बिहारमधील पपई शेती करणारं गाव, शेतकऱ्यांची वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई

मोहनपूर गावातील शेतकरी पपई शेतीतून आर्थिक संपन्नता मिळवत आहेत. Mohanpur Modern Papaya Farming

बिहारमधील पपई शेती करणारं गाव, शेतकऱ्यांची वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई
पपई शेती
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 3:59 PM

पाटणा : देशातील शेतकरी पारंपारिक शेतीतून आधुनिकेतकडे वळत असल्याचं पाहायला मिळत आहे. पांरपारिक पिकांची लागवड करण्याऐवजी शेतकरी आता नगदी पिकांकडे वळत आहेत. बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यामध्ये मोहनपूर नावाचं गाव आहे. त्या गावामधून राज्य महामार्ग जातो. येथून जाताना दोन्ही बाजूला पपईची शेती दिसते. मोहनपूर गावातील शेतकरी पपई शेतीतून आर्थिक संपन्नता मिळवत आहेत. पपईची शेती करणारे संतोष वर्षाकाठी 10 लाख रुपयांचं उत्पन्न घेत आहेत. (Bihar Mohanpur Modern Papaya Farming farmers earn 10 lakhs per year)

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 2019 मध्ये मोहनपूर गावाचा सन्मान केला होता. मोहनपूर मधील शेतकरी संतोष पपई शेती आणि विक्रीचा व्यवसाय करतात. ते सांगता की परिसरातील मोठ्या क्षेत्रावर पपई शेती होती. सगळ्या गोष्टी ठीक राहिल्या तर वर्षाकाठी पपईच्या एका प्लॉटमधून 10 लाखांचं उत्पन्न मिळू शकतं.

चार ते पाच लाखांची कमाई

संतोष त्यांना पपई शेतीतून होणाऱ्या कमाईविषयी सांगतात. एक बिघा शेत्रावरील पपईच्या प्लॉटमधून वार्षिक चार ते पाच लाख रुपयांची कमाई होते. इतर जी पारंपारिक पिकं आहेत गहू आणि मका त्यातून मजुरीचा खर्च देखील मिळत नाही, असं संतोष सांगतात. मोहनपूरमधील शेतातील मातीची गुणवत्ता देखील पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर असण्याचं कारण आहे, असं ते सांगतात. शेतात कष्ट करावं लागतं त्यावेळीचं समाधानकारक उत्पन्न मिळतं पहिल्यासारखं राहिलं नाही, असं ते म्हणतात.

पपई शेतीसाठी एप्रिल आणि ऑक्टोबर महिना महत्वाचा

पपई शेती करायची असल्यास ती वर्षभर करता येऊ शकते. मात्र, चागंल उतप्न्न मिळवायचं असल्यास शेतकऱ्यांनी पपईची फळ एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात मिळतील अशा स्वरुपानं लागवड केली पाहिजे. पपईचं झाड साधारण दोन ते तीन वर्षांपर्यंत टिकते. पपईवर कधीकधी कीड पडते, मात्र त्याबाबत संशोधन होणं गरजेचे आहे. कोणतही संकट आलं नाही तर पपई शेतीतून वार्षिक 100-15 लाखांचं उत्पन्न मिळू शकतं, असं संतोष सांगतात.

व्यापारी थेट शेतावर

मोहनपूर गावामधून पपई खरेदी करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील व्यापारी येतात. तेथील व्यापारी पपई खरेदी करुन विविध राज्यांमध्ये पाठवतात. ऑर्डर मिळाल्यास पपई पॅकिंग करुन देखील पाठवली जाते. बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील मोहनपूरमधील पपईची पश्चिम बंगालपर्यंत विक्री केली जाते.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये एमआयएमचे 5 आमदार नितीश कुमारांच्या भेटीला, असदुद्दीन ओवैसींना झटका बसणार?

बिहारच्या शेतकऱ्यांना मोठा झटका, 63 कृषी उपकरणांवरील सब्सिडी रद्द

(Bihar Mohanpur Modern Papaya Farming farmers earn 10 lakhs per year)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.