फटाक्यांचा ना आवाज ना धूर तर बाहेर पडतात भाजीपाला वनस्पती

वायु प्रदूषण यामुळे फटाक्यांना विरोध होतो पण तो मर्यादीत राहतो. दरवर्षी केवळ ध्वनी प्रदूषण मुक्त आणि हवा प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे अवाहन केले जाते. मात्र, त्याचे पालन होताना पाहवयास मिळत नाही. पण जर तुम्हाला फटाके उडवाच म्हटले तर ते योग्य वाटणार नाही. पण एका स्वयंसेवी संस्थेने असे फटाके बनवले आहेत की, ज्यामधून ना धूर येतोय ना मोठा आवाज. तुम्हाला वाटेल मग कसले फटाके.

फटाक्यांचा ना आवाज ना धूर तर बाहेर पडतात भाजीपाला वनस्पती
पर्यावरणपूरक फटाके

मुंबई : उत्साह, नवचैतन्य अन् जीवनात आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे (Diwali Festival) दिवाळी. बाजारातील गजबज आणि नवनविन पदार्थांची मेजवाणी असलेल्या या सणात फटाक्यांच्या आतेषबाजीलाही तेवढेच महत्व आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेले वायु प्रदूषण यामुळे फटाक्यांना विरोध होतो पण तो मर्यादीत राहतो. (fireworks) दरवर्षी केवळ ध्वनी प्रदूषण मुक्त आणि हवा प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे अवाहन केले जाते. मात्र, त्याचे पालन होताना पाहवयास मिळत नाही. पण जर तुम्हाला फटाके उडवाच म्हटले तर ते योग्य वाटणार नाही. (Eco-friendly crackers) पण एका स्वयंसेवी संस्थेने असे फटाके बनवले आहेत की, ज्यामधून ना धूर येतोय ना मोठा आवाज. तुम्हाला वाटेल मग कसले फटाके. (Seed Balls Crackers) पण या फटक्यांची गंमतच अशी आहे की, यातून वेगवेगळे बियाणे बाहेर पडतात व त्याची वनस्पती तयार होते.

आहे की नाही आश्चर्य…असे प्रयोग यापूर्वीही झाले आहेत पण ते राखी पोर्णिमेला. वेगवेगळ्या बियांच्या राखी तयार करायची आणि नंतर ती कुंडीत किंवा शेतामध्ये टाकली तर त्यापासून वेगवेगळ्या वनस्पती उगवत असत. पण फटाक्यांमधून वनस्पती ही संकल्पनाच जरा हटके आहे.
पर्यावरणपूरक दिवाळीसाठी फटाक्यांवर बंदी असेही काही राज्यांमध्ये निर्णय झाले आहेत पण या स्वयंसेवी संस्थेने तयार केलेले फटाके हे अनोखे असून उलट हे खरेदी करा असे अवाहन करणे योग्य राहणार आहे. याला बाजारात ‘सीडबॅाल’ फटाके म्हटले जाते.

अशी होते बियाणांची उगवण

एका स्वयंसेवी संस्थेने हुबेहुब बाजारात मिळणाऱ्या फटाक्यांसारखे फटाके तयार केले आहेत. फरक ऐवढाच आहे की, याचा ना आवाज होतो ना यामधून धूर निघतो. निघतात ते वेगवेगळ्या बिया. वेगवेगळ्या बियाणांची पसरण होते आणि वनस्पतींची उगवण होते. हे फटाके पाण्यात भिजवून जमिनीवर ठेवले जातात जेणेकरून जमिनीवर पडल्यावर त्यांची उगवण होणार आहे. त्यानंतर गरज भासल्यावर पाणी दिले जाते जेणेकरून त्यातून झाडे किंवा भाज्या वाढू शकतात. लवंगी फटाक्यांमध्ये टोमॅटो, गवार, मिरची आणि लक्ष्मी बॉम्बमध्ये आपटे आणि भेंडीचे बियाणे असतात. याशिवाय इतर विविध प्रकारच्या फटाक्यांमध्ये मुळा, ज्वारी, पालक, लाल हरभरा, फ्लॅक्स, काकडी, कांदा आणि वांग्याच्या प्रकारांचा समावेश आहे.

बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी

श्वेता भट्ट यांनी हे पर्यावरणपूरक फटाके बनवले आहेत. त्यांच्या या उपक्रमाला ‘सीडबॉल’ म्हणतात. श्वेता भट्टड यांच्या टीमने यापूर्वी 10,000 फटाक्यांचे 1500 संच बनवले होते. यापैकी 8 संच गेल्या वर्षी विकले गेले होते. फटाक्यांच्या या सीडबॉलची किंमत 299 ते 60 रुपयांपर्यंत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील पाडळसिंग गावात पर्यावरणाच्या संरक्षणासाठी श्वेता आणि तिची टीम विविध उपक्रम राबवतात. सीडबॉल हा श्वेताचा पर्यावरणस्नेही उपक्रमही आहे. तसेच जवळच्या सात गावांतील 100 हून अधिक महिलांना असे सीडबॉल बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिलांना दररोज 250 ते 300 रुपये रोजगार मिळत आहे

फटाके फुटल्यानंतर भाज्या वाढतील

या फटाक्यांकडे पाहून तुम्ही असं म्हणणार नाही की यामध्ये दारुगोळा नाही. ते अगदी बाजारात विकल्या गेलेल्या सामान्य फटाक्यांसारखे दिसतात. यामधील दारु ही पर्यावरणाला हानी पोहचवणारी नाही तर पर्यावरणपूरक आहे. हे फटाके फुटल्यानंतर यातील बियांमुळे भाजीपाल्याची किंवा कोणत्याही वनस्पती तयार होणार आहे.

प्रत्येक फटाक्यावर भाजी आणि बियाणांची नावे

या पर्यावरणपूरक फटाक्यांची रचना ही बाजारातील फटाक्यांप्रमाणेच आहे. फरक ऐवढाच आहे की, या प्रत्येक फटाक्यावर त्या भाज्याचे किंवा वनस्पतींचे नाव लिहण्यात आले आहे. जेणे करुन नागरिकांना ते घरात किंवा कुंडीत लावता येणार आहे.

संबंधित बातम्या :

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM KISAN च्या 10 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार

विमा योजनेच अव्वल असणारे नांदेड अद्यापही परताव्यात मात्र ‘वेटींग’वरच काय आहे कारण?

सोयाबीनचे पावसाने नुकसान झाले तरी बुस्कटाचा ‘असा’ हा उपयोग
avi8mXPonCg

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI