AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chickpea Crop : हरभऱ्याला ‘आधार’ हमीभाव केंद्राचाच, नोंदणी करा अन् योजनेचा लाभ घ्या..!

यंदा हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र यातच पोषक वातावरणामुळे वाढत असलेली उत्पादकता यामुळे यंदा विक्रमी उत्पादन मिळेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ही उत्पादनाची चांगली बाजू असली तरी दुसरीकडे बाजारपेठेत हरभऱ्याच्या दरात अद्यापतरी सुधारणा झालेली नाही. सध्या खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 700 पर्यंतच दर मिळालेला आहे.

Chickpea Crop : हरभऱ्याला 'आधार' हमीभाव केंद्राचाच, नोंदणी करा अन् योजनेचा लाभ घ्या..!
'नाफेड'च्या वतीने राज्यात हरभऱा खरेदी केंद्र उभारण्यात आले आहेत.
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 10:34 AM
Share

नांदेड : यंदा हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र यातच पोषक वातावरणामुळे वाढत असलेली उत्पादकता यामुळे यंदा विक्रमी उत्पादन मिळेल असा अंदाज (Agricultural Department) कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ही उत्पादनाची चांगली बाजू असली तरी दुसरीकडे बाजारपेठेत (Chickpea Crop) हरभऱ्याच्या दरात अद्यापतरी सुधारणा झालेली नाही. सध्या खुल्या (Market) बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 700 पर्यंतच दर मिळालेला आहे. तर नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर निश्चित झालेला आहे. 1 मार्चपासून प्रत्यक्षात खरेदीला सुरवात झाली असून नोंदणी प्रक्रियाही सुरु आहे. जिल्ह्यातील अर्धापुर खरेदी केंद्रात आतापर्यंत 800 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले असून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय नोंदणी करण्याचा ओघ हा सुरुच आहे.

यामुळे हमीभाव केंद्राशिवाय पर्याय नाही

किमान शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र ही सुरु केली जातात. यापूर्वी खरीप हंगामातील तूरीसाठी हमीभाव केंद्र सुरु करण्यात आली होती पण बाजारपेठेतील दर आणि खरेदी केंद्रावरील दर हे समानच असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवत खुल्या बाजारात विक्रीला प्राधान्य दिले होते. पण हरभऱ्याच्या बाबतीत परस्थिती बदललेली आहे. हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारात हरभऱ्याला कमी दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावरच विक्री करावी लागणार आहे. शिवाय भविष्यात उत्पादनात वाढ झाली तर खुल्या बाजारपेठेतील दर अणखी कमी होतील असा अंदाज आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल राहणार आहे.

ऑनलाईन पीकपेरा गरजेचा

हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी करताना शेतकऱ्यांना ऑनलाईन पिकपेरा गरजेचा आहे. यासाठी वाढीव मुदतही देण्यात आली आहे. ‘ई-पीक पाहणी’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हरभरा या पिकांची नोंदणी केली असेल तर त्यांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांनी पिकपेऱ्याची ऑनलाईन नोंदणी करुन हमीभावाचा लाभ घेणे गरजेचे आहे.

या कागदपत्रांची आहे आवश्यकता

तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ येथे आधार कार्ड, सातबारा, 8 अ उतारा, तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा पीक पेरा उतारा किंवा हरभरा पिकाच्या नोंद असलेला सातबारा, आधार लिंक असलेले बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. केंद्राच्या किमान हमीभावानुसार शेतीमाल खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ, मुंबई, दि विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर, महाएफपीसी पुणे, पृथ्वाशक्ती फार्मर प्रड्युसर कंपनी, नगर आदींच्या माध्यमातून हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Success Story: मातीशिवाय शेती करु लागला, लोकांनी येड्यातच काढलं, अन् आता डोक्यावर घेऊन नाचायचंच उरलंय!

आनंदी आनंद गडे : खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघणार? हंगामही अंतिम टप्प्यात

Mango : फळमाशीमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, कोणत्या फळाला अधिकचा धोका?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.