Sangli : भावकीचा वाद विकोपाला, त्रस्त शेतकऱ्याचे जतमध्ये ‘शोले स्टाईल’ आंदोलन..!

बापूसाहेब शिंदे यांनी जमीनीची वाटणी करण्यासाठी जत तहसीलदारांचा दरवाजा ठोठावला. त्यासाठी शिंदे शुक्रवारी जत मधल्या तहसील कार्यालय आवारात पोहोचले. मात्र, त्या ठिकाणी त्याची भावकीतले कोणीच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बापूसाहेब शिंदे यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या दुय्यम निबंध कार्यालयासमोरील दूरध्वनीच्या खांबावर चढून जोर-जोराने न्याय देण्याची मागणी सुरु केली.

Sangli : भावकीचा वाद विकोपाला, त्रस्त शेतकऱ्याचे जतमध्ये 'शोले स्टाईल' आंदोलन..!
शेतीच्या वादातून त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांने न्यायाची मागणी करीत थेट दूरध्वनीच्या खांबावर चढून न्यायाची मागणी केली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 10:54 AM

सांगली :  (Farm) शेतीवरुन भावकीचा वाद हा काही नवीन नाही. पण सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील शेतकऱ्याने वेगळीच भूमिका घेतली आहे. (Demand for justice) न्यायाची मागणी करीत शेतकऱ्याने थेट दूरध्वनीच्या खांबावर चढून आंदोलन केल्याचा प्रकार घडला आहे. शेतकऱ्याच्या या अजब प्रकारामुळे मात्र, प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. भावकी सोबत असलेल्या (Farm land disputes) शेत जमिनीच्या वादातून हा प्रकार समोर आला आहे. कारण क्षुल्लक असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून यावर तोडगा निघत नसल्याने वाळेखिंडी येथील बापूसाहेब शिंदे यांनी पाऊल उचलले आहे. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेणार हे देखील पाहणे महत्वाचे राहणार आहे.

नेमके काय आहे कारण?

बापूसाहेब शिंदे यांच्या जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील शेतातील विहिरीवर त्यांच्या भावकीतील सदस्यांनी बेकायदेशीर रित्या आकडा टाकून वीज कनेक्शन घेतले होते. सदरचा प्रकार समोर आल्यानंतर वीज वितरण कंपनीकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर बापूसाहेब शिंदे यांनी भावकीला कायदेशीररित्या वीज कनेक्शन घेण्याचे बजावले.मात्र, या उलट भावकीने शिंदेंन मारहाण केली. याबाबत बापूसाहेब शिंदे यांनी गावातल्या पंचांकडे न्याय देण्याबाबत मागणी केली.

प्रशासनाकडूनही दुर्लक्ष, म्हणून आंदोलनाचा निर्णय

बापूसाहेब शिंदे यांनी जमीनीची वाटणी करण्यासाठी जत तहसीलदारांचा दरवाजा ठोठावला. त्यासाठी शिंदे शुक्रवारी जत मधल्या तहसील कार्यालय आवारात पोहोचले. मात्र, त्या ठिकाणी त्याची भावकीतले कोणीच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बापूसाहेब शिंदे यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या दुय्यम निबंध कार्यालयासमोरील दूरध्वनीच्या खांबावर चढून जोर-जोराने न्याय देण्याची मागणी सुरु केली. हा प्रकार पाहून या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. शेताची वाटणी करुन हा वाद मिटेल असे शिंदे यांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

आश्वासनानंतर शिंदेंची माघार

भावकीतील भांडणामुळे त्रस्त असलेले बापूसाहेब शिंदे यांनी थेट दूरध्वनीच्या खांबावर चढून आंदोलन केले. एवढेच नाहीतर ते न्याय द्या अशी मागणीही करीत होते. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अखेर जत नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश माने व काही जणांनी बापूसाहेब शिंदे यांची समजूत घालून त्यांना समजावून त्यांन न्याय देण्याचे आश्वासन देऊन खाली उतरवलं. मात्र, शिंदे यांच्या खांबावरील या स्टंटबाजीच्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.