AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : परळीकरांची चाढ्यावर मूठ, पेरणीबरोबर नवे संकटही ओढावले शेतकऱ्यांनी, वाचा सविस्तर

खरीप हंगामातील पिके ही पावसावरच अवलंबून आहेत. सध्या बरसलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा असला तरी ही ओल पेरणीसाठी पोषक नाही. दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील सावरगांव, मांडवा आणि धर्मापूरी या परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र, हा पाऊस स्थिरावलेला नाही. दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा उघडीप झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करुन नये असा सल्ला कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी दिला आहे.

Beed : परळीकरांची चाढ्यावर मूठ, पेरणीबरोबर नवे संकटही ओढावले शेतकऱ्यांनी, वाचा सविस्तर
यंदा पुणे विभागाच सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर पेरा झाला आहेImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 18, 2022 | 12:28 PM
Share

परळी :  (Marathwada) मराठवाड्यात आता कुठे ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले आहे . या विभागातील बीड, जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसानेही हजेरीही लावलेली आहे. मात्र, हा पाऊस काही (Sowing) पेरणीयोग्य बरसलेला नाही. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये 49 मिमी पावसाची नोंद झाली आहे. असे असतानाही सावरगाव, मांडवा, धर्मापुरी या भागातील शेतकऱ्यांनी (Kharif Season) खरिपाच्या पेरणीला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांच्या या गडबडीमुळेच दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अजूनही जिल्ह्यात अनिश्चित अशा स्वरुपाचाच पाऊस बरसत आहे. शिवाय खरिपातील पिकांना पाण्याची गरज असते अशा परस्थितीमध्ये पावसाने ओढ दिली तर अधिकचे नुकसानच होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

अन्यथा दुबार पेरणीचे संकट..

खरीप हंगामातील पिके ही पावसावरच अवलंबून आहेत. सध्या बरसलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा असला तरी ही ओल पेरणीसाठी पोषक नाही. दोन दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील सावरगांव, मांडवा आणि धर्मापूरी या परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र, हा पाऊस स्थिरावलेला नाही. दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा उघडीप झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करुन नये असा सल्ला कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी दिला आहे. पुरेशी ओल नसल्याने पिकांची वाढ होणार नाही परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही

पीक पेरणीपूर्वीच मशागत आणि बी-बियाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसो मोजावे लागले आहेत. वाढती महागाई आणि यंदा खताचा मर्यादित झालेला पुरवठा यामुळे मशागतीच्या कामापासून ते बियाणांपर्यंत सर्वकाही महागले आहे. तर दुसरीकडे शेतीमालाचे दर तर घसरत आहेतच पण उत्पादनाचीही शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता अपेक्षित पावसाची वाट पाहणे महत्वाचे आहे. अन्यथा तेलही गेले अन् तूपही अशी अवस्था होण्याचा धोका आहे.

पेरणीची स्थिती काय आहे?

मराठवाड्यात खरीप हंगामात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. पण गतवर्षी कापसाला मिळालेला विक्रमी दर अन् सध्याची मागणी लक्षात घेता परळी तालुक्यात पुन्हा पांढऱ्या सोन्याच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज आहे. असे असले तरी सोयाबीन अव्वल स्थानी राहणार यात शंका नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. तर तालुक्यातील एका मंडळाचे क्षेत्र सोडता उर्वरित क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नाहीत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच