयकर, अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतकरी (ahmadnagar farmer) अडचणी सापडला आहे. तर पिकांना हमीभाव मिळावा, ही मागणी गेल्या काही दिवसापासून शेतकरी करत आहे. मात्र सरकारकडून (maharashtra government) यावर आश्वासनाच्या पलीकडे कोणताही उपाय सुचविला जात नाही. तर ऊस हे एकमेव पीक आहे की, त्या पीकाचे शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे पैसे मिळतात. मात्र कारखानदार हे हमीभावाप्रमाणे पैसे देत नसल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं आहे.

शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी नेहमीच अडचणीत सापडतो, तर एकमेव उसाचा पिकाला एफआरपी प्रमाणे दर दिला जातो. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळतात. राज्यातील अनेक जिल्ह्यात उसाचं मोठं उत्पादन घेतलं जातं. अहमदनगर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आढळून येतात. तर राज्यात सहकाराची पंढरी म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतात.

मात्र गेल्या काही दिवसांपासून योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. नगदी पीक म्हणून उसाच पीक अतिशय महत्त्वाचं आहे. तर उसाच्या दराला कायदेशीर संरक्षण आहे, त्यामुळे बहुतांश शेतकरी ऊस पिक घेण्यास प्राधान्य देतात. मात्र एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत चाललेला आहे. जे कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे भाव देणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते, मात्र प्रत्यक्षात तसं केलं जात नाही असा आरोप शेतकरी अनिल देठे पाटील यांनी केला आहे.

राज्यातील बहुतांश राजकारण आणि अर्थकारण साखर कारखान्यावर अवलंबून आहे. तसेच साखर सम्राटांची लॉबी असल्याने त्यांचा राज्यकर्त्यांवर दबाव असतो. त्यामुळे सर्व साखर कारखानदार मिळून उसाचे दर ठरवतात त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसतो. तर जेवढा खर्च ऊस पिकाला करावा लागतो. किमान त्यावर आम्हाला 25% तरी नफा मिळावा अशी मागणी शेतकरी करतात. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाला सामोरे जात आहे अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहेय

उसाच्या लागवडीपासून मशागतीपर्यंत शेतकऱ्यांना खर्च…

उसाच्या पिकाचा संपूर्ण कालावधी दहा ते बारा महिन्यापर्यंत असतो. शेतकऱ्यांना एकरी उसाचा पीक घ्यायचं असेल तर उसाच्या लागवडीपासून मशागतीपर्यंत शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. सध्या रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. मजुरांची मजुरी, मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागते.संपूर्ण बारा महिने उसाच्या पिकाकडे लक्ष द्यावे लागते. एवढं करून वर्षभरात एकरी दोन ते अडीच लाख रुपये पर्यंत खर्च येतो.

शेतकऱ्यांसाठी ऊस हे आशादायक पीक आहे. मात्र त्यावर देखील शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावी लागतात.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.