AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E-Pik Pahani : ‘ई-पीक पाहणी’ प्रक्रियेत बदल, शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय, आता दुरुस्तीचाही पर्याय..!

गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची नोंद ही मोबाईवर करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली होती. यंदा त्यामध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले असून 1 ऑगस्टपासून मोबाईल अॅपही बदलण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना चार पिकांचा समावेश करता येणार आहे. यामध्ये एक मुख्य आणि तीन दुय्यम पिकांचा सहभाग राहणार आहे.

E-Pik Pahani : 'ई-पीक पाहणी' प्रक्रियेत बदल, शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय, आता दुरुस्तीचाही पर्याय..!
ई-पीक पाहणी
| Updated on: Aug 11, 2022 | 7:35 PM
Share

लातूर : शेतकऱ्यांच्या (Crop Sowing) पीक पेऱ्याची नोंद शासन दरबारी व्हावी या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या (E-Pik Pahani) ‘ई-पीक पाहणी’ या अॅपमध्ये यंदापासून अमूलाग्र बदल करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ व्हर्जन -2 हे मोबाईल अॅप डाऊनलोड करुन घ्यावे लागणार आहे. स्थानिक पातळीवरुन आलेल्या सूचनांच्या आधारे हा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदा सुरु असलेली प्रक्रिया ही सुटसुटीत असून शेतकऱ्यांना अगदी सहज वापर करता येईल अशी आहे. (Farmer) शेतकऱ्यांना प्ले-स्टोअरवरुन हे मोबाईल अॅप डाऊनलोड करुन घ्यावे लागणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पिक पेऱ्याची नोंद शासन दरबारी व्हावी हाच उद्देश होता पण आता पीकविमा योजनेतही सरकारी कंपनी असल्याने नुकसानभरपाईसाठीही या अॅपचा आधार घेतला जाणार का हे पहावे लागणार आहे.

1 ऑगस्टपासून नवे मोबाईल अॅप

गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची नोंद ही मोबाईवर करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली होती. यंदा त्यामध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले असून 1 ऑगस्टपासून मोबाईल अॅपही बदलण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना चार पिकांचा समावेश करता येणार आहे. यामध्ये एक मुख्य आणि तीन दुय्यम पिकांचा सहभाग राहणार आहे. यापूर्वीचे मोबाईल अॅप हे बंद कऱण्यात आले असून शेतकऱ्यांना यंदा त्या संबंधित गटामध्येच जाऊन माहिती भरावी लागणार आहे. शिवाय चुकीची माहिती अदा केली तर अॅप ते स्विकारत नाही.

असे आहे अत्याधुनिक अॅप

शेतकऱ्यांना पिकांची माहिती अगदी सहज आणि सुलभ व्हावी या दृष्टीकोनातून हे अॅप तयार करण्यात आले आहे. यामध्ये एक मुख्य आणि तीन दुय्यम पिकांचा समावेश करता येणार आहे. दुय्यम पिकांच्या लागवडीचा दिनांक हंगाम व क्षेत्र नोंदवण्याचीही देखील सोय करण्यात आली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती मिळण्यासही मदत होते. शिवाय शेतकऱ्यांना माहिती भरताना अडचणी निर्माण झाल्या तर त्याचे निराकरण करण्यास अॅपमध्येच बटन देण्यात आले आहे. जेणेकरुन नेहमी विचारले जाणारे प्रश्नांची उत्तरेही तिथे असणार आहेत.

या नोंदी करता येणार

या मोबाईल अॅपमध्ये कायम पडिक क्षेत्र, बांधावरची झाडी, पिकांची माहिती, गावाची माहिती, गावाची पीक पाहणी इत्यादीची माहिती देणारे ऑडिओ क्लिप त्यामध्ये असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती भरताना अडचणी निर्माण होणार नाही. शिवाय अडचणी निर्माण झाल्या तरी त्य सोडवायच्या कशा याचा फॉर्म्युलाही अॅपमध्येच असणार आहे.

24 तासांमध्ये दुरुस्तीही

पिकांसंदर्भात माहिती भरताना शेतकऱ्यांकडून अनेकवेळा चुकाही होतात. मात्र, चुकलेली माहिती दुरुस्त कशी करावी यासंदर्भात गतवेळच्या अॅपमध्ये कोणतिही सोय नव्हती. पण आता नोंदवलेली माहिती जर चुकीची असेल तर शेतकऱ्यांना एकवेळ दुरुस्त करण्याची संधी असणार आहे. मात्र, दुसऱ्यांदा माहिती भरताना योग्य ती काळजी घ्यावीच लागणार आहे. शिवाय यासाठी कृषी सहायकांचे मार्गदर्शन घेणेही गरजेचे आहे.

इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....