PM Kisan: पीएम किसानच्या यादीत नाव, तरीही अडकू शकतो हप्ता, लागलीच करा हे तीन काम
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. पण हा हप्ता अडकू शकतो. त्यासाठी हे तीन काम झटपट उरकून घ्या. नाहीतर तुमचा शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता अडकू शकतो.

PM Kisan Yojana: शेतकरी सन्मान निधी योजनेचा 24 व्या हप्त्याची सध्या शेतकरी वाट पाहत आहेत. पण हा हप्ता अडकू शकतो. त्यासाठी हे तीन काम झटपट उरकून घ्या. लाभार्थी यादीत नाव असताना (Beneficiary List) काही त्रुटींमुळे खात्यात दोन हजार रुपये जमा होत नाहीत. जर तुमचे नाव यादीत असेल आणि तुम्हालाही हप्ता अडकण्याची भीती असेल तर अगोदर त्रुटी दूर करा. त्यासाठी ईकेयावसीची (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करून हप्ता मिळवू शकता.
कशी कराल e-KYC?
शेतकरी तीन प्रकारे पीएम किसान योजनेसाठी ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
OTP आधारे e-KYC (पीएम किसान पोर्टल आणि मोबाईल ॲपवर आधारीत)
बायोमॅट्रिक आधारे e-KYC (कॉमन सर्व्हिस सेंटर आणि राज्य सेवा केंद्रावरून करता येईल)
फेस ऑथेंटिकेशन आधारे e-KYC (पीएम किसान मोबाइल ॲपवर उपलब्ध )
OTP आधारे e-KYC अशी करा
पीएम किसान योजनेच्या अधिकृत साईटवर जा
e-KYC पर्यायावर क्लिक करा
या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक नोंदवा आणि मोबाईलवर आलेला OTP नोंदवा.
फेस ऑथेंटिकेशन आधारे e-KYC
Google Play Store मध्ये PM-Kisan Mobile App आणि Aadhaar Face RD App डाऊनलोड करा
आता ॲप उघडा आणि पीएम किसान नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन करा
Beneficiary Status या पेजवर जा.
याठिकाणी e-KYC ची स्थिती No दाखवत असेल तर e-KYC वर क्लिक करा
यानंतर तुमचा आधार क्रमांक नोंदवा, तुमचा चेहरा स्कॅन करा
चेहरा स्कॅन झाल्यावर तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल
बँक खात्याला आधार कार्डशी लिंक करा
पीएम किसान योजनेची रक्कम Direct Benefit Transfer (DBT) द्वारे आधार खात्याशी संबंधित खात्यात जमा होते. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर रक्कम खात्यात जमा होणार नाही. त्यासाठी बँक शाखेत जा. Aadhaar Seeding Form भरा. तुमचे खाते NPCI च्या खात्याशी लिंक करा. त्यानंतर पीएम किसान योजनेच्या साईटवर जाऊन Know Your Status मध्ये Aadhaar Bank Seeding Status तपासाल.
पीएम किसानसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक
पीएम किसान योजनेत आता शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. या डिजिटल प्रणालीत प्रत्येक शेतकर्याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो. शेतीसंबंधीत योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ मिळण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीसोबतच ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे.