AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापुराचा फटका-गोकुळला झटका, कोट्यवधी रुपयांचं नुकसान, शासनानं अनुदान द्यावं, गोकुळच्या अध्यक्षांची मागणी

महापुराच्या काळात दूध संकलन आणि विक्रीमध्ये घट झाल्याने जवळपास 16 ते 17 कोटी रुपयांचं गोकुळ दूध संघाचं नुकसान झालंय.

महापुराचा फटका-गोकुळला झटका, कोट्यवधी रुपयांचं नुकसान, शासनानं अनुदान द्यावं, गोकुळच्या अध्यक्षांची मागणी
गोकूळ दूध संघ
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 4:43 PM
Share

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुराचा फटका कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ (Gokul Dudh Sangh) मोठ्या प्रमाणात बसलाय. महापुराच्या पाण्याने जिल्ह्यातील अनेक गाव वेढली गेली. शिवाय महत्त्वाचे रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद झाल्याने त्याचा परिणाम दूध संघाच्या संकलनावर झालाय. महापुराच्या काळात दूध संकलन आणि विक्रीमध्ये घट झाल्याने जवळपास 16 ते 17 कोटी रुपयांचं गोकुळ दूध संघाचं नुकसान झालंय.

महापुरात दूधाचं संकलन घटलं, रस्ते बंद असल्याने विक्रीही घटली

महापुरात 22 ते 26 जुलै अखेर गोकुळ दूध संघाचं संकलन तब्बल 16 लाख 43 हजार लिटरने घटलंय.. त्यामुळे जवळपास 6 कोटी 16 लाखांचा आर्थिक फटका संघाला बसला. इतकंच नाही तर या काळात पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातील दूध विक्री तब्बल 20 लाख 88 हजारांची घट झाल्यानं त्याचाही 10 कोटी 44 लाखांचा आर्थिक फटका संघाला बसलाय.. एकूणच महापुराच्या काळात संकलन आणि विक्री मध्ये जवळपास 16 ते 17 कोटी रुपयांच नुकसान गोकुळ दूध संघाच झालंय.

नुकसान भरुन काढण्यासाठी सरकारने संघाला अनुदान द्यावं

हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने संघासाठी अनुदान द्यावं, अशी मागणी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केलीय. महापूर ओसरत असल्यामुळे संकलन सुद्धा पूर्ववत होत असून उद्यापासून पुण्या-मुंबईतील दूध विक्री देखील सुरळीत होईल अशी माहिती त्यांनी दिलीय.

महापुरामुळे जनावर दगावलेल्या दूध उत्पादकांच्या मदतीबाबत लवकरच निर्णय

महापुराच्या स्थितीमुळे जिल्ह्यात येत्या काळात चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली असून महापुरामुळे जनावर दगावलेल्या दूध उत्पादकांना मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं देखील विश्वास पाटील म्हणालेत.

दूधावर महापूराचा परिणाम

कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक संघ आणि गुजरातमधील अमूलकडून साधारण 22 लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. शिवाय सांगली-सातारा येथून इतरही काही दूध संघांकडून मुंबईला दूध पुरवठा होतो. गेल्या 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पूरस्थिती गंभीर होती. अनेक महामार्ग, रस्ते बंद होते. या भागांतील गोठ्यांवरही पूराचा परिणाम झाला. त्यामुळे गोकुळच्या दूध संकलनात काहीशी घट झाली.

(Decrement in milk collection, Decrement in sales, Financial loss of Gokul Dudh Sangh Due To maharashtra kolhapur Flood)

हे ही वाचा :

पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

दरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज; पॅकेजसाठी हालचाली सुरू

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.