Kharif Season : अखेर खरिपाच्या आशा मावळल्या, अतिवृष्टीतून सुटका मात्र अवकाळीच्या कचाट्यात ‘या’ पिकाचे नुकसान

आता सर्वकाही तूर पिकावर अवलंबून असताना अवकाळी पाऊस व त्यानंतर निर्माण झालेले ढगाळ वातावरण यामुळे शेंगा पोसण्याच्या अवस्थेत मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तुर तर उभा आहे पण शेंगा नसून 'तुराट्या' म्हणून अशीच काहीशी स्थिती मराठवाड्यातील खरीप हंगामातील शेवटच्या पिकाची झालेली आहे.

Kharif Season : अखेर खरिपाच्या आशा मावळल्या, अतिवृष्टीतून सुटका मात्र अवकाळीच्या कचाट्यात 'या' पिकाचे नुकसान
मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे तूर पिकाचा अशाप्रकारे खराटा झालेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 1:58 PM

नांदेड : (Kharif Season) हंगामाच्या सुरवातीपासूनच यंदा खरिपाला ग्रहन लागले होते. सुरवातीला अतिवृष्टीमुळे प्रमुख पीक असलेले (Soybean Rate) सोयाबीन तब्बल महिनाभर पाण्यातच होते. शेंगा पोसल्याने जाग्यावर या पिकाची पुन्हा उगवण होऊ लागली होती. त्यामुळे उत्पादनात तर घटच झालीच पण पावसामुळे सोयाबीनचा दर्जाही ढासाळला आहे. त्यामुळे दर पडले आहेत. आता सर्वकाही (Toor Crop) तूर पिकावर अवलंबून असताना अवकाळी पाऊस व त्यानंतर निर्माण झालेले ढगाळ वातावरण यामुळे शेंगा पोसण्याच्या अवस्थेत मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तुर तर उभा आहे पण शेंगा नसून ‘तुराट्या’ म्हणून अशीच काहीशी स्थिती मराठवाड्यातील खरीप हंगामातील शेवटच्या पिकाची झालेली आहे.

अपेक्षा होत्या पण बदलत्या वातावरणामुळे सर्वकाही हिरावले

खरिपात केवळ उडदाचे पिक शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे. मात्र, मराठवाड्यात उडदाचे क्षेत्र हे कमी असल्याने त्याचा एवढा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. शिवाय बाजारात आवक सुरु झाल्यापासून 7 हजारच्या दरम्यान उडदाला दर कायम आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. उत्पादनात तर घट झालेलीच आहे पण जे पदरी पडले त्याला योग्य दरही मिळत नाही. शिवाय सरकारच्या धोरणांमुळे दरात कायम घसरण होती ती वेगळीच. त्यामुळे सर्वकाही तुरीवर अवलंबून होते. आता काढणी 10 दिवसांवर येऊन ठेपललेली असतानाच मर रोगाचा एवढा प्रादुर्भाव झाला आहे की, शेंगा पोसल्याच गेल्या नाहीत. त्यामुळे काढणीवर होणारा खर्चही पदरी पडतो की नाही अशी अवस्था असल्याचे शेतकरी अमोल तांदळे यांनी सांगितले आहे.

तुरीवरील मर रोगाचे व्यवस्थापन

मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे. यामुळे तुरीच्या खोडावर ठिपके, भेगा पडून झाडाच्या मुळाकडे अन्नद्रव्याचा पुरवठाच होऊ दिला जात नाही. त्यामुळे तुर ही मुळापासूनच वाळायला सुरवात होते. दरवर्षी अंतिम टप्प्यात पिक असताना या मर रोगाचा प्रादुर्भाव हा ठरलेलाच आहे. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनतही वाया जाते आणि अपेक्षित उत्पादनही मिळत नाही. वातावरणातील बदलाचा हा परिणाम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फुलोऱ्यात असलेल्या तुरीला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक प्रति 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम याप्रमाणे मिसळून फवारणे गरजेचे आहे. शिवाय वातावरण स्वच्छ असतानाच याची फवारणी फायदेशीर राहणार आहे.

तूर पिकाचे असे झाले नुकसान

खरीप हंगाम बहरात असताना सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम तूर वगळता इतर पिकांवर मोठ्या प्रमाणात झाला होता. मात्र, या अतिवृष्टीनंतर तुरीचे पीक हे शेंगांनी लगडले होते. त्यानंतरही शेतरऱ्यांनी बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्या. आता शेंगापोसून तूर काढणीची तयारी सुरु असतनाच झालेल्या अवकाळी पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे हे पीक जागीच वाळत आहे. ऐन काढणीच्या प्रसंगीच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे आता काढणीही परवडणार नाही. 50 टक्केपेक्षा अधिकचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती तरतुदीनुसार विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यांवर 25 टक्के रक्कम अदा करण्याची मागणी केली जात आहे.

संबंधित बातम्या :

Chilly Prices : मिरचीने बदलले बाजारपेठेतले सुत्र, साताऱ्यात लवंगी मिरचीचा तडका

Grape : अखेर ठरलं तर मग…! शेतकऱ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट अन् बागायतदार संघाचा ऐतिहासिक निर्णय, काय झालं नेमंक नाशिकमध्ये

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा, एक मेसेज कोट्यावधी लाभार्थ्यांना

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.