AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan scheme Narendra Modi Live: राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना जाहीर, खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर व्हावं: नरेंद्र मोदी

| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 1:56 PM
Share

PM Kisan 9th Instalment : पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग करतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता असेल. यावेळी सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटी रुपये पाठवले जातील.

PM Kisan scheme Narendra Modi Live: राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना जाहीर, खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर व्हावं: नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

PM Kisan scheme Narendra Modi Live नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता असेल. यावेळी सुमारे 9 कोटी  75 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 हजार 500  कोटी रुपये पाठवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे देखील यावेळी उपस्थित आहेत.

खाद्यतेलात आत्मनिर्भर करण्याचं आवाहन

खाद्यतेलात आपला देश आत्मनिर्भर व्हावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरते साठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना सुरु करण्यात येत आहे. आज आपला देश भारत छोडो आंदोलनाचं स्मरण करत आहेत.  या मिशनच्या माध्यमातून 11 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. शेतकऱ्यांनी बियाण्यापासून, उत्तम तंत्रज्ञान पुरवण्यात येईल. पारंपारिक तेलबियांच्या शेतीला प्रोत्साहन दिलं जाईल. कृषी मालाच्या निर्यातीत भारत पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे. भारताची ओळख कृषी निर्यातदार म्हणून आहे. त्यामुळे खाद्यतेल आयातीवर अवलंबून राहणं योग्य नाही.

उत्तर पूर्व भारत आणि अंदमान निकोबार मध्ये पामशेती शक्य

खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 55 टक्के पामतेल आयात करावी लागत आहे. भारतात पामतेल शेती करण्यासाठी उत्तर पूर्व आणि अंदमान निकोबरामध्ये ही शेती वाढवली जाऊ शकते. त्या भागात पामची शेती करता येऊ शकते. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरतेचं मिशन महत्वाचं आहे. हे गरीब शेतकरी, मध्यम वर्गासाठी महत्वाचं आहे. याशिवाय, रोजगाराच्या संधी वाढतील. अन्न प्रक्रिया व्यवसायामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. योजनेचा नववा हप्ता आज जारी करण्यात आला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Aug 2021 01:42 PM (IST)

    केंद्र सरकारकडून गव्हाची विक्रमी खरेदी

  • 09 Aug 2021 01:35 PM (IST)

    खाद्यतेलात आपला देश आत्मनिर्भर व्हावा

    खाद्यतेलात आपला देश आत्मनिर्भर व्हावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरते साठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना सुरु करण्यात येत आहे. आज आपला देश भारत छोडो आंदोलनाचं स्मरण करत आहेत.  या मिशनच्या माध्यमातून 11 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. शेतकऱ्यांनी बियाण्यापासून, उत्तम तंत्रज्ञान पुरवण्यात येईल. पारंपारिक तेलबियांच्या शेतीला प्रोत्साहन दिलं जाईल. कृषी मालाच्या निर्यातीत भारत पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे. भारताची ओळख कृषी निर्यातदार म्हणून आहे. त्यामुळे खाद्यतेल आयातीवर अवलंबून राहणं योग्य नाही. खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 55 टक्के पामतेल आयात करावी लागत आहे. भारतात पामतेल शेती करण्यासाठी उत्तर पूर्व आणि अंदमान निकोबरामध्ये ही शेती वाढवली जाऊ शकते. त्या भागात पामची शेती करता येऊ शकते. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरतेचं मिशन महत्वाचं आहे. हे गरीब शेतकरी, मध्यम वर्गासाठी महत्वाचं आहे. याशिवाय, रोजगाराच्या संधी वाढतील. अन्न प्रक्रिया व्यवसायामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं मोदी म्हणाले

  • 09 Aug 2021 01:29 PM (IST)

    शेतकऱ्यांमुळं भारताची गोदामं भरली: नरेंद्र मोदी

    कोरोना विषाणू महामारीच्या काळात देशानं शेतकऱ्यांच कष्ट पाहिलं आहे. कोरोना महामारीत शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन केलं. यूरियाचं पुरवठा कायम ठेवला आहे. डीएपीच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोनामुळे वाढल्या. डीएपीच्या वाढत्या किंमतीचा बोजा शेतकऱ्यांवर पडून दिला नाही. डीएपीच्या किमती कमी ठेवण्यासाठी 12 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली.

  • 09 Aug 2021 01:23 PM (IST)

    नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांशी संवाद सुरु

    नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांशी संवाद सुरु

  • 09 Aug 2021 01:11 PM (IST)

    नरेंद्र मोदींचा काश्मीरच्या केशर उत्पादक शेतकऱ्याशी संवाद

    नरेंद्र मोदींनी काश्मीरच्या केशर उत्पादक शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेली त्या शेतकऱ्यानं एक वर्ष अगोदर उत्पादन डबल झाल्याचं सांगितलं.

  • 09 Aug 2021 01:07 PM (IST)

    नरेंद्र मोदींचा उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याशी संवाद सुरु

    नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील शेतकऱ्याशी संवाद साधल्यानंतर  उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याशी संवाद साधला.

  • 09 Aug 2021 12:58 PM (IST)

    नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील शेतकरी देवेंद्र जापडेकर यांच्याशी संवाद सुरु

    महाराष्ट्रातील रत्नागिरीतील शेतकरी देवेंद्र जापडेकर या फळ उत्पादक शेतकऱ्याशी संवाद साधत आहेत. देवेंद्र जापडेकर हे आंबा उत्पादक आहेत. आता ते केळी देखील पिकवतात. देवेंद्र जापडेकर ते करत असलेल्या शेतीविषयी माहिती देत आहेत. कोरोना आल्यानं समस्या निर्माण झाली होती. कृषी विभागानं आमचे फोन नंबर लोकांना दिले. लोकांचे फोन येत असल्यानं त्यांनी फळप्रक्रिया सुरु करण्याचं ठरवलं.  अ‌ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर योजनेची माहिती मिळाली. 16 लाखांचं लोन होतं. 2 आठवड्यात कर्ज मंजूर झालं असल्याचं त्यांनी नरेंद्र मोदी  यांना सांगितलं.

  • 09 Aug 2021 12:51 PM (IST)

    नरेंद्र मोदींचा गोव्याच्या प्रतिभा वेलीपी यांच्यासोबत संवाद सुरु

    नरेंद्र मोदींचा गोव्याच्या प्रतिभा वेलीपी यांच्यासोबत संवाद सुरु आहे. प्रतिभा वेलीपी या मिश्र शेती करत आहेत. प्रतिभा वेलीपी या गोव्यात धान, काजू आणि इतर शेती करतात.

  • 09 Aug 2021 12:42 PM (IST)

    11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 37 लाख रुपये वर्ग

    केंद्रीय कृषीमंत्री  नरेंद्र सिंह तोमर हे केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देत आहेत. पीएम किसान योजना, पीक विमा योजना याचा फायदा झाला असल्याचं  त्यांनी सांगितलं. पीएम किसान योजनेद्वारे 6 हजार रुपये देतात हा विषय नाही. नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी 11  कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 37 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

  • 09 Aug 2021 12:35 PM (IST)

    9  कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये वर्ग होणार

    आज हा आपल्या साठी हा अभिमानाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9  कोटी 75 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये पाठवले जाणार आहेत, असं कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतो, असं तोमर म्हणाले.

  • 09 Aug 2021 12:31 PM (IST)

    आतपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार रुपये वर्ग

    आतपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी दरवेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून हप्ता जारी करतात

  • 09 Aug 2021 12:31 PM (IST)

    अर्जाची स्थिती कुठे पाहायची?

    जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधीच अर्ज केला असेल. परंतु, आजपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर त्याची स्थिती जाणून घेणे खूप सोपे आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर भेट द्या. तिथे फार्मर कॉर्नरवर जाऊन, तुम्ही तुमचा आधार, मोबाईल आणि बँक खाते क्रमांक टाकून पैसे येण्याची स्थिती जाणून घेऊ शकता.

  • 09 Aug 2021 12:30 PM (IST)

    थोड्याच वेळात नववा हप्ता जारी होणार

    थोड्याच वेळात नववा हप्ता जारी होणार

Published On - Aug 09,2021 12:26 PM

Follow us
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.