आंब्याच्या हंगामात नक्की या, रत्नागिरीच्या युवा शेतकऱ्याचं पंतप्रधानांना आमंत्रण, नरेंद्र मोदी म्हणाले…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 09, 2021 | 1:54 PM

PM Kisan 9th Instalment : महाराष्ट्रातील शेतकरी देवेंद्र जापडेकर या फळ उत्पादक शेतकऱ्याशी संवाद साधला आहे. देवेंद्र जापडेकर हे आंबा उत्पादक असून त्यांनी आंबा पिकवण्यासाठी युनिट उभारलं आहे.

आंब्याच्या हंगामात नक्की या, रत्नागिरीच्या युवा शेतकऱ्याचं पंतप्रधानांना आमंत्रण, नरेंद्र मोदी म्हणाले...
नरेंद्र मोदी , देवेंद्र जापडेकर

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग  केले आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता आहे. यावेळी सुमारे 9 कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये पाठवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला . महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी देवेंद्र जापडेकर यांच्याशी नरेंद्र मोदींशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र जापडेकर यांनी नरेंद्र मोदींना आंब्याच्या हंगामात रत्नागिरीला येण्याचं आवाहन केलं.

देवेंद्र यांच्या आमंत्रणावर मोदी काय म्हणाले?

रत्नागिरीतील आंबा प्रसिद्ध आहे. पुरानं रत्नागिरीतील लोकांना अडचणींना सामोरं जावं लागलं. तुमच्या निमंत्रणासाठी धन्यवाद देतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

देवेंद्र जापडेकर काय म्हणाले?

महाराष्ट्रातील रत्नागिरीतील शेतकरी देवेंद्र जापडेकर या फळ उत्पादक शेतकऱ्याशी संवाद साधत आहेत. देवेंद्र जापडेकर हे आंबा उत्पादक आहेत. देवेंद्र जापडेकर ते करत असलेल्या शेतीविषयी माहिती देत आहेत. कोरोना आल्यानं समस्या निर्माण झाली होती. कृषी विभागानं आमचे फोन नंबर लोकांना दिले. लोकांचे फोन येत असल्यानं आंबा पिकवायला दुसरीकडे द्यावे लागत होते. यासाठी 15 दिवस लागत होते. यामुळं आंबे पिकवण्याचं युनिट उभारल्याचं देवेंद्र जापडेकर यांनी नरेंद्र मोदींना सांगितलं. कृषी विभागाकडून अ‌ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर योजनेची माहिती मिळाली. 16 लाखांचं लोन होतं. 2 आठवड्यात कर्ज मंजूर झालं असल्याचं त्यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितलं.

शेतकऱ्यांमुळं भारताची गोदामं भरली: नरेंद्र मोदी

कोरोना विषाणू महामारीच्या काळात देशानं शेतकऱ्यांच कष्ट पाहिलं आहे. कोरोना महामारीत शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन केलं. यूरियाचं पुरवठा कायम ठेवला आहे. डीएपीच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोनामुळे वाढल्या. डीएपीच्या वाढत्या किंमतीचा बोजा शेतकऱ्यांवर पडून दिला नाही. डीएपीच्या किमती कमी ठेवण्यासाठी 12 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली.

मोदी सरकारची यशस्वी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. योजनेचा नववा हप्ता आज जारी करण्यात आला.

इतर बातम्या:

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 9 वा हप्ता जारी, देशाला खाद्यतेलात आत्मनिर्भर करा, पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना नवं मिशन

PM Kisan scheme Narendra Modi Live: राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना जाहीर, खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर व्हावं: नरेंद्र मोदी

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI