Positive News : कापसाच्या उत्पादनात होणार वाढ, बोंडअळीवरील नियंत्रणासाठी कापूस संशोधन संस्थेचा मोठा निर्णय? वाचा सविस्तर

यंदाच्या हंगामात राज्यात 40 लाख हेक्टरावर लागवड करण्यात आली आहे. पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. असे असले तरी कापूस निसर्गाचा लहरीपणा आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव याचा धोका कायम कापसाला राहिलेला आहे. आता कापूस संशोधन संस्थेकडून हा उपक्रम राबवला जाणार असल्याने उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आहे.

Positive News : कापसाच्या उत्पादनात होणार वाढ, बोंडअळीवरील नियंत्रणासाठी कापूस संशोधन संस्थेचा मोठा निर्णय? वाचा सविस्तर
कापूस पीक
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 6:29 AM

नागपूर : (Cotton Production) कापूस उत्पादनासाठी सर्वकाही पोषक असतानाही उत्पादनात मात्र घट ही ठरलेलीच आहे. (Outbreak of bondage) बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यातून कापूस हे पीकच गायब झाले आहे. बोंडअळीमुळे केवळ कापसालाच नाही तर इतर पिकांना आणि शेतजमिनीला धोका पोहचला आहे. केवळ बोंडअळीमुळे कापसाच्या क्षेत्रात घट होऊन सबंध राज्यात (Soybean Area) सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. यंदा मात्र, कापसाच्या उत्पादनात देखील वाढ होईल असे चित्र निर्माण झाले आहे. कारण केंद्र सरकारने किड व्यवस्थापन या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. शिवाय यंदाच्या हंगामापासूनच याची अंमलबजावणी देखील होणार आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ आणि किडीचा प्रादुर्भाव कमी असा विश्वास व्यक्त होत आहे.

गुलाबी बोंडअळीमुळे उत्पादनात घट

गुलाबी बोंडअळीमुळे शेतकरी कापसापेक्षा इतर पिकांना पसंती देत आहे. गतवर्षी विक्रमी दर मिळूनही यंदा कापसापेक्षा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात तब्बल 50 घट ही ठरलेली आहे. त्यामुळेच देशात कापसाचा तुटवडा निर्माण होत आहे. केवळ कापसावरच नाहीतर बोंडअळीमुळे इतर पिकांच्या उत्पादनावरही परिणाम झालेला आहे. यामुळे प्रक्रिया उद्योजकांना चढ्या दराने कापसाची खरेदी करुन उद्योग सुरु ठेवावे लागत आहेत. यंदा मात्र, केंद्रीय कापूस संस्थेने घेतलेला उपक्रम जर यशस्वी झाला तर कापूस पिकाबाबत चित्र हे बदललेले असेल असा विश्वास आहे.

नेमका काय परिणाम होणार?

बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधम संस्थेच्या माध्यमातून आयआरएम अर्थात इनसेक्ट रजीस्टंन्स मॅनेजमेंट हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यामुळे 30 टक्के बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यात संस्थेला यश आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाला यंदाच्या हंगामापासूनच मान्यता देण्यात आली आहे. चंद्रपूर, वर्धा, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना, अकोला या जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पांची अंमलजावणी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात 40 लाख हेक्टरावर कापसाची लागवड

यंदाच्या हंगामात राज्यात 40 लाख हेक्टरावर लागवड करण्यात आली आहे. पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. असे असले तरी कापूस निसर्गाचा लहरीपणा आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव याचा धोका कायम कापसाला राहिलेला आहे. आता कापूस संशोधन संस्थेकडून हा उपक्रम राबवला जाणार असल्याने उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आहे. गतवर्षी मिळालेला विक्रमी दर आणि आता संशोधनात झालेला बदल याचा परिणाम कापसाच्या क्षेत्रावर दिसून येत आहे. सोयाबीन पाठोपाठ कापसाचे उत्पादन घेतले जात आहे.

शिंदेंकडून कोणाची वर्णी अन् कोणाला डच्चू? अर्थ, गृह..बडी खाती कोणाकडे?
शिंदेंकडून कोणाची वर्णी अन् कोणाला डच्चू? अर्थ, गृह..बडी खाती कोणाकडे?.
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.