Nashik : तुम्हीही शेतकऱ्यांचीच मुलं, द्राक्ष उत्पादकांची बाजू समजून घ्या..! बागायतदार संघाचा निर्णय टिकणार का मोडीत निघणार..!

Nashik : तुम्हीही शेतकऱ्यांचीच मुलं, द्राक्ष उत्पादकांची बाजू समजून घ्या..! बागायतदार संघाचा निर्णय टिकणार का मोडीत निघणार..!
संग्रहीत छायाचित्र

तुम्हीही शेतकऱ्यांचीच मुले आहात. गेल्या तीन वर्षात द्राक्ष उत्पादकांची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठीच हा दराचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वानीच सहानभूतीने विचार केला तर शेतकऱ्यांना हा अपेक्षित दर मिळू शकतो. ही वाक्ये आहेत द्राक्ष बागायतदार संघाची.

राजेंद्र खराडे

|

Jan 21, 2022 | 1:03 PM

नाशिक : तुम्हीही शेतकऱ्यांचीच मुले आहात. गेल्या तीन वर्षात (Grape Farmer) द्राक्ष उत्पादकांची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे अशा (Untimely Rain) प्रतिकूल परस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठीच हा दराचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वानीच सहानभूतीने विचार केला तर शेतकऱ्यांना हा अपेक्षित दर मिळू शकतो. ही वाक्ये आहेत द्राक्ष बागायतदार संघाची. गेल्या काही दिवसांपासून (Grape Growers Association) बागायतदार संघाने ठरवलेल्या द्राक्षांच्या दराला काही निर्यातदारांकडून विरोध होत आहे. मात्र, दर निश्चितीचा निर्णय हा गेल्या वर्षभरात निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान पाहूनच घेतलेला आहे. उत्पादनावर झालेल्या खर्चाच्या केवळ 10 टक्के फायदा मिळावा या अनुशंगाने जानेवारीतील निर्यातीचा दर हा 82 रुपये किलो ठरविण्यात आला आहे. हाच दर कायम ठेवण्याचा सूर बागायतदार संघ आणि निर्यातदारांमध्ये झालेल्या बैठकीत निघाला आहे.

निम्म्यानेच होतेय मागणी

जानेवारी महिन्यासाठी 82 रुपये किलो असा दर ठरवण्यात आला आहे. पण रशियामध्ये निर्यात करण्यासाठी निर्यातदारांकडून थेट 45 रुपये किलोनेच मागणी होत आहे. रशियाच्या मार्केटींगसाठी द्राक्ष बागायतदार संघाने ठरवून दिलेला दर परवडत नसल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे काही भागातील काढणीच बंद झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कमी दराने द्राक्षांची विक्री करावी लागली तर आता काढणीच बंद आहे. दुसरीकडे दर्जाहीन द्राक्ष स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्याची नामुष्की ओढावली आहे.

नाशिकमध्ये गोंधळ इतर जिल्ह्यात काय?

गेल्या तीन वर्षापासून द्राक्ष बादगायत उत्पादकांचे नुकसान होत आहे. यंदा तर निसर्गाच्या लहरीपणामुळे अधिकचे नुकसान झाले आहे. शिवाय असे होऊनही काढणीनंतर योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम आहे. त्यामुळे यंदा प्रथमच द्राक्ष बागायतदार संघाने हस्तक्षेप करीत उत्पादनावरील झालेल्या खर्चानुसार केवळ 10 टक्के फायदा ग्राह्य धरुन दर ठरवले आहेत. अशाच प्रकारचा निर्णय सांगली, सोलापूर या विभागातही झाला आहे. मात्र, काढणी सुरु असतानाच नाशिक जिल्ह्यात दराला घेऊन मतभेद सुरु झाले आहेत. निर्यातदार हे दर अधिकचे झाले आहेत म्हणून काढणी थांबवत आहेत तर शेतकऱ्यांची अडचण होत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातच काढणी कामे सुरु आहेत. त्यामुळे तेथील मतभेद बाहेर येत असून इतर विभागात काय होणार हे पहावे लागणार आहे

बैठक सकारात्मक, निर्णय मोडणार नाही

द्राक्ष दराला घेऊन निर्यातदार आणि शेतकरी यांच्यामध्ये मतभेद झाले होते. रशिया येथे निर्यात करण्यात येणाऱ्या द्राक्षांना ठरलेला दर अधिकचा आहे असे निर्यातदारांचे म्हणणे आहे. तर बागायतदार संघाने 82 रुपये किलोने ठरवून दिलेला दर आहे तो मोडीत काढायचा नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, आता सर्वांना घेऊन बैठक पार पाडलेली आहे. द्राक्ष दर ठरविण्यामागचे गणित निर्यातदारांना समाजावून सांगितले आहे. शिवाय त्यांनीही मान्य केल्याने त्याच दराने विक्री होणार असल्याचे संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या :

सांगलीच्या हळद-बेदाण्याला भौगोलिक मानांकन, अधिकृत वापरकर्तासाठी काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर

Kisan Rail : शेतकऱ्यांना हवा ‘किसान रेल’चा आधार, उत्पादन वाढले शेतीमाल वाहतूकीसाठी साकडे

Turmeric Crop: वर्षभर प्रयत्नांची पराकष्टा, आता सर्वकाही दरावर अवलंबून

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें