AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत मोठा गोंधळ, काय आहे ‘हेअरकट’? शेतकऱ्यांना बसणार फटका? कृषिमंत्र्यांनी काय दिले उत्तर?

punyashlok ahilyadevi holkar farmer loan waiver scheme: शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीदरम्यान एक मोठी अडचण समोर आली आहे. बँका हेअरकट अडून शेतकऱ्यांना नडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे याविषयीची तक्रार केली. काय आहे हेअरकट? काय दिले कृषिमंत्र्यांनी उत्तर?

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत मोठा गोंधळ, काय आहे 'हेअरकट'? शेतकऱ्यांना बसणार फटका? कृषिमंत्र्यांनी काय दिले उत्तर?
हेअरकट वरून मोठा गोंधळ
| Updated on: Jul 30, 2026 | 1:18 PM
Share

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 553 पात्र शेतकऱ्यांची यादी 22 जुलै जाहीर करण्यात आली. तर आता दुसऱ्या टप्प्यात 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात ही यादी प्रसिद्ध होईल. पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. महाआयटी पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. तर बँका हेअरकट अडून शेतकऱ्यांना नडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

‘हेअरकट’ म्हणजे काय?

शेतकऱ्यांचे बँकेत कर्ज खाते असते. त्यात एक रक्कम असते आणि कर्जमाफीची जी यादी प्रसिद्ध झालेली आहे. त्यातील रक्कम यांच्यात तफावत दिसत आहे. त्यालाच हेअरकट म्हणतात. खरंतर याच्याशी शेतकऱ्यांचा काहीही संबंध नाही. राज्य सरकार आणि बँका यांच्यातील आर्थिक तडजोडीची ही प्रक्रिया आहे. थकीत कर्जाचा किती वाटा सरकार उचलेल तर बँका किती हिस्सा उचलतील याविषयीची आर्थिक तडजोड निश्चित करण्यात येते. त्याचा सरकारच्या मूळ कर्जमाफी रक्कमेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. पण काही बँका त्यावर खुटून बसल्याचे दिसते. त्याविरोधात शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावर कृषिमंत्र्यांनी चिंता न करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार आणि बँका यांच्यामधील करारानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण होण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शासन आणि बँकांमधील हेअरकट सूत्र

1 वर्षांपर्यंत थकीत कर्ज असल्यास सरकार 85 टक्के तर बँका 15 टक्के वाटा उचलते

2 वर्षांपर्यंत थकीत कर्ज असल्यास सरकार 70 टक्के आणि बँका 30 टक्के

3 वर्षांपर्यंत थकीत कर्जावर सरकार 55 टक्के तर बँक 45 टक्के

4 वर्षांपर्यंतच्या थकीत कर्जातील सरकारी वाटा 45 टक्के तर बँकांवरील बोजा 55 टक्के

आता या पेक्षा अधिक काळ कर्ज थकीत असल्यास सरकार 35 टक्के तर बँकेचा वाटा 65 टक्के इतका असतो

शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

साधारणत: 16 लाख 96 हजार खात्यांना कर्जमाफीसंदर्भातील दुसरी यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यांना आपण विशिष्ट क्रमांकही दिलेला आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. तर कर्जमाफीविषयीची जी कागदपत्रे सांगण्यात आलेली आहे, त्याची पूर्तता करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असेल. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड झाल्याची माहिती त्यांनी सादर केली आहे.

कर्जमाफीतील ठळक मुद्दे

56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी

योजनेसाठी 36 हजार 585 कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रुपयांची तरतूद

यापूर्वी कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांऐवजी 2 लाख रुपयांची मदत

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा