सांगलीच्या हळद-बेदाण्याला भौगोलिक मानांकन, अधिकृत वापरकर्तासाठी काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर

एखाद्या पिकाला भौगोलिक मानांकन हे त्याचा दर्जा आणि गुणधर्मामुळे मिळालेला असतो. त्याचे वेगळेपण टिकून ठेवले तर शेतीमालाला योग्य दर आणि बाजारपेठही सहज उपलब्ध होते. सांगली येथील हळद आणि बेदाण्याला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे पण याच मानांकनाखाली आपल्याही शेतीमालाची गणना व्हावी याकरिता शेतकरी हे पुढे येत आहेत.

सांगलीच्या हळद-बेदाण्याला भौगोलिक मानांकन, अधिकृत वापरकर्तासाठी काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 12:18 PM

सांगली : एखाद्या पिकाला (Geographical rating) भौगोलिक मानांकन हे त्याचा दर्जा आणि गुणधर्मामुळे मिळालेला असतो. त्याचे वेगळेपण टिकून ठेवले तर शेतीमालाला योग्य दर आणि (Market) बाजारपेठही सहज उपलब्ध होते. सांगली येथील हळद आणि बेदाण्याला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे पण याच मानांकनाखाली आपल्याही शेतीमालाची गणना व्हावी याकरिता शेतकरी हे पुढे येत आहेत. भौगोलिक मानांकनाचा फायदा हा परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा हाच मानस (Agricultural Department) कृषी विभागाचाही राहिलेला आहे. त्याच अनुशंगाने सांगली कृषी विभागाकडे 700 प्रस्ताव दाखल झाले आहेत. संबंधित संस्थांकडे वापरकर्ता म्हणून नोंदणी करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. या प्रस्तावाला अधिकृत परवाना मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

असे झाले आहेत प्रस्ताव दाखल

सांगली येथील बेदाणा आणि हळदीसाठी भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. या ब्रॅंडखाली शेतीमालाची विक्री व्हावी म्हणून बेदाण्यासाठी कृषी विभागाकडे 550 तर हळदीसाठी 180 शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत. वापरकर्तासाठी हे प्रस्ताव असून आता पुढील प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतरच शेतकऱ्यांना या ब्रॅंडच्या नावाखाली याची विक्री करता येणार आहे.

मानांकान अधिकृत वापरकर्ता बनण्याची काय आहे प्रक्रिया

भौगोलिक मानांकनाच्या वापरकर्ता होण्यासाठी चेन्नई येथील मानांकन कार्यालयात नोंद करावी लागते. ही नोंदणी जानेवारी ते मार्च दरम्यान सुरु असती. याकरिता शेतकऱ्यांना केवळ 10 रुपयांचा खर्च आहे. आता या मानांकनासाठी अधिकच्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून जिल्हानिहाय लक्षांक देण्यात आलेले आहे. यातील वापरकर्ता शेतकरी व्हायचे असल्यास कृषी विभागाकडे केवळ 10 रुपयांमध्ये नोंदणी होणार आहे. मात्र, खासगी संस्थाकडून तीन हजार रुपये आकारले जातात.

काय होतो फायदा ?

भौगोलिक सूचकांक मानांकन ही भारत सरकारतर्फे, उत्पादनांना त्याच्या दर्जानुसार व गुणवत्तेनुसार मानांकन देण्यासाठी राबविण्यात येणारी एक व्यवस्था आहे. लहे मानांकन केंद्र सरकारच्या ‘औद्योगिक धोरण व प्रोत्साहन’ विभागातर्फे जारी करण्यात येते. हे मानांकन एक प्रकारचे चिन्ह आहे जे, त्या उत्पादनाच्या मूळ भौगोलिक स्थानाकडे निर्देश करते. स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर त्याचा सकारात्मक परिणाम होते. याने त्या उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण होते.

संबंधित बातम्या :

Kisan Rail : शेतकऱ्यांना हवा ‘किसान रेल’चा आधार, उत्पादन वाढले शेतीमाल वाहतूकीसाठी साकडे

Turmeric Crop: वर्षभर प्रयत्नांची पराकष्टा, आता सर्वकाही दरावर अवलंबून

केजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.