मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याची बंपर आवक, फळांचा राजा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार?

मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढल्याचे दिसून आले, लवकरच आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल. Alphonso Mango Mumbai APMC

मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याची बंपर आवक, फळांचा राजा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार?
हापूस

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये आंब्याची बंपर आवक झाली असून दरात घसरण झाली आहे. तर, लवकरच आंबा सामान्यांच्या आवाक्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फळ मार्केटमध्ये आज 500 गाड्यांची आवक झाली असून जवळपास तीस हजार पेटी आंबा मार्केटमध्ये आला आहे. (Alphonso Mango and Karnataka Mango supply increased in Mumbai APMC mango rates will be decreased)

रत्नागिरी आणि देवगड हापूसची मोठ्या प्रमाणात आवक

रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची आज जवळपास तेवीस हजार पेटी बाजारात आली आहे. तर, सहा हजार क्रेट कर्नाटक आणि केरळ आंबा बाजारात आला आहे. मागील आठवड्यापेक्षा केरळ आणि कर्नाटक आंब्याची आवक घटली असून हापूस आंबा आवक मात्र सहा हजार पेटीने वाढली आहे.

हापूस लवकरच सामान्यांच्या आवाक्यात

देवगड हापूस पाच डझनाच्या पेटीला आठशे ते अडीच हजार रुपये भाव आहे. तर कर्नाटक आणि केरळ आंबा १०० ते १५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. रत्नागिरी हापूस आंबा बाजारात दिवसेंदिवस वाढत चालला असून लवकरच आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येणार असल्याची खात्री दिली जात आहे. इतर फळ विक्रीला ग्राहकांचा प्रतिसाद कमी असला तरी फळांच्या राज्याला मात्र मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे आंबा आवक जास्त प्रमाणात आली तरी मालाला उठाव राहणार असून सामान्य माणूस दहा दिवसात आंबा खाऊ शकेल असे व्यापारी वसंत चासकर यांनी सांगितले.

एप्रिल मेमध्ये आवक वाढणार

अवकाळी पावसामुळे रत्नागिरी आणि देवगड परिसरात आंबा पीक कमी असल्याचे बोलले जात आहे. तर, एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आंबा आवक वाढेल. त्यावेळी मात्र आंबा सामानांच्या आवाक्यात येऊ शकतो. असा अंदाज व्यापारी विजय ढोले यांनी व्यक्त केला. .

फवारणीचा खर्च वाढणार

वातावरणातील बदल आणि पावसामुळे आंब्याच्या मोहोरावर रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे फवराणीचा खर्चाची भर पडणार आहे. सध्या हवामानातील बदलामुळे पालवीला मोहोर आलेला नाही. तर 15 मे नंतरच्या आंब्यावर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावलाय.

संबंधित बातम्या:

यंदाच्या हंगामातली पहिला हापूस आंबा पुणे मार्केटात दाखल, पेटीचा भाव 25 हजार रुपये(Opens in a new browser tab)

कोकणावरील संकटांची मालिका सुरुच, निसर्ग चक्रीवादळानंतर अवकाळी पावसानं हापूस धोक्यात, मच्छीमारही संकटात

(Alphonso Mango and Karnataka Mango supply increased in Mumbai APMC mango rates will be decreased)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI