आठ दिवसांमध्येच उरकून घ्या खरीपातील कामे, अन्यथा उरल्या- सुरल्या पीकांचेही नुकसान

16 ऑक्टोंबरपासून पुन्हा पावसाचा कहर सुरु होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे आगोदरच पावसामुळे पीकाची खराबी झालेली आहे. मात्र, उरलं-सुरलं खरीपातील पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या आठ दिवसाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

आठ दिवसांमध्येच उरकून घ्या खरीपातील कामे, अन्यथा उरल्या- सुरल्या पीकांचेही नुकसान
संग्रहित छायाचित्र

लातूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिल्याने खरीपातील (Khraif Crop) पीक काढणी कामाला वेग आला आहे. मात्र, अजूनही सोयाबीनची काढणी आणि कापसाची वेचणी ही कामे सुरुचआहेत, पावसाने उघडीप तर दिली आहे शिवाय कडाक्याचे ऊनही असल्याने शेतकऱ्यांनी (Farmer) काढणी – मळणी आणि कापसाची वेचणी करणे आवश्यक आहे. कारण 16 ऑक्टोंबरपासून पुन्हा पावसाचा कहर सुरु होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे आगोदरच पावसामुळे पीकाची खराबी झालेली आहे. मात्र, उरलं-सुरलं खरीपातील पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या आठ दिवसाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

खरीपातील पीके ऐन काढणीच्या प्रसंगीच पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच आहे. पण यामध्ये अणखीन भर पडू नये म्हणून पावसाची उघडीप झाली की वेळेचे नियोजन करुन शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी- मळणी करुन घ्यावी तर कापसाची वेचणी गरजेची अन्यथा कापसाची बोंडाचे पावसामुळे नुकसान होणार आहे.

काय आहे शेतकऱ्यांसाठी सल्ला..

17 ऑक्टोंबरपासून पुन्हा पावसाला सुरवात होणार असल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे 10 ते 16 ऑक्टोंबर दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीनची कमीत कमी काढणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर जर पावसाने उघडीप दिली तर यंत्राच्या सहायाने लागलीच मळणी करणे आवश्यक आहे. यापुर्वीच पावसामुळे पीकांचे नुकसान हे झालेले आहे. भविष्यातही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.

तीन दिवस धोक्याचे

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दिवसभर ऊन आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. गुरुवारी रात्री लातूर शहरासह उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. 8 ते 10 ऑक्टोंबर दरम्यान भाग बदलत पाऊस होणार आहे. त्यामुळे काढणी झालेल्या पीकाची मळणी दिवसभर पावसाने उघडीप दिल्यच्या काळात करणे आवश्यक आहे. बंगालखाडी येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने पावसाचा जोर वाढणार असल्याचे डख यांनी सांगितले आहे.

बदलत्या वातारवरणाचा द्राक्ष बागांनाही धोका

पावसाबरोबरच वातावरणातही बदल होणार आहे. त्यामुळे केवळ खरीपातील पीकांनाच नाही तर फळबागांवरही या वातावरणाचा परिणाम होणार आहे. द्राक्षाचे पीक आता तोडणी अवस्ठेत आहे. मात्र, धुई, धुके यापासून धोका आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार यांनीही काळजी घेण्याचे अवाहन करण्यात आलेले आहे. 11 ते 16 ऑक्टोंबर दरम्यान, थंडी व सुर्यदर्शन होणार आहे. त्यामुळे या वातावरणात सोयाबीनची काढणी-मळणी तर कापसाची वेचणीची कामे पार पडणे आवश्यक आहे. 17 ऑक्टोंबरपासून राज्यात पुन्हा पावसाचा धोका असल्याचे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे.

कुठे काय होणार?

08 ऑक्टोबर – औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी 30 ते 40 किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी 30 ते 40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.

09 ऑक्टोबर – बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी 30 ते 40 किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी 30 ते 40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.

10 ऑक्टोबर – उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी 30 ते 40 किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर लातूर व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी 30 ते 40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे. (Danger of rain again, farmers advised to leave agricultural activities in time)

संबंधित बातम्या :

पावसाचा परिणाम आगामी हंगामावरही, बीजोत्पादन घटणार, दर वाढणार

धक्कादायक! आता शेतकऱ्यांच्या गृहलक्ष्मीचीही आत्महत्या, मराठवाडा- विदर्भात शेतकरी महिला आत्महत्या कशा थांबणार?

Special Story ! टोकण पध्दतीने सोयाबीनचे भरघोस उत्पादन, काय आहे टोकण पध्दत ?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI