AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदी आनंद गडे : खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघणार? हंगामही अंतिम टप्प्यात

रब्बी हंगामाच्या सुरवातीच्या काळातील निसर्गाचा लहरीपणा वगळता यंदा उत्पादकता वाढीसाठी पोषक वातावरण राहिलेले आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन हरभरा या पिकावर भर दिला होता. शिवाय (Agricultural Department) कृषी विभागानेही याबाबतच जनजागृती केली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असून हरभरा काढणीचा श्रीगणेशा झालेला आहे.

आनंदी आनंद गडे : खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघणार? हंगामही अंतिम टप्प्यात
यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला उत्पादन वाढेल अशी आशा आहे.
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 9:34 AM
Share

नांदेड :  (Rabi Season) रब्बी हंगामाच्या सुरवातीच्या काळातील निसर्गाचा लहरीपणा वगळता यंदा उत्पादकता वाढीसाठी पोषक वातावरण राहिलेले आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन हरभरा या पिकावर भर दिला होता. शिवाय (Agricultural Department) कृषी विभागानेही याबाबतच जनजागृती केली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असून हरभरा काढणीचा श्रीगणेशा झालेला आहे. अतिवृष्टीमुळे यंदा नांदेड जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीक्षेत्रात सरासरीच्या दुप्पटीपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. याचप्रमाणे उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्न केले असून कृषी विभागाचे मार्गदर्शन कायम राहिलेले आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र हे 1 लाख 40 हजार हेक्टर असून प्रत्यक्षात पेरा मात्र, 3 लाख 57 हजार हेक्टरावर झाला आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची भरपाई रब्बी हंगामातून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले आहेत.

यंदा उत्पादकताही चांगली

पीक कापणी होण्यापूर्वी कृषी विभागाकडून अंदाजे उत्पादकता काढली जाते. यंदा सर्वाधिक उत्पाकता ही अकोला जिल्ह्याची आहे. या जिल्ह्यात हेक्टरी 15 क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्याची उत्पादकता ही 11.50 क्विंटल एवढी आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा अधिकचे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. पोषक वातावरणामुळे हे शक्य झाले आहे. शिवाय मध्यंतरी वातावरणात बदल होऊनही शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी केल्याने त्याचा उत्पादकतेवर परिणाम झाला नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी सांगितले आहे.

पोषक वातावरणाला थंडीची साथ, उत्पादनात वाढ

रब्बी हंगामातील पिके बहरत असतानाच मराठवाड्यात थंडीची चांगलीच लाट पसरली होती. जानेवारी अखेर पर्यंत थंडीची तीव्रता होती, त्याचा रब्बी हंगामातील पिकांना चांगलाच फायदा झाला आहे. नांदेडमध्ये यंदा हरभरा पिकांचे तर विक्रमी उत्पादन होईल अशी आशा जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी व्यक्त केलीय. तसेच गहू पिकाला पोषक वातावरण राहिल्याने गव्हाच्या उताऱ्यात वाढ होईल असाही अंदाज आहे. उन्हाळी ज्वारी, करडई आणि भुईमूग पिकाला देखील थंडी पोषक अशीच ठरलीय. मध्यंतरी मर रोगाचा काहीसा प्रादुर्भाव पिकांवर जाणवला होता, मात्र उन्हाची तीव्रता वाढताच हा प्रादुर्भाव नाहीसा झाला होता.

अखेर पीक पध्दतीमधील बदल ठरला फायदेशीर

कधी नव्हे ते मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मुख्य पिकांना बाजूला सारुन रब्बी हंगामात कडधान्यावर भर दिली होती. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे पिकेही बदलली पण उत्पादनात वाढ होणार का नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, पोषक वातावरणामुळे हा प्रयोग देखील यशस्वी ठरलेला आहे. ज्वारीची जागा आता हरभरा, राजमा आणि उन्हाळी सोयाबीनने घेतलेली आहे. अंतिम टप्प्यापर्यंत पिकांची वाढ तर जोमात झाली असून उत्पादनातही वाढ झाली तर खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघेल.

संबंधित बातम्या :

Mango : फळमाशीमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, कोणत्या फळाला अधिकचा धोका?

Grape : निसर्गाच्या लहरीपणावर मात करुनही द्राक्ष उत्पादक अडचणीतच, निर्यातीवरही परिणाम..!

युट्यूब पाहून अफू पिकवला, पोलिसांची थेट बांधावरच धाड; वाळकी शिवारात नेमके काय घडले?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.