शेतकऱ्यांनो महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा अन् रब्बीचे बियाणे मिळवा, हरभऱ्यावर अधिकचा भर

रब्बी हंगामात हरभरा हेच मुख्य पीक डोळ्यासमोर ठेऊन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचनुसार स्थानिक पातळीवरही नियोजन केले जात आहे. परभणी तसेच हिंगाली येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप हे केले जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना केवळ महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल करायचे आहेत. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरभरा आणि गहू या बियाणांचे वाटप करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे तर हिंगोलीतही या दोन्ही पीकासाठीचे बियाणे वाटप केले जाणार आहे.

शेतकऱ्यांनो महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा अन् रब्बीचे बियाणे मिळवा, हरभऱ्यावर अधिकचा भर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 1:06 PM

परभणी : रब्बी हंगामाच्या अनुशंगाने केंद्रीय स्थरावर आढावा बैठक पार पडलेली आहे. यामध्ये रब्बी हंगामात हरभरा हेच मुख्य पीक डोळ्यासमोर ठेऊन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचनुसार स्थानिक पातळीवरही नियोजन केले जात आहे. परभणी तसेच हिंगाली येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप हे केले जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना केवळ महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल करायचे आहेत. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरभरा आणि गहू या बियाणांचे वाटप करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे तर हिंगोलीतही या दोन्ही पीकासाठीचे बियाणे वाटप केले जाणार आहे.

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक एकराच्या हिशोबाने बियाणाचे वाटप केले जाणार आहे. हिंगोली जिल्ह्याकरिता हरभरा या पिकासाठी 4300 क्विंटल तर गहूसाठी 350 क्विंटलचा लक्षांक देण्यात आला आहे. तर परभणी येते हरभरा या पिकासाठी 4175 क्विंटल तर गहूसाठी 1145 क्विंटलचा उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे.

तालुकानिहाय बियाणे वाटपाचा लक्षांक हा जिल्हास्तरावरून ठरवून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनीच बियाणे दरात वाढ करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आगामी काळात परभणी जिल्ह्यतील एक तृतीयांश शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

अशा पद्धतीने होणार बियाणांचे वाटप

ग्रामबिजउत्पादन कार्यक्रम कृषी विभाग व महाबिजच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन हे केले जाते. प्रत्येक शेतकऱ्याला एक एकराला पुरेल एवढेच बियाणे हे वाटप केले जाते. यामध्ये फुले विक्रम व राजविजय 2020 आणि एकेजी 1109 या वाणाच्या बियाणांचा समावेश आहे. बियाणांसाठी 25 रुपये किलोप्रमाणे अनुदान असल्याचे परभणीचे जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले आहे.

बियाणे वाटप कार्यक्रमाचे उद्दीष्ट

राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियान कार्यक्रम अंतर्गत रब्बी हंगामात बियाणे दरात वाढ करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे शेकऱ्यांना बियाणे उपलब्ध होणार असून महागडे बियाणे खरेदी करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळेच दरवर्षी काही गावांची निवड करुन हे उपक्रम राबवला जात आहे.

25 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहेत. महा-ई- सेवा धारकांना हे अधिकार देण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज हे करावे लागणार आहेत. याशिवाय अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहायक किंवा मंडळ अधिकारीही शेकऱ्यांना मदत करणार आहेत. (Farmers to get rabi seeds, apply to agriculture department)

संबंधित बातम्या :

पितृपक्षामुळे सुक्यामेव्याला मागणी, भाजीपाला विक्रेत्यांनाही ‘अच्छे दिन’

प्रधानमंत्री ‘कुसुम’ योजना : सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाचीही संधी

ज्याची भीती होती तेच झाले, उभ्या सोयाबीनलाच कोंब फुटले

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.