क्रांतीदिनादिवशी दूध उत्पादकांचा एल्गार, दूधाच्या रास्त दरासाठी राज्यभर आंदोलन

गायीच्या दुधाला किमान 35 रुपये व म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रति लिटर खरेदी दर मिळावा या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून दूध उत्पादकांनी राज्याच्या दूध उत्पादक पट्टयात जोरदार आंदोलन केले.

क्रांतीदिनादिवशी दूध उत्पादकांचा एल्गार, दूधाच्या रास्त दरासाठी राज्यभर आंदोलन
दूध उत्पादकांचं आंदोलन
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 6:35 PM

मुंबई: गायीच्या दुधाला किमान 35 रुपये व म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रति लिटर खरेदी दर मिळावा या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून दूध उत्पादकांनी राज्याच्या दूध उत्पादक पट्टयात जोरदार आंदोलन केले. अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, लातूर, ठाणे व जळगाव या दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रावर निदर्शने करत व दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.

लॉकडाऊनचा कांगावा करत राज्यातील दूध कंपन्यांनी दुधाचे दर 15 रुपयांनी पाडत दूध उत्पादकांची लूटमार सुरू ठेवली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी मंत्रालयात शेतकरी संघटना व दुध कंपन्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. दुधाचे दर या बैठकीनंतर वाढतील व राज्यात दुधाला एफ. आर. पी. देणारा कायदा केला जाईल असे आश्वासन यावेळी सुनील केदार यांनी दिले. प्रत्यक्षात मात्र दीड महिना उलटून गेला तरी दर वाढविण्यात आले नाहीत.

दुधाला एफआरपी द्या

दुधाला एफ. आर. पी. लागू करण्यासाठी दुग्धविकास विभागाने कॅबिनेट नोट बनवून महसूल व सहकार विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविली. मात्र पुढे याबाबतही काही झाले नाही. सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे चालविलेल्या या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्र्यांना गावोगावातून हजारो मेल करून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारला कळविल्या.

शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रति लिटर 35 रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 60 रुपये दर द्या. लॉकडाऊन काळात दुध कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून 20 रुपये दराने दुध घेतले. शेतकऱ्यांना यामुळे खूप नुकसान सहन करावे लागले. शेतकऱ्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी लॉकडाऊन काळात दुध घातलेल्या शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्या.  दूध उत्पादकांची लूटमार थांबविण्यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफ.आर.पी. आणि प्रक्रिया व विक्री प्रक्रियेतील उत्पन्नात हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर संरक्षण लागू करा.

एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारण्याची मागणी

अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी ‘एक राज्य एक ब्रँड’ हे धोरण स्वीकारा. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या. सदोष मिल्को मिटर वापरून शेतकऱ्यांची आर्थिक लुट करणे थांबावे यासाठी दुध संस्थांना प्रमाणित मिल्को मिटर वापरणे बंधनकारक करा व मिल्को मिटर तपासणीसाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करा. शासकीय अनुदानातून पशु विमा योजना सुरु करा.या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, श्रीकांत करे, दादा गाढवे, सुधीर रंधे,उमेश देशमुख, सिद्धप्पा कलशेट्टी, कविता वरे, दीपक वळे, नंदू रोकडे, जोतिराम जाधव,अमोल नाईक,धनंजय धोरडे, अमोल गोर्डे, अमोल नाईक, सुदेश इंगळे, रमेश जाधव,रामदास वदक, अशोक पटेकर, विकास बगाटे, सूर्यकांत काणगुडे, विजय वाकचौरे, राजू भांगरे, विकास वाकचौरे, खंडू वाकचौरे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

इतर बातम्या

आंब्याच्या हंगामात नक्की या, रत्नागिरीच्या युवा शेतकऱ्याचं पंतप्रधानांना आमंत्रण, नरेंद्र मोदी म्हणाले…

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 9 वा हप्ता जारी, देशाला खाद्यतेलात आत्मनिर्भर करा, पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना नवं मिशन

Farmers organizations protest over state for milk rate hike and demanded FRP for Milk of Cow and Buffalo

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.