AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाच्या तावडीतून शेतकऱ्यांनी कांदा वाचवला, पण भाव मिळत नसल्यामुळे…

अवकाळी पाऊस आणि खराब वातावरणाच्या तावडीतून हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकवला. मात्र दरवाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या कांद्याला भावच मिळत नसल्याने उन्हामुळे व अवकाळी पावसामुळे कांद्याच्या ढिगाचा चिखल झाला असल्याचा पाहायला मिळत आहे.

अवकाळी पावसाच्या तावडीतून शेतकऱ्यांनी कांदा वाचवला, पण भाव मिळत नसल्यामुळे...
onionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 01, 2023 | 2:53 PM
Share

रमेश चेंडके, हिंगोली : शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक संकटं येत असल्याने शेतकरी (farmer news) आता आर्थिक संकटात सापडला असल्याने शेतीवर केलेला खर्चही बाहेर निघत नाही अशी व्यथा कांदा उत्पादक शेतकरी बोलून दाखवत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड (onion cultivation) केली होती. अवकाळी आणि बदलत्या वातावरणातून शेतकऱ्यांनी उत्कृष्ट दर्जाचा कांदा पिकवला. मात्र एप्रिलमध्ये काढलेल्या कांद्याला भावच नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतातचं ढीग मारला आहे. आज भाव लागेल उद्या भाव अशी अशा शेतकरी करत होते. मात्र कांदा तीन रुपये किलोच्यावर जात नसल्याने भाव वाढीच्या आशेत असलेल्या शेतकऱ्याचा (Agricultural news) तीन एकर मधील शकडो टन कांद्याच्या जाग्यावरचं चिखल झाला आहे.

आता पेरणीचे दिवस जवळ आल्याने चिखल झालेला कांदा शेतीच्या बाहेर नेऊन टाकावा लागत आहे. झालेला खर्च आणि बाहेर नेऊन टाकण्याचा खर्च असा दुहेरी भुर्दंड कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. उन्हाळा कांद्यातून काहीतरी मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादकांनी घेतलेले उन्हाळा कांद्याचे पीक भाव नसल्याने जाग्यावरचं सडून गेल्याने कांद्याला लाख रुपये खर्च केल्याने आता पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यां समोर पडला आहे. उन्हाळी कांद्यातून आलेल्या पैशातून खरिपाची पेरणी करायची होती, मात्र भाव नसल्याने हात तोंडाशी आलेला घास हिरवल्याने आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जिल्हा बँकेच्या कर्जाच्या नोटीसा रामकुंडात बुडवून शेतकऱ्यांनी केला निषेध

नाशिक जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली जिल्हा बँकेकडून सुरू आहे. याचा निषेध म्हणून शेतकरी संघटना समन्वय समितीच्या वतीने नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड येथे घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना ज्या कर्जाच्या नोटिसा दिल्या आहेत, त्या रामकुंडाच्या पाण्यात बुडवून निषेध करण्यात आला. जिल्हा बँकेची ही सक्तीची वसुली तात्काळ थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सरकारने जबाबदारी स्वीकारून आम्हाला कर्जमुक्त करावे, अशी देखील मागणी करण्यात आली. जोपर्यंत जिल्हा बँकेची सक्तीची वसुली थांबत नाही, सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत नाही, तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.