AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana च्या 21 व्या हप्त्यापूर्वीच मोठी आनंदवार्ता, शेतकऱ्यांसाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण त्यापूर्वीच एक आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. आता कास्तकारांसाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे.

PM Kisan Yojana च्या 21 व्या हप्त्यापूर्वीच मोठी आनंदवार्ता, शेतकऱ्यांसाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा
पीएम किसान
| Updated on: Sep 03, 2025 | 3:38 PM
Share

पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची कास्तकारांना प्रतिक्षा आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत त्यांनी कॉल सेंटर्स आणि इतर पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी आणि सुचना एकाच ठिकाणी प्राप्त करण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले. आता शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या कृषीविषयक तक्रारी एकाच पोर्टलवर करता येतील. त्यामुळे या तक्रारींचा तात्काळ निपटारा करता येईल. काय आहे ही अपडेट?

कृषीमंत्री घालतील लक्ष

कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे जातीने लक्ष घालतील. ते या तक्रारींची नियमीत समीक्षा करतील. PM Kisan Samman Nidhi Yojan च्या 21 व्या हप्त्यापूर्वीच सरकारने हे मोठे पाऊल उचले आहे. तक्रारींसाठी स्वतंत्र पोर्टल तयार झाल्याने शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेपासून ते इतर सर्व तक्रारींसाठी एकच मंच असेल. त्यांच्या तक्रारीवर लवकर तोडगा काढण्यात येईल.

तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारी आणि हेल्पलाईनवर येणारे कॉल्स यांची समीक्षा केली. त्यानंतर तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे निर्देश दिले. या पोर्टलवर आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय होता कामा नये असे त्यांनी बजावले. या तक्रारीसंबंधी काय कार्यवाही केली याची माहिती सुद्धा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न होणार आहे. तर तक्रार आल्यानंतर ती एका विहित मुदतीत दूर करावी लागणार आहे.

शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी?

गेल्या महिन्यात 2 ऑगस्ट रोजी शेतकरी सन्मान योजनेचा, पीएम किसानचा 20 वा हप्ता जमा झाला होता. आता शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आता या हप्त्याविषयी केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. पण काही वृत्तानुसार हा हप्ता नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात मिळू शकतो. कारण सरकार दर 4 महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. एका वर्षात तीन हप्ते जमा करण्यात येतात. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये देण्यात येतात.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.