AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cashew : काजू बीच्या बाबतीत बाजारपेठेचे सूत्र ही मोडले, उत्पादन अन् दरही घटले, काय आहेत कारणे?

वातावरणातील बदलाचा परिणाम हा प्रत्येक पिकांवर आणि फळांवरही झाला आहे. एवढेच नाही तर काढणीचा हंगामही लांबलेला आहे. असाच काहीसा प्रकार काजूच्या बाबतीमध्येही झाला आहे. काजू बीचे उत्पादन घटूनही दर वाढलेले नाहीत. उलट यामध्ये घट झालेली आहे. उत्पादन घटले तर पिकांच्या किंमतीमध्ये वाढ होते हा बाजारपेठेचा नियमच आहे. पण काजू बीच्या बाबतीत हे उलटे होताना दिसत आहे.

Cashew : काजू बीच्या बाबतीत बाजारपेठेचे सूत्र ही मोडले, उत्पादन अन् दरही घटले, काय आहेत कारणे?
यंदा वातावरणातील बदलामुळे काजू बीचे उत्पादन घटले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 05, 2022 | 12:47 PM
Share

सिंधुदुर्ग : (Climate change) वातावरणातील बदलाचा परिणाम हा प्रत्येक पिकांवर आणि फळांवरही झाला आहे. एवढेच नाही तर काढणीचा हंगामही लांबलेला आहे. असाच काहीसा प्रकार काजूच्या बाबतीमध्येही झाला आहे. (Cashew) काजू बीचे उत्पादन घटूनही दर वाढलेले नाहीत. उलट यामध्ये घट झालेली आहे. (Production Decrease) उत्पादन घटले तर पिकांच्या किंमतीमध्ये वाढ होते हा बाजारपेठेचा नियमच आहे. पण काजू बीच्या बाबतीत हे उलटे होताना दिसत आहे. त्यामुळे दरातील चढ-उताराबद्दल संभ्रमतेचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये आहे. उत्पादनात घट दुसरीकडे दरही नाही त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले पण उत्पादनात घट झाल्यावर वाढीव दर तरी मिळाले आहेत पण काजू बीच्या बाबतीत असे होताना दिसत नाही.

काजू हंगामाला सुरवात

इतर फळांप्रमाणे काजूचे उत्पादन पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकष्टा करावी लागली होती. अगोदरच अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काजू बागांना मोठा फटका बसलेला होता. यामुळे ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये आलेला मोहोर 20 दिवसांमध्येच कुजून गेला. यानंतर मात्र, डिसेंबरमध्ये थंडीत वाढ झाली आणि पालवी फुटावी म्हणून शेतकऱ्यांनी केलेले प्रयत्न कामी आले. त्यामुळे मोहोर तर आला पण गेल्या 15 ते 20 दिवसांपासून हंगामही सुरु झाला आहे.

महिनाभराने लांबला हंगाम

कोकणातील वेलूर्गा, सावंतवाडी, मालवण, या तालुक्यांमध्ये काजूचा हंगाम लवकरच सुरु झाला होता. पण उर्वरीत भागामध्ये काजू बी परिपक्व होण्यास विलंब झाला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच काजूचा हंगाम तेजीत असतो. मात्र, यंदा मार्च महिना सुरु झाला तरी काजूचे उत्पादन हे सुरु झालेले नाही. असे असूनही दरात वाढ होणे अपेक्षित आहे. पण काजू बीच्या दरात 5 रुपयांनी घटच झालेली आहे. आठवडी बाजारात आवक कमी असूनही काजू बी हे 125 रुपये किलोवरुन थेट 120 रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे काजू बी पीक जोपासण्यासाठी अधिकचा खर्च आणि आता कमी दरात विक्री करण्याची नामुष्की उत्पादकांवर ओढावली आहे.

आयात काजूचा परिणाम दरावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात काजू आय़ात करतात. हा काजू कोकणातील काजू दराच्या तुलनेत खूपच कमी दराने मिळतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील काजू चांगला असूनही याकडे दुर्लक्ष होते. परिणामी चांगला काजू बाजूला राहून इतर काजूचीच विक्री होते. यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये नुकतीच बैठक पार पडली असून आयात काजूवर काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery: काळ्या मातीत बैलगाडी शर्यतीचा थरार अन् तरुणांचा उत्साह शिघेला..!

हापूसच्या खरेदी-विक्रीमध्ये होणार नाही फसवणूक, कृषी पणन मंडळाचा काय आहे प्लॅन?

Chickpea Crop : हरभऱ्याला ‘आधार’ हमीभाव केंद्राचाच, नोंदणी करा अन् योजनेचा लाभ घ्या..!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...