Dilip Kumar :चित्रपटांचा बेताब बादशाह, फळांची विक्रीही केली, असा राहिला शेती-मातीशी संबंध

Dilip Kumar death live updates: दिलीप कुमार यांचे कुंटुबीय फळांच्या व्यवसायाशी निगडीत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी बऱ्याच काळासाठी फळ विकण्याचं काम केलं होतं. दिलीप कुमार यांनी शेतीक्षेत्रात देखील काम केलं होतं.

Dilip Kumar :चित्रपटांचा बेताब बादशाह, फळांची विक्रीही केली, असा राहिला शेती-मातीशी संबंध
दिलीप कुमार
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 12:44 PM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील. दिलीप कुमार यांनी त्यांचा पहिला चित्रपट ज्वार भाट ते त्यांच्या अखेरच्या चित्रपटात समजातील प्रत्येक वर्गातील व्यक्तीची भूमिका पार पाडली. ( Dilip Kumar Death Do you know Dilip Kumar did fruits business before enter in Film industry)

चित्रपटांमध्ये ग्रामीण भूमिका

दिलीप कुमार यांना पहिल्यांदा विशेष ओळख मिळाली ती एका ग्रामीण व्यक्तिरेखेमुळे जी व्यक्तिरेखा शेतीशी निगडित होती. मेला, नया दौर, गंगा जमुना, सगीना या चित्रपटांमध्ये दिलीप कुमार यांनी ग्रामीण व्यक्तिरेखा साकारली होती. फक्त चित्रपटाच्या पडद्यावर नाही तर वास्तविक जीवनातही दिलीपकुमार शेतीशी निगडीत काम करत होते.

दिलीपकुमार यांचा जन्म पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये झाला होता. त्यांचं मुळ नाव मोहम्मद युसूफ खान असं होतं पण ते जगभर दिलीपकुमार नावानेच ओळखले गेले. दिलीप कुमार यांचे कुंटुबीय फळांच्या व्यवसायाशी निगडीत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी बऱ्याच काळासाठी फळ विकण्याचं काम केलं होतं. दिलीप कुमार यांनी शेतीक्षेत्रात देखील काम केलं होतं.

नैनितालमध्ये बाग खरेदी

एका रिपोर्टनुसार, इंग्रजीची माहिती असल्यानं दिलीप कुमार यांनी ब्रिटीश आर्मी कँटीनमध्ये असिस्टंटची नोकरी मिळाली होती. काही काळानंतर ते वडिलांसाठी मुंबईत परतले होते. दिलीप कुमार फळांच्या व्यवसायात यशस्वी ठरले होते. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार दिलीप कुमार यांना त्यांच्या वडिलांना नैनितालला जाऊन सफरचंदाची बाग खरेदी करण्याची जबाबदारी सोपवली होती. तिथं जाऊन दिलीप कुमार यांनी 1 रुपयांच्या अनामत रकमेवर करार केला होता.

1944 मध्ये ज्वारभाटा या चित्रपटाद्वारे दिलीपकुमारांनी बॉलिवूडमध्ये सुरुवात केली. पुढे पाच दशके म्हणजे 50 वर्षे या अभिनेत्यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रप्रेमींना भुरळ घातली…65 चित्रपट दिलीपकुमारांच्या नावावर आहेत.अंदाज, आन, दाग, देवदास, आझाद, मुगल-ए-आझम, गंगा जमुना, राम और श्याम अशा कित्येक गाजलेल्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे…

1976 नंतर पाच वर्षे दिलीपकुमारांनी अभिनयापासून ब्रेक घेतला. पुनरागमन केले ते क्रांतीसारख्या अजरामर चित्रपटानंच..शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर अशा प्रेक्षकांना आजही भुरळ घालणाऱ्या चित्रपटांनी दिलीपकुमार यांची जादू कायम आहे हे सिद्ध केलं…1998 साली आलेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिलीपकुमार ‘बॉलिवूडच्या गोल्डन एज’मधला शेवटचा तारा होता. तोही आता निखळून पडला.

संबंधित बातम्या:

दिलीपकुमार : अभिनयाचा जादूगार, अभिनेत्रींची पसंती आणि बॉक्सऑफिसचा हुकमी एक्का

Sharad Pawar | देशाने एक महानायक गमावला, शरद पवारांकडून दिलीप कुमारांना श्रद्धांजली

( Dilip Kumar Death Do you know Dilip Kumar did fruits business before enter in Film industry)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.