फुल शेतीतून शेतकऱ्याच्या जीवनात दरवळेल उत्पन्नाचा सुगंध, जाणून घ्या लागवडीची योग्य पध्दत..!

| Updated on: Jan 21, 2022 | 2:39 PM

सजावटीच्या फुलांची मागणी भारतासह जगभरात सतत वाढत आहे. लिलीची फुले केवळी आकर्षक दिसतात असे नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीही घेऊन येतात. लिली हे खासकरुन सजावटीसाठी वापरले जाणारे फूल आहे. यामध्ये अनेक वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे प्रकार आहेत. त्यामुळे शेतकरी लिली फूलाची लागवड करून उत्पन्नाची नवीन दारे उघडी करु शकतात.

फुल शेतीतून शेतकऱ्याच्या जीवनात दरवळेल उत्पन्नाचा सुगंध, जाणून घ्या लागवडीची योग्य पध्दत..!
लिली फुलशेतीतून भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Follow us on

मुंबई : उत्पादनवाढीसाठी सर्वात महत्वाचे आहे बाजारपेठेतील मागणी, काळाच्या ओघात पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांवर भर न देता त्यामध्ये बदल करुन उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या लिली फुलशेती हा शेतकऱ्यांसमोरील सर्वोत्तम पर्याय आहे. सजावटीच्या फुलांची मागणी भारतासह जगभरात सतत वाढत आहे. (Lily Flowers) लिलीची फुले केवळी आकर्षक दिसतात असे नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीही घेऊन येतात. लिली हे खासकरुन सजावटीसाठी वापरले जाणारे फूल आहे. यामध्ये अनेक वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे प्रकार आहेत. त्यामुळे ( Farmer) शेतकरी लिली फूलाची लागवड करून उत्पन्नाची नवीन दारे उघडी करु शकतात. लिली  (exotic flower) विदेशी फुलाची असली तरी भारतात ती दिवसेंदिवस प्रचलित होत चालले आहे. पॉली हाऊसमध्ये तर वर्षभर त्याचे उत्पादन शक्य आहे. असे असले तरी व्यवसायिक स्वरुप अद्यापपर्यंत मिळालेले नाही हे दुर्देव. सध्या आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशातील शेतकरीच लिलीची फुले पिकवत आहेत. महाराष्ट्रातही त्याची लागवड केली जात आहे.

लिलीची फुलाची अशी करा लागवड

लिलीची लागवड तीन टप्प्यांत केली जाते. पहिल्या टप्प्यात टिश्यू प्रक्रियेतून नर्सरी तयार करतात. हे काम मोठ्या प्रयोगशाळा किंवा कंपन्यांमध्ये केले जाते. दुसऱ्या टप्प्यात नर्सरीत लागवड केली जाते. या वनस्पतीला फुले मिळत नाहीत तर कंद मिळतात. तिसऱ्या टप्प्यात ते कंद भांड्यांमध्ये लावले जातात यातूनच फुले मिळतात. डोंगराळ राज्यांमधील वातावरण लिली फुलासाठी अनुकूल आहे. अशा भागातील शेतकरी पॉलिहाऊस शिवाय उघड्यावरही लिलीची लागवडही करू शकतात. तर मैदानी भागात लिली लागवडीसाठी पॉलि हाऊसची आवश्यकता असते.

पॉलि हाऊसमध्ये लागवडीसाठी 2.5 किलो कोकोपेट, 2.5 किलो गांडूळ खत, 2.5 किलो स्ट्रॉ आणि 5 किलो कोळशाची राख आवश्यक आहे. या सर्वाचे मिश्रण लागवड करणार असलेल्या क्षेत्रावर टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर कंदची लागवड करावी लागते. कंद वाढायला तीन महिने लागतात पण याच काळात चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन केले तर नुकसान टळणार आहे. लागवडीनंतर तीन महिन्यांनंतर कंद तयार होते आणि त्यानंतर त्याची मुळासकट काढणी केली जाते.

देशामध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध

लिली फुलातून तर भरघोस उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडते. मात्र, ज्या प्रमाणे कांद्याच्या रोपाला मागणी आहे त्याच प्रमाणे या लिली फुलाचे कंद विकून मोठे पैसे कमवता येतात. जर कंद विकायचे नसतील तर ते भांड्यात ठेवा आणि फुले वाढवून थेट विका. आधीच तयार केलेले मिश्रण प्रत्येकी तीन कंदांनी भरलेले आहे. त्यानंतर कंद मिश्रणाने झाकला जातो. लागवड केल्यानंतर लगेच पाणी फवारणे महत्त्वाचे आहे. 7 दिवसांनंतर पॉलि हाऊसचे तापमान 20 ते 25 अंशांवर निश्चित करणे योग्य आहे.

कंद लागवडीनंतर 30 दिवसांनी हिरवी कळी दिसते आणि त्यानंतर लगेचच फुले फुलतात. लिलीची लागवड सध्या भारतात फारच कमी प्रमाणात होत आहे. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांशी आधीच व्यवहार करतात. याचा फायदा असा आहे की शेतकऱ्यांना बाजारात जाण्याची गरज नाही.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती, सोयाबीनची विक्री की साठवणूक, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे बाजारपेठेतले चित्र?

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: घोटाळेबाजांना आळा घालण्यासाठी पीएम किसान योजनेत काय झाला बदल?

सांगलीच्या हळद-बेदाण्याला भौगोलिक मानांकन, अधिकृत वापरकर्तासाठी काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर