AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पात्रतेबाबत ‘अफवा अन् वास्तव’

अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही 9 वाच हप्ता जमा झालेला आहे. (PM KISAN SANMAN NIDHI YOJNA) त्यामुळे रखडलेला हप्ता जमा होणार की नाही, शेतकरी असलेल्या पती-पत्नी या दोघांनाही आता सन्मान निधीचा लाभ मिळणार अशा एक ना अनेक चर्चा ग्रामीण भागात होत आहेत. मात्र, यामागचे सत्य काय हे जाणून घेणेही तेवढेच महत्वाचे आहे...शिवाय कागदपत्रांची पूर्तता न केल्यानेही अनेकांच्या खात्यावर 9व्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पात्रतेबाबत 'अफवा अन् वास्तव'
किसान सन्मान योजनेचे संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 12:20 PM
Share

मुंबई : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील 10 वा हप्ता हा काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही 9 वाच हप्ता जमा झालेला आहे. (PM KISAN SANMAN NIDHI YOJNA) त्यामुळे रखडलेला हप्ता जमा होणार की नाही, शेतकरी असलेल्या पती-पत्नी या दोघांनाही आता सन्मान निधीचा लाभ मिळणार अशा एक ना अनेक चर्चा ग्रामीण भागात होत आहेत. मात्र, यामागचे सत्य काय हे जाणून घेणेही तेवढेच महत्वाचे आहे… (Farmer) शिवाय कागदपत्रांची पूर्तता न केल्यानेही अनेकांच्या खात्यावर 9व्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6000 रुपये म्हणजेच 2000 रुपयांचे तीन हप्ते जमा होतात. 10 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. दिवाळीपूर्वीच हप्ता देण्याचा मानस सरकारचा आहे. पण, 9 वा हप्ता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही. यातच पती-पत्नी या दोघांच्याही खात्यावर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. पण पती-पत्नीपैकी केवळ एकाजणाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

तर योजनेचा लाभ मिळणार नाही..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ पती-पत्नी दोघांनाही घेता येत नाही. जप बनावट कागदपत्रे करुन असा लाभ घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तर ती फसवणूक असल्याचे संबोधले जाणार आहे. एखाद्या शेतकऱ्याने कुटुंबात कर भरला तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे गेल्या वर्षी पती किंवा पत्नीने आयकर भरला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अपात्र कोण?

जर एखादा शेतमजूर हा इतर कोणाच्यातरी शेतामध्ये काम करीत आहे. पण ती शेती त्याच्या मालकिची नाही किंवा त्याच्या नावे सातबारा नाही अशा शेतमजूरास योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेती स्व:ताच्या नावावर नसेल किंवा वडील किंवा आजोबांच्या नावाने असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही

राज्यातील राजकीय नेते हे अधिकतर शेतकरीच आहेत. शेतजमिन आहे पण त्याचबरोबर तो सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्त कर्मचारी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शिवाय विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असेल तर असे लोकही किसान योजनेच्या फायद्यासाठी अपात्र आहेत. अपात्रांच्या यादीत व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट किंवा त्यांचे कुटुंबीय देखील आहेत. आयकर भरणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाभ घेण्यासाठी हे लक्षात असू द्या

या योजनेअंतर्गत स्वत: ऑनलाइन अर्ज करताना फॉर्म पूर्णपणे आणि बरोबर भरा. कारण सरकारी यंत्रणेत आता उलट-तपासणे आता सोपे झाले आहे. त्यामुळे तुमच्या अर्जाची तपासणी होते. बँक खाते क्रमांक(बँक खाते) तसेच आयएफएससी कोड योग्य प्रकारे भरा. सध्याच्या स्थितीत असलेला खाते क्रमांक भरा. जमिनीचा तपशील – विशेषत: खात्याचा क्रमांक खूप काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे

या बाबींमुळे पैसे जमा झाले नसतील ते तपासून पहा

– अवैध खात्यामुळे तात्पुरते थांबवलेले असतील. पण खात्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्यावर पैसे जमा होणार आहेत. – तुम्ही दिलेला खाते क्रमांक बँकेतच नव्हता. याचा अर्थ चुकीचा खाते क्रमांक भरला आहे. – वित्त व्यवस्थापन यंत्रणेनेाध्ये तुमचा सहभागच झालेला नसेल तरीपण पैसे जमा होत नाहीत. – बँकेने जर तुमचे खाते अमान्य केले तरी पैसे जमा होणार नाहीत. – पीएफएमएस/ पीएफएमएस बँकेने शेतकरी नोंदी नाकारल्या आहेत. – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आधार (आधार कार्ड) जमा केले गेले नाही. – राज्य सरकारच्या वतीने दुरुस्ती प्रलंबित असेल तरी पैसे हे जमा होत नाहीत. (Conditions for availing Pradhan Mantri Kisan Samman Yojana – Rules in this way)

संबंधित बातम्या :

खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढा, पण ‘अशी’ करा पूर्वतयारी…

पेरु लागवडीतून 32 लाखांची कमाई, मुंबई ते दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री, दिनेश बागड यांनी करुन दाखवलं

मशरुमच्या व्यवसायातून लाखोंची कमाई, तरुणाच्या हातालाही मिळेल रोजगार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.