युट्यूब पाहून अफू पिकवला, पोलिसांची थेट बांधावरच धाड; वाळकी शिवारात नेमके काय घडले?

काळाच्या ओघात पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यामाध्यमातून अनेकांनी शेतीचे चित्रच बदलले आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वाळकीच्या पट्ट्याने उत्पादन नाही पण गैरमार्गाने उत्पन्न वाढीसाठी भलतेच प्रयत्न केले. यासाठी कुण्या कृषी अधिकाऱ्याचा किंवा कृषितज्ञांचा सल्ला घेतला नाही तर युट्युबलाच आपला गुरु मानून थेट अफूची शेती करायची कशी याची माहिती घेतली.

युट्यूब पाहून अफू पिकवला, पोलिसांची थेट बांधावरच धाड; वाळकी शिवारात नेमके काय घडले?
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वाळकी शिवारात अफूची लागवड केल्याचे समजताच पोलीसांनी कारवाई केली आहे.
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 4:39 PM

जळगाव : काळाच्या ओघात (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यामाध्यमातून अनेकांनी शेतीचे चित्रच बदलले आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वाळकीच्या पट्ट्याने उत्पादन नाही पण (Miscellaneously generated) गैरमार्गाने उत्पन्न वाढीसाठी भलतेच प्रयत्न केले. यासाठी कुण्या कृषी अधिकाऱ्याचा किंवा कृषितज्ञांचा सल्ला घेतला नाही तर (Youtube) युट्युबलाच आपला गुरु मानून थेट अफूची शेती करायची कशी याची माहिती घेतली. केवळ माहितीच घेतली नाही तर तब्बल चार बिघे शेतात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकाश पाटील यांनी अशा प्रकारची शेती करुन पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण या तरुणाविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी कारवाई केली आहे. त्यामुळे मोबाईलचा जेवढा चांगला वापर आहे तेवढाच तो घातकही आहे.

…म्हणून निवडला हा मार्ग

पारंपरिक पिकांमधून उत्पादनात वाढ होत नाही. शिवाय दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. अथक परिश्रम करुनही पदरी पैसे पडत नाहीत शिवाय वर्षानुवर्षे कार्जाचा डोंगर वाढतच आहे. यामुळे प्रकाश याने थेट अफूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. शिवाय याबाबत कुणाला काही विचारण्यापेक्षा युट्युबरच त्याने ही सर्व माहिती घेतली. लागवडीपासून ते काढणी आणि विक्रीची माहिती घेतल्यानंतर त्याने हे धाडस केले. आर्थिक प्रगती साधण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले.

युट्युब बघून घेतले अफूच्या शेतीचे धडे

कर्जबाजारीपणामुळे आपल्याला वेगळ्या मार्गाने पैसा कमवा लागेल, हे प्रकाशच्या लक्षात आल्यानंतर त्याने युट्युब बघून अफूची शेती कशी करता येईल? पीक आल्यानंतर कशा पद्धतीने खसखसच्या स्वरुपात तिची विक्री करता येईल,याचे पूर्ण धडे युट्युब वरून घेतले. पोलिसांनी प्रकाशच्या मोबाईल जप्त केल्यानंतर त्यात अफूच्या शेतीची संबंधित काही व्हिडिओ आढळून आले आहेत. प्रकाशला एकूण 5 एक्कर शेती असून 4 एकरामध्ये त्याने आंतरपिक म्हणून थेट अफूची लागवड केली होती.

अशी केली अफूची शेती

प्रकाशने युट्युब वरून अफूची शेती कशी करता येईल?, याचे धडे घेतले. यानंतर त्याने जवळपास चार एक्कर क्षेत्रात अफूची शेती केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून आजूबाजूला मका पेरला. दरम्यान स्थानिक पातळीवरून गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरविले. शुक्रवारी सकाळी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी चोपडा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक देविदास कुंनगर यांच्यासोबत मोठ्या ताफ्यासह घटनास्थळी धडक दिली. संबंधित तरुणाची विचारपूस केली असता त्याने आपल्यावर प्रचंड कर्ज होते आणि त्यामुळे खूप त्रास होत होता. म्हणून आपण अफूच्या शेतीचा मार्ग अवलंबिले त्याने प्राथमिक चौकशीत सांगितेय.

कापणीचे नियोजन तेवढ्यात…

प्रकाशने साधारण डिसेंबर महिन्यात चार बिघे अफू पेरला होता. त्यामुळे अफूचे पीक आता पूर्णपणे तयार झाले होते. पंधरा दिवसात त्या पिकाची कापणी करण्याचे प्रकाशचे नियोजन होते. परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी कारवाई केली. प्राथमिक चौकशीत प्रकाशने साधारण दीड ते दोन किलो अफू खसखसच्या स्वरूपात अमळनेर चोपडासह परिसरात विकल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयिताला पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे घटनास्थळी घेऊन गेले होते. तसेच दुसरीकडे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : पिकांवरील रोगांचे मूळ कारण काय? जाणून घ्या उपाययोजनाही

Beed : केज कृषी उत्पन्न बाजार समतीवर अखेर प्रशासक, कारणही क्षुल्लक

सांगा पिकं जगावयची कशी? 88 वर्षीय आजीबाईंचा महावितरण अधिकाऱ्यांसमोरच टाहो..!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.