Mango : आवक वाढली अन् दरही, यंदा आंब्याची चव चाखायला मिळणार की नाही..!

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी आंब्याची आवक वाढली की दरात घट होते. पण यंदा चित्र उलटे आहे. आता पुणे, मुंबई यासारख्या बाजारपेठांमध्ये कोकणातील देवगड, संगमेश्वर, पावस, राजापूर, सावंतवाडी या भागातून आंब्याची आवक वाढली आहे.

Mango : आवक वाढली अन् दरही, यंदा आंब्याची चव चाखायला मिळणार की नाही..!
तिसऱ्या मोहरातील आंब्याचे उत्पादन वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 10:12 AM

पुणे : अवकाळीच्या कचाट्यातून सुटका झालेला (Mango) आंबा आता बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे. यापूर्वीच्या हंगामातील आंब्याचे अवकाळी पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे नुकसानच झाले होते. त्यामुळे मागणी असतानाही बाजारपेठेत (Mango Arrival) आवकच नसल्याने खवय्यांना आंब्याची चवच चाखायला मिळालेली नाही. तर आता आंब्याची आवक वाढली असताना दरही गगणाला भिडले आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांच्या नशिबी आंबा आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील (Mango Market) मुख्य बाजारपेठांमध्ये कोकणातून आंब्याची आवक सुरु झाली आहे. मात्र, अक्षतृतीयापर्यंत आंब्याच्या दरात तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे कधी घटती आवक तर कधी वाढलेले दर यामुळे खवय्येगिरींचा हिरमोड होत आहे.

उत्पादन घटल्याने दरात वाढ

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी आंब्याची आवक वाढली की दरात घट होते. पण यंदा चित्र उलटे आहे. आता पुणे, मुंबई यासारख्या बाजारपेठांमध्ये कोकणातील देवगड, संगमेश्वर, पावस, राजापूर, सावंतवाडी या भागातून आंब्याची आवक वाढली आहे. असे असले तरी आवकच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने हापूसला 800 ते 1 हजार 200 असा प्रति डझन दर आहे.

कोकणपट्ट्यातून आंब्याची आवक

कोकणातील विविध जिल्ह्यामधून सध्या पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आंब्याची आवक सुरु आहे. दिवसाकाठी 10 ते 15 हजार पेट्यांची आवक सुरु आहे. तर कर्नाटकातून 2 डझनाच्या अशा 5 ते 6 हजार बॉक्स दिवसाकाठी बाजारपेठेत दाखल होत आहे. अक्षयतृतीयाच्या अनुशंगाने सध्या आवक वाढली असली तरी दरात घट झालेली नाही. मूळात आंब्याचे उत्पादनच घटले असल्याने दर चढेच राहतील असा अंदाज आहे. पण अक्षयतृतीयानंतर यामध्ये बदल होईल ही अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.

हे सुद्धा वाचा

असे आहेत आंब्याचे दर

हापूसची 4 ते 5 डझनची पेटी ही 800 ते 1 हजार 200 रुपयांपर्यंत पुणे बाजारपेठेत मिळत आहे. तर पायरी आंब्याची 800 ते 1 हजार रुपयांपर्यंत पेटी मिळत आहे. पायरी आंबा प्रतिकिलो 50 ते 60 रुपये तर हापूस 50 ते 80 रुपये किलो तर लालबाग 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे दर आहेत. उत्पादनावर परिणाम आणि मागणी अधिकची अन् आवक कमी यामुळे आंब्याचे दर हे चढेच राहणार आहे. अक्षतृतीया संपल्यानंतर दरात घट होईल असा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.