ऑक्सिजन घेणारा आणि सोडणारा एकमेव पशू म्हणजे गाय: अलाहाबाद हायकोर्ट

गाईच्या दुधापासून तयार केलेले पंचगव्य, त्यातून तयार केलेले दही, तूप, मूत्र आणि शेण हे अनेक असाध्य रोगांवर गुणकारी ठरतात, असं देखील कोर्टाच्या वतीनं म्हटलं गेलं.

ऑक्सिजन घेणारा आणि सोडणारा एकमेव पशू म्हणजे गाय: अलाहाबाद हायकोर्ट
गाय

नवी दिल्ली: गाय हा एकमेव प्राणी आहे जो ऑक्सिजन घेतो आणि सोडतो, असा शास्त्रज्ञांना विश्वास असल्याची टिप्पणी अलाहाबाद हायकोर्टानं बुधवारी एका प्रकरणात केली आहे. गाईच्या दुधापासून तयार केलेले पंचगव्य, त्यातून तयार केलेले दही, तूप, मूत्र आणि शेण हे अनेक असाध्य रोगांवर गुणकारी ठरतात, असं देखील कोर्टाच्या वतीनं म्हटलं गेलं. न्यायमूर्ती शेखऱ कुमार यादव यांनी याचिकाकर्ता जावेदचा जामीन याचिका फेटाळताना हे भाष्य केलं. फिर्यादी खिलेंद्र सिंहची गाय चोरून त्याची हत्या केल्याचा जावेद आणि इतर सहकाऱ्यांवर आरोप आहे.

न्यायालयाकडून विविध दाखले

न्यायालयाने त्यांच्या निर्णयात म्हटले आहे की, “हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 देवतांचे वास्तव्य असल्याचं मानलं जातं. ऋग्वेदात गायीला अघन्या, यजुर्वेदात गायीला गौर अनुपमेय आणि अथर्ववेदात संपत्तीचं घर म्हटलं गेलं आहे. भगवान श्रीकृष्णांना सर्व ज्ञान गायींकडून मिळालं असल्याचा उल्लेख करण्यात आला.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते की तुम्ही मला मारले तरी गाईवर हात उगारू नका. पंडित मदन मोहन मालवीय यांनी संपूर्ण गोहत्या बंदीची बाजू मांडली होती. भगवान बुद्धांनी गायीला माणसाचा मित्र म्हणून वर्णन केले आहे. तर जैन लोकांनी गायीला स्वर्ग म्हटले आहे.”,अशी भूमिका न्यायालयानं मांडली आहे.

न्यायालयाने म्हटले की, “भारतीय राज्यघटना तयार करताना, संविधान सभेच्या अनेक सदस्यांनी मूलभूत अधिकार म्हणून गोरक्षणाच्या समावेशाबद्दल बाजू मांडली होती. हिंदू शतकानुशतके गायीची पूजा करत आहेत. इतर धर्मीय देखील या भावनेचा आदर करत आलेले आहेत..यामुळं मुघल काळात गोहत्येला इतर धर्मीय नेत्यांनी कडाडून विरोध केला होता”, अशी टिप्पणी करण्यात आलीय.

जमीयत-ए-उलेमा-ए-हिंदकडून गोहत्या बंदी कायद्याची मागणी

देशातील मुस्लिम नेतृत्व नेहमीच गोहत्येवर देशव्यापी बंदीच्या बाजूने आहे. ख्वाजा हसन निजामी यांनी एक चळवळ सुरू केली होती आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले – ‘तार्क ए गाओ कशी’ ज्यामध्ये त्यांनी गायींची हत्या न करण्याबद्दल लिहिले होते. सम्राट अकबर, हुमायून आणि बाबर यांनी त्यांच्या सल्तनतीमध्ये गोहत्या बंदीचे आवाहन केले होते, याचा दाखला देखील न्यायालयानं दिला.

न्यायालयानं, “जमीयत-ए-उलेमा-ए-हिंदचे मौलाना महमूद मदानी यांनी भारतात गोहत्या बंदीसाठी केंद्रीय कायदा आणण्याची मागणी केली असल्याचं सांगितलं. या सर्व परिस्थितीचा विचार करता, गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची आणि हिंदूंच्या मूलभूत अधिकारात गोरक्षणाचा समावेश करण्याची गरज आहे, अशी भूमिका न्यायालयानं मांडली.कोर्टाने असेही म्हटले आहे की, जेव्हा गायीचे कल्याण होईल, तेव्हाच या देशाचे कल्याण होईल आणि कधीकधी गाईचे संरक्षण आणि संवर्धनाविषयी बोलणारेच गायीचे भक्षक बनतात हे पाहणे खूप वेदनादायक असते, असं कोर्टानं म्हटलं आहे.

इतर बातम्या:

लाल रंगाची भेंडी : शेती करणाऱ्यांना मिळतेय 10 पट अधिक किंमत, ‘या’ आजारांपासून सुरक्षितता

पीएम किसानचा हप्ता घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळू शकतो पेन्शन लाभ, या योजनेअंतर्गत जमा करावे लागतील इतके पैसे

Allahabad high court said Cow is only animal to inhale exhale oxygen

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI