Nanded : अतिवृष्टीचा असा हा परिणाम, खरिपात नुकसान तर रब्बी हंगामात कायापालट

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. हंगामाच्या अंतिम टप्यात पावसाने कहर केल्याने पिके पाण्यात होती. त्यामुळे उत्पादनावर तर घट झालीच पण या पावसाचे परिणाम रब्बी हंगामावरही झाला होता. कधी नव्हे ते अधिकच्या पावसामुळे हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. खरिपाचे नुकसान शेतकऱ्यांची तारांबळ हे सर्व असले तरी रब्बी हंगामात मुबलक पाणी आणि शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये केलेला बदल ह्या जमेच्या बाजू झाल्या आहेत.

Nanded : अतिवृष्टीचा असा हा परिणाम, खरिपात नुकसान तर रब्बी हंगामात कायापालट
रब्बी हंगामात मराठवाड्यात पोषक वातावरणामुळे यंदा प्रथमच भातशेतीचे क्षेत्र पाहवयास मिळत आहे. पोषक वातावरणामुळे पीक बहरात आहे.
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 11:17 AM

नांदेड : (Heavy Rain) अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. हंगामाच्या अंतिम टप्यात पावसाने कहर केल्याने पिके पाण्यात होती. त्यामुळे उत्पादनावर तर घट झालीच पण या पावसाचे परिणाम (Rabi Season) रब्बी हंगामावरही झाला होता. कधी नव्हे ते अधिकच्या पावसामुळे हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. खरिपाचे नुकसान शेतकऱ्यांची तारांबळ हे सर्व असले तरी रब्बी हंगामात मुबलक पाणी आणि शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये केलेला बदल ह्या जमेच्या बाजू झाल्या आहेत. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना ज्या पिकातून उत्पन्न त्यालाच महत्व दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात (Paddy Farming) भातशेतीच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. मराठवाड्यात भातशेती हे दुर्मीळ असले तरी यंदा उपलब्ध पाणी आणि वातावरणातील बदल यामुळे शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे.

तीन तालुक्यात 15 हजार हेक्टरावर भातशेती

मराठवाड्यात रब्बी हंगामात ज्वारी,गहू किंवा हरभरा याशिवाय शेतकरी अन्य पिकांकडे दुर्लक्ष करतो. यावेळी मात्र, उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्याचअनुशंगाने जिल्ह्यातील देरलूर, बिलोली आणि धर्माबाद या तेलंगणा सीमावर्ती भागात भातशेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी केला आहे. दरवर्षी त्याच पिकाने जमिनीचा सामू कमी होतो तर उत्पादनातही वाढ होत नाही. भातशेतीचा प्रयोग नवा असला तरी तीन तालुक्यांमध्ये तब्बल 15 हजार हेक्टरावर धानाचे पीक बहरत आहे. यंदा प्रथमच शेतकऱ्यांनी हे धाडस केले असून समाधानकारक उत्पादन पदरी पडले तर भातशेतीचे क्षेत्र वाढणार आहे.

पोषक वातावरणामुळे पीक जोमात

ज्या ठिकाणी उबलक पाणी आहे त्याच भागात भाताचे उत्पादन घेतले जाते. मराठवाड्यात दरवर्षी आवर्षणाची स्थिती असते. यंदा मात्र, चित्र पालटले असून मुबलक प्रमाणात पाणी आहे. शिवाय पीक वाढीस पोषक वातावरण असल्याने या तालुक्यातील भाताचे पीक बहरत आहे. वातावरणाने साथ दिली तर विक्रमी उत्पादन मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. पीकपध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीच्या अनुशंगानेच हा बदल केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गावरान तांदूळ, मागणीही अधिक

सध्या गावरान शेतीमालाला अधिकची मागणी आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही पध्दत फायदेशीर आहे मात्र, गावरान तांदूळ क्विचितच मिळतो. याचाच अभ्य़ास या भागातील शेतकऱ्यांनी भातशेतीचे पीक घेतले आहे. ज्याला अधिकचे मागणी त्याच पिकाचे उत्पादन घेतले तर फायदाही अधिकचा होतो शिवाय गावराणमुळे अधिकची मागणी होते.या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी गावरान जातीच्या तांदळाची लागवड केलीय, या तांदळाला स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

संबंधित बातम्या :

उत्तर महाराष्ट्र, कोकणनंतर आता नंबर कुणाचा? ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

Photo Gallery : निसर्गाचे धुमशान, लाल-केशरी रंगांची उधळण, उन्हाळ्याच्या चाहुलीनं पळसाला बहार

दुष्काळात तेरावा: कीटनाशकांच्या फवारणीनंतर द्राक्ष बागा जळाल्या घडही सुकले, पंढरपुरात नेमकं असे का घडले?

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.