महाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड!

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील (Vishwas Patil Gokul Chairman) यांची निवड करण्यात आली. विश्वास पाटील हे अनुभवी संचालक आहेत.

महाडिकांची सत्ता पालटल्याचं बक्षीस, विश्वास पाटील यांची थेट गोकुळच्या अध्यक्षपदी निवड!
Vishwas Patil Gokul Kolhapur
सचिन पाटील

|

May 14, 2021 | 1:31 PM

कोल्हापूर : अत्यंत चुरशीची वाटणारी पण सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने एकहाती जिंकलेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीनंतर, (Gokul Election) आता अध्यक्षपदाची निवड झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील (Vishwas Patil Gokul Chairman) यांची निवड करण्यात आली. विश्वास पाटील हे अनुभवी संचालक आहेत. महत्त्वाचं म्हणजे गोकुळ निवडणुकीच्या अगोदर त्यांनी महाडिक गटातून सतेज पाटील (Satej Patil) यांच्या गटात प्रवेश केला होता. (Gokul Election result Kolhapur Vishwas Patil elected as Chairman from Satej Patil and Hasan Mushrifs Shahu Parivartan Aaghadi)

गोकुळमधील महाडिकांची तीन दशतकांची सत्ता उलथवण्यात, सत्तातंर करण्यात विश्वास पाटील यांचा मोठा हात होता. त्यामुळेच मोठा वाटा उचलल्याचं बक्षीस म्हणून विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात चुरस होती. अखेर विश्वास पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.

गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव एमआयडी कार्यालयात  निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  संचालक मंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या निवडीवर शिक्कमोर्तब झाले.

गोकुळ निवडणूक 

गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक गटाच्या तब्बल तीन दशाकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने सुरुंग लावला. 4 मे रोजी झालेल्या मतमोजणीवेळी गोकुळच्या एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले. तर सत्ताधारी  महाडिक गटाला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले.

गोकुळ दूधसंघातील 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाला.  सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने सुरुवातीपासूनच आव्हान दिलं होतं. शेवटी सतेज पाटील गटने मोठी घोडदौड करत विजयश्री खेचून आणला.

गोकुळची उलाढाल  

  • वार्षिक उलाढाल 2100 कोटी
  • दररोज 13 लाख दूध संकलन
  • मुंबईला दररोज 5 लाख लिटर दूध पुरवठा
  • पुरवठा करणारे 90 टँकर, ज्यांचे जास्त टँकर त्याला जास्त नफा, जास्त मलई
  • टँकर लावण्यासाठी स्पर्धा
  • दर दहा दिवसाला कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात
  • आज गोकुळकडे 7 लाख लीटर क्षमतेचा अत्याधुनिक शित केंद्र
  •  दूध संघ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
  • गोकुळ दूधसंघाचा स्वतःचा पशु खाद्य कारखाना

संबंधित बातम्या  

गोकुळचं महत्त्व काय, जिथे म्हटलं जातं, आम्हाला आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद द्या!

Gokul Dudh Sangh Election Final Result | डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार, आता मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार – सतेज पाटील

‘गोकुळ’ जिंकताच सतेज ऊर्फ बंटी पाटलांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ

(Gokul Election result Kolhapur Vishwas Patil elected as Chairman from Satej Patil and Hasan Mushrifs Shahu Parivartan Aaghadi)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें