शेतकऱ्यांचे प्रश्न आता एका फोनवर लागणार मार्गी, कोणत्या राज्यात सुरु झाला अनोखा उपक्रम?

राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांसाठी एक किसान कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. या माध्यमातून शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी फोन करु शकतात. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत शेतकऱ्यांना कॉल सेंटर उपलब्ध होणार आहे. स्मार्ट फोन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप नंबरवर संपर्क साधता येणार आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न आता एका फोनवर लागणार मार्गी, कोणत्या राज्यात सुरु झाला अनोखा उपक्रम?
पीएम किसान सन्मान योजनेसाठीची नोंदणी आता मोबाईलद्वारेही करता येणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 3:13 PM

मुंबई : केवळ मार्गदर्शन मिळत नसल्याने शेती व्यवसयातून योग्य ते उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हीच स्थिती शेतकऱ्यांची आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न हे एका फोनवर सुटले तर..! वाटले ना आश्चर्य पण खरंच ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर काय होईल? आता ही केवळ एक कल्पनाच राहिली नाहीतर (Jharkhand Government) झारखंड सरकारने हे प्रत्यक्षात उतरवले आहे. राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांसाठी एक किसान (Call Center) कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. या माध्यमातून शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी फोन करु शकतात. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत शेतकऱ्यांना कॉल सेंटर उपलब्ध होणार आहे. स्मार्ट फोन वापरणाऱ्या (Farmer) शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप नंबरवर संपर्क साधता येणार आहे.

एवढेच नाही तर वेबसाइटच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही मदत केली जाणार आहे. झारखंडचे कृषी, पशुसंवर्धन आणि सहकार मंत्री बादल यांनी बुधवारी किसान कॉल सेंटरसुरू केले.रांचीयेथे त्याचे औपचारिक उद्घाटन केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता केवळ एक फोन आणि एक क्लिक एवढेच करावे लागणार असल्याचे बादल यांनी सांगितले.

शेतकऱ्यांकडे तीन मार्ग

शेती करीत असताना येणाऱ्या समस्यांवर तोडगा निघाला तरच शेतकरी पुढे जाऊ शकणार आहे. त्यामुळे झारखंड येथील शेतकऱ्यांना 1800-123-1136 या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा लागणार आहे. व्हॉट्सअॅप नंबर 8797891222 देखील वापरता येईल. वेबसाइट kccjharkhand.in आपल्याला आपल्या समस्या, समस्या ठेवण्यास सक्षम करेल. अशा प्रकारे शेतकऱ्यांना फोन कॉल, ऑनलाइन पोर्टल आणि एसएमएसद्वारे ही मोफत माहिती आणि उपायही मिळवू शकणार आहेत. शेतीमध्ये वापरली जाणारी नवीन तंत्रे आणि इतर माहितीही येथून उपलब्ध होणार आहे.

आत्याधुनिक प्रणालीचा होईल फायदा

सध्या सबंध जगभर मोबाईचा वापर वाढत आहे. प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने त्याचा योग्य वापर होणेही गरजेचे आहे. हाच प्रयोग झारखंड सरकार राबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांना एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या दरम्यान महत्वाचे असते ते योग्य मार्गदर्शन. आणि याच समस्येवर झारखंड सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पध्ततीने प्रयोग राबवणारे हे कदाचित पहिलेच राज्य आहे. ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना बांधावर असतानाही घेता येणार आहे. हे झारखंड सरकारला शक्य झाले मग महाराष्ट्रात का नाही हा मुद्दाही महत्वाचा आहे. मात्र, या अनोख्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

सोयाबीनचे दरात घट होताच पुन्हा शेतकऱ्यांची तीच ‘खेळी’ पण, यावेळी येणार कामी, काय आहे बाजारपेठतले वास्तव?

Banana Farming: आवक घटली मागणी वाढली, अखेर केळीच्या दरात सुधारणा झाली

Sugarcane Crop: अतिरिक्त ऊसाचे गाळप रखडले पण क्षेत्र मोजायचे कसे? जानेवारी अखेरीस अहवालातून चित्र स्पष्ट

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.