मशरुमच्या व्यवसायातून लाखोंची कमाई, तरुणाच्या हातालाही मिळेल रोजगार

मशरूम म्हणजे बुरशीवर्गीय भाजी आहे. मात्र खाण्यासाठी बटन मशरूम, ऑइस्टर, मिल्की या तीन प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे तरुणांनी या व्यवसयात प्रगती करण्याच्या दृष्टीने सायना नेहवाल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी तरुणांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

मशरुमच्या व्यवसायातून लाखोंची कमाई, तरुणाच्या हातालाही मिळेल रोजगार
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 6:57 PM

मुंबई : मशरूम म्हणजे बुरशीवर्गीय भाजी आहे. मात्र खाण्यासाठी बटन मशरूम, ऑइस्टर, मिल्की या तीन प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे तरुणांनी या व्यवसयात प्रगती करण्याच्या दृष्टीने सायना नेहवाल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी तरुणांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ट्रेनिंग अँड एज्युकेशनचे सहसंचालक डॉ. अशोककुमार गोदरा यांनी म्हटले आहे की, मशरूम हा एक असा व्यवसाय आहे जो भूमिहीन, सुशिक्षित, अशिक्षित, तरुण-तरुणी या सर्वांना स्वयंरोजगार म्हणून स्वीकारता येऊ शकतो. (mushroom business) हरियाणा आणि केंद्र सरकार हे शेतकरी, बेरोजगार तरुणांना मशरूम उत्पादन स्वीकारण्यास प्रोत्साहित करीत आहेत. मधुमेह, हृदयरोग या वाढत्या आजारामुळे लोकांमध्ये आहाराला घेऊन जागृती वाढली आहे. या आजाराला निमंत्रण देणार नाही असे पदार्थ खाण्याकडे आता कल वाढत आहे. त्यामुळे देशाच्या गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. या क्षेत्रात नव्याने उतरण्याची मोठी संधी तरुण तसेच शेतकऱ्यांकडे असल्याचे यावेळी डॉ. अशोककुमार गोदरा यांनी सांगितले.

मशरूम पोषण आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध

कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले की, हरियाणा मशरूम उत्पादनात पंजाबनंतर आपले स्थान कायम ठेवले आहे. हरियाणातील अधितर हे शेतकरी पांढरे बटण मशरूम लागवड करतात. हे पीक 3-4 महिन्यांत संपताच पुन्हा हिंगरी आणि दुधाळ मशरूम लावण्याची पद्धत अगदी सोपी आहे. पांढरे बटण मशरूमदेखील जास्त तयार केले जातात आणि त्यात अधिक स्वादिष्टता, पोषण आणि औषधी गुणधर्म असतात.

काय फायदा आहे, बियाणे कोठे मिळवायचे ?

हिंगरी आणि दुधाळ मशरूममध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार इत्यादीदेखील भरपूर प्रमाणात असतात. या मशरूममध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म देखील आहेत. ज्यामुळे उच्च रक्तदाब, साखर, कर्करोग, हृदयरोग इत्यादी आजारांपासून शरीराचे संरक्षण होते. चौधरी चरण सिंग यांच्या हरियाणा कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोग विभागात मशरूम तंत्रज्ञान प्रयोगशाळेत पांढरे बटण मशरूम, धिंगरी मशरूम, दुधाळ मशरूम इत्यादींची बीजे आहेत.

जुने बियाणे विकत घेऊ नकात

मशरूमचा व्यवसाय एका खोलीमध्ये किंवा शेडमध्येही सुरु करता येतो. हळूहळू व्यवसाय वाढविता येतो. याबाबत डॉ. अशोककुमार गोदरा यांनी तरुणांना मार्गदर्शन केले आहे. तसेच बियाणे खरेदी करण्यापूर्वी, ते पूर्णपणे तपासले पाहिजे. बियाणे खूप जूने असेल तर त्याची खरेदी न करण्याचा सल्लाही यावेळी डॉ. अशोककुमार गोदरा यांनी दिला आहे. (Lakhs of rupees earned from mushroom business, youth to get work)

संबंधित बातम्या :

संत्र्याच्या फळगळतीला नुकसानभरपाईच नाही, बागायतदारांचे कोट्यावधींचे नुकसान

ऊसाची योग्य लागवड देईल भरघोस उत्पादन, शेतकऱ्यांनी ‘ही’ काळजी घ्यावी

‘पांढऱ्या’ सोन्याची साठवणूक करा ; यंदा कापसाच्या दराच तेजी कायम राहणार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.