AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोकुळचं महत्त्व काय, जिथे म्हटलं जातं, आम्हाला आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद द्या!

शेण-मूत्रात राहून गोकुळला ज्यांनी शिखरावर नेले, त्यांना त्या ठिकाणी संधी किती आहे हा संशोधनाचा भाग आहे. मात्र राजकीय नेत्यांनी तेथील मलईसाठी केलेला अट्टाहास सर्वच निवडणुकांमधून समोर येतो. तो गोकुळच्या निवडणुकीतही चुकला नाही.

गोकुळचं महत्त्व काय, जिथे म्हटलं जातं, आम्हाला आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद द्या!
Gokul Dudh Sangh Election Result Kolhapur
| Updated on: May 04, 2021 | 5:41 PM
Share

कोल्हापूर : आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद (Gokul Dudh Sangh) द्या अशी एक म्हण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचलित आहे. गोकुळची स्थापना झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे सत्ता आणि आर्थिक केंद्र म्हणजे गोकुळ दूध संघ. याच गोकुळ दूध संघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे तीन मंत्री, एक खासदार विरुद्ध विद्यमान आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार अशी लढत आहे. (Gokul Dudh Sangh Election Result all you need to know about Kolhapur Gokul product, dudh sangh property history)

शेण-मूत्रात राहून गोकुळला ज्यांनी शिखरावर नेले, त्यांना त्या ठिकाणी संधी किती आहे हा संशोधनाचा भाग आहे. मात्र राजकीय नेत्यांनी तेथील मलईसाठी केलेला अट्टाहास सर्वच निवडणुकांमधून समोर येतो. तो गोकुळच्या निवडणुकीतही चुकला नाही.

गोकुळची स्थापना 

दूरदर्शी नेते आनंदराव पाटील यांच्या संकल्पनेतून गोकुळने कोल्हापूर जिल्ह्यात १९६३ साली पाया रचला. 16 मार्च 1963 रोजी ऑपरेशन फ्लड अंतर्गत कोल्हापूर जिल्हा दूध संघाची स्थापना झाली. आनंदराव पाटील-चुयेकर आणि एन टी सरनाईक यांच्या पुढाकाराने दूध संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली. गोकुळच्या स्थापनेनंतर घरोघरी जाऊन दूध संकलन केलं जात होते. आणि आज स्वत:चे दूध टँकर वाहतुकीला लावण्यासाठी राजकीय चढाओढ सुरु असते.

याला कारण अर्थातच राज्याची आर्थिक राजधानी मुंबईला गोकुळकडून होणारा दुधपुरवठा. गुजराती मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी गोकुळचे मुंबईत येण्यासाठी अतुलनीय सहकार्य केले.

गोकुळचा चेहरामोहरा बदलला

वर्गीस कुरियन यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर गोकुळचा चेहरामोहरा बदलला. कोल्हापूरला ऑपरेशन फ्लड म्हणजेच दूधाचा महापूर योजना मंजूर झाल्याने, गोकुळचे आणि पर्यायाने कोल्हापूरचे रुपच बदलून गेले.

13 लाख लिटर दूध संकलन

इथे दररोज जवळपास ४ हजार ८०० च्या आसपास असलेल्या दुध संस्थेच्या माध्यमातून जवळपास १३ लाख लीटर दूध संकलित केले जाते. यामधील तब्बल ५ लाख लीटर दूध मुंबईसाठी जाते. आणि हेच सर्वांत मोठे राजकीय संघर्षाचे कारण आहे. कारण हा दुध पुरावठा करण्यासाठी ९० च्या आसपास टँकर आहेत. दोन हजारांवर कर्मचारी वृंद असलेल्या गोकुळची वार्षिक उलाढाल २१०० कोटींच्या घरात आहे.

आमदारकीपेक्षा संचालकपद जवळचं

सर्वसामान्यांच्या जीवावर उभ्या राहिलेल्या गोकुळमध्ये त्यामुळेच आमदारकीपेक्षा संचालकपद जवळचे वाटते. जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या सत्ताकेंद्रावर महादेवराव महाडिकांची मांड आहे. त्यांना गेली दोन दशके आव्हान देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला आहे, पण त्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही. राज्यातील नंबर एकवर गोकुळ दुध संघाची कामगिरी आहे. गोकुळ संचालकांचा संबंध दूध उत्पादकांच्या चुलीपर्यंत असल्याने जिल्ह्यात राजकारण करणाऱ्यांना त्यांना विचारात घ्यावेच लागते. त्यामुळेच गोकुळसाठी चाललेला अट्टाहास लक्षात येईल.

दूध संघामुळे गावागावात ताकद

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातला सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकूळकडे पाहिले जाते. प्रत्येक 10 दिवसाला दूध उत्पादक शेतकऱ्यांना बिले देणे,पशुखाद्य देणे,दिवाळीला लाभांश देणे असा परतावा गोकुळकडून दिला जातो. मुंबईत सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातून गोकुळ दूध संघ दुधाची गरज पूर्ण करतो. या दूध संघावर वर्चस्व ठेवल्यास अनेक निवडणुकांत अगदी गावापासून ते मुंबईतपर्यंत राजकीय ताकद वाढते.

गोकुळची उलाढाल  

  • वार्षिक उलाढाल 2100 कोटी
  • दररोज 13 लाख दूध संकलन
  • मुंबईला दररोज 5 लाख लिटर दूध पुरवठा
  • पुरवठा करणारे 90 टँकर, ज्यांचे जास्त टँकर त्याला जास्त नफा, जास्त मलई
  • टँकर लावण्यासाठी स्पर्धा
  • दर दहा दिवसाला कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात
  • आज गोकुळकडे 7 लाख लीटर क्षमतेचा अत्याधुनिक शित केंद्र
  •  दूध संघ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
  • गोकुळ दूधसंघाचा स्वतःचा पशु खाद्य कारखाना

संबंधित बातम्या  

Gokul Dudh Sangh Election Result Live | दुसऱ्या फेरीअखेर सत्ताधारी आघाडीचे 9 उमेदवार आघाडीवर

Kolhapur Lockdown | कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्या वाढती, पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन 

(Gokul Dudh Sangh Election Result all you need to know about Kolhapur Gokul product, dudh sangh property history)

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.