AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज अंगावर पडू नये म्हणून अशी घ्या काळजी…प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

शेतामध्ये काम करीत असताना सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो सुरक्षतेचा..मात्र, शेत शिवारात त्यानुसार सुरक्षित ठिकाण नसते त्यामुळे अशा वेळेस शेतकऱ्यांनीच काही सुरक्षतेच्या गोष्टींचे पालन केले तर वीजेच्या धोक्यापासून बचाव होणार आहे...त्यामुळे काही बारीक गोष्टींही खूप महत्वाच्या ठरणार आहेत.

वीज अंगावर पडू नये म्हणून अशी घ्या काळजी...प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 10:27 AM
Share

लातूर : यंदा सरासरीपेक्षा अधिकचा (Heavy Rain) पाऊस झालेला आहे. एवढेच नाही तर (thunderstorms) वादळी-वारे आणि विजेच्या कडकडाटह पाऊस बरसला असल्याने पीकांचे तर नुकसान झालेले आहेच पण वीज पडून मनुष्यहानी झालेल्या घटना घडलेल्या आहेत. अधिकतर दुर्घटना ह्या शेती क्षेत्राशी निगडीत आहेत. जनावरे दगावली आहेत तर शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्याचाही अपघाती मृत्यू झाला आहे.

शेतामध्ये काम करीत असताना सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो सुरक्षतेचा..मात्र, शेत शिवारात त्यानुसार सुरक्षित ठिकाण नसते त्यामुळे अशा वेळेस शेतकऱ्यांनीच काही सुरक्षतेच्या गोष्टींचे पालन केले तर वीजेच्या धोक्यापासून बचाव होणार आहे…त्यामुळे काही बारीक गोष्टींही खूप महत्वाच्या ठरणार आहेत. चला तर मग पाहू वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे..

यंदाच्या हंगामात पावसाने हाहाकार केला आहे. सरासरीच्या दीडपट पाऊस मराठवाड्यात झाला आहे. पावसाने तर पीकाचे नुकसान झालेच आहे पण वीज कोसळून जनावरे दगावली आहेत तर शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा वादळी वाऱ्यात किंवा वीजेचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

सर्वात आगोदर हे करा

शेतामध्ये काम करीत असताना वीजेचा कडकडाट होत असेल तर लागलीच सुरक्षित ठिकाण जवळ करा…अशा वेळी शेतकरी हे मोठ्या झाडाखाली जाऊन बसतात पण हेच धोक्याचे ठिकाण आहे कारण वीज ही झाडांतूनच प्रवाहीत होण्याची शक्यता असते. तर ऊंच ठिकाणी जसं की, टेकडी, डोंगर या ठिकाणी आश्रय न घेता शेतकऱ्यांनी लागलीच सुरक्षित जवळ करावे. पण जर शेतामध्ये सुरक्षित ठिकाणच जवळ नसेल तर मात्र, काही उपाय आहेत त्याचे पालन करणे आवश्यक आहे. एक तुम्ही जमिनीच्या जवळ जाताल तेवढे सुरक्षित राहणार आहात. त्यामुळे सुरक्षित जाणे शक्य नसेल तर लागलीच दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन खाली बसा व कानावर हात ठेवा.

ही लक्षणे आहेत वीज कोसळण्याची

वीजेचा कडकडाट सुरु असताना जर तुम्हाला अंगावर विद्युत प्रवाह संचारत असल्याचे जाणवल्यास अंगावरील केस उभे राहिल्यास किंवा त्वचेवरील केस उभे राहिल्यास वीज कोसळण्याची शक्यता असते. अशावेळी शेतकऱ्याने लागलीच जमिनीवर उलथे झोपावे किंवा गुडघ्यामध्ये डोके घालून खाली बसावे.. निवाऱ्यासाठी शेतकरी शक्यतो छत्रीचा वापर करतात पण अशा वेळी लोखंडी किंवा धातूच्या वस्तू वापरणे धोक्याचे असते. त्यामुळे इळा, कोयता, चाकू यासारख्या वस्तू दूर ठेवलेल्याच चांगल्या..

अशी घ्या काळजी

वीज ही विद्युत खांबाला आकर्षित करीत असते. त्यामुळे विजेच्या खांबाखाली थांबण्याची चूक करु नका. धरणे किंवा शेतालगत असलेल्या तळ्यापासून दूर रहा. वीजेचा कडकडाट सुरु असताना मोबाईलचा वापर करुच नका. मोबाईल हा बंद करुन ठेवा तसेच वरी सांगितल्याप्रमाणे लोखंडी छत्रीचा तर वापरच करु नका. एकाच ठिकाणी तुम्ही चार ते पाचजण असताल तर अंतर ठेऊन उभे रहा..घाईगडबड न करता वाहनावरील प्रवास टाळा..

असा करा प्राथमिक उपचार

वीज पडलेल्या व्यक्तीला स्पर्श करु नये अशी एक भावना झालेली असते. मात्र, तुम्ही स्पर्श केला तरी काही होणार नाही. सर्वात आगोदर बाधित व्यक्तीचा श्वासोश्वास सुरु आहे का हे पहा जर श्वास थांबला असेल तर त्या बाधित व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेऊन कृत्रिम श्वास देणे आवश्यक आहे. अन्यथा गरज पडल्यास त्या व्यक्तीला जवळच्या दवाखान्यात दाखल करा. अन्यथा 1078 या क्रमांकावर फोन करुन बाधित व्यक्तीचे नाव, घटनेचे ठिकाण सांगितले तरी त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाण्यास मदत केली जाते. (Farmers should take care to avoid lightning, advise farmers)

संबंधित बातम्या :

प्रतीक्षा संपली..! ‘या’ तारखेला जमा होणार पी.एम. किसान सन्मान योजनेचा निधी तुमच्या खात्यावर

आता तरी खाद्यतेलाचे दर कमी होतील का? आयातशुल्क कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

‘झिरो बजेट शेती’ ही महाराष्ट्रातील संकल्पना, आता पुन्हा नैसर्गिक शेतीची गरज

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.