Latur Market : हंगामाचा शेवटही निराशजनक, सोयाबीनसह रब्बीतील शेतीमालाचे दर स्थिरच

Latur Market : हंगामाचा शेवटही निराशजनक, सोयाबीनसह रब्बीतील शेतीमालाचे दर स्थिरच
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.
Image Credit source: TV9 Marathi

खरीप हंगामातील पिकांच्या दरापेक्षा पावसाने झालेल्या नुकसानीचीच अधिकची चर्चा होती. पीक काढणीच्या दरम्यान राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उत्पादनात घट तर झालीच पण शेतीमालाचा दर्जाही ढासळला होता. त्यामुळे उत्पादन घटून कापसाला 6 हजार तर सोयाबीनला 4 हजार 700 रुपये असा दर होता. परंतू दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा शेतीमाल साठवणूकीवर भर दिला.

राजेंद्र खराडे

|

May 28, 2022 | 3:24 PM

लातूर :  (Kharif Season) खरीप हंगामातील शेतीमालाची आवक सुरु होत असताना कवडीमोल दर होता तर आता अंतिम टप्प्यातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. गतवर्षी खरिपातील सोयाबीन, कापूस यासह इतर शेतीमालाच्या दरात वाढ होणार हे निश्चत होते. मात्र, उचल खाल्ली ती (Cotton) कापसाने. सुरवातीपासूनच कापसाला उठाव होता. पण अधिक प्रमाणात घेतल्या गेलेल्या (Soybean Rate) सोयाबीनचे दर हे संपूर्ण हंगामात नियंत्रणात राहिले आहेत. त्यामुळे उत्पादन घटूनही अधिकचा दर मिळाला नाही तर दुसरीकडे कापूस 13 हजार क्विंटलप्रमाणे विकला गेला. खरिपातील कापसाने दराच्या बाबतीत साथ दिली असली उत्पादनात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे हंगामाची सुरवात आणि शेवटही शेतकऱ्यांसाठी निराशजनकच राहिला आहे.

हंगामाची सुरवातही धिम्या गतीनेच

खरीप हंगामातील पिकांच्या दरापेक्षा पावसाने झालेल्या नुकसानीचीच अधिकची चर्चा होती. पीक काढणीच्या दरम्यान राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उत्पादनात घट तर झालीच पण शेतीमालाचा दर्जाही ढासळला होता. त्यामुळे उत्पादन घटून कापसाला 6 हजार तर सोयाबीनला 4 हजार 700 रुपये असा दर होता. परंतू दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा शेतीमाल साठवणूकीवर भर दिला. त्याचाच परिणाम म्हणून दिवाळीनंतर सोयाबीन आणि कापसाच्या दरात अमूलाग्र बदल झाला आहे. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात पुन्हा सोयाबीन घसरले असून 6 हजार 700 रुपये क्विंटलवर आले आहे.

काय आहे शेतीमालाच्या दराची स्थिती?

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन, तूर, हरभरा याच मुख्य पिकांची आवक सुरु आहे. हरभरा आणि तुरीसाठी नाफेडने हमीभाव केंद्र सुरु केले आहे. पण यंदा हमीभाव केंद्रावर अधिक अन् खुल्या बाजारपेठेत अधिकचे दर आहेत. हमीभाव केंद्रावर तुरीला 6 हजार 300 प्रति क्विंटल तर खुल्या बाजारात 6 हजार असा दर आहे. हरभऱ्याच्या दरामध्ये मोठी तफावत आहे. खरेदी केंद्रावर हरभऱ्यााला 5 हजार 300 असा दर ठरवून देण्यात आला आहेत तर दुसरीकडे खुल्याा बाजारात केवळ 4 हजार 600 पर्यंतचा दर आहे. त्यामुळे कापूस वगळता इतर सर्वच शेतीमालाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम

केंद्र सरकराच्या धोरणावरच शेतीमालाचे दर अवलंबून आहेत . यंदा तर सोयाबीनच्या दरात कायम बदल होता पण विक्रमी दर अधिकचा मिळालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अखेरपर्यंत सोयाबीनची साठवणूकच केली. आता सोयाबीन हंगामाच्या अंतिम टप्प्यात असतानाही निकृष्ट आणि साधारण सोयाबीन एकच दर देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मात्र, गतवर्षी पावसामुळे झालेल्या नुकसानीमध्ये सोयाबीनचा दर्जाही घसरला होता. असे असताना एकच किंमत ही ठरविता येणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें