Organic Farming: सेंद्रीय शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज : भगतसिंग कोश्यारी

राजेंद्र खराडे

राजेंद्र खराडे |

Updated on: Jan 30, 2022 | 5:57 PM

शेतीपध्दतीत बदल करुन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवणे तर गरजेचे आहे शिवाय काळाच्या ओघात जो खर्च होत आहे त्यावर देखील अंकूश लादणे गरजेचे असल्याचे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले आहे.

Organic Farming: सेंद्रीय शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज : भगतसिंग कोश्यारी
इगतपुरी घोटी येथील ए. एस.अ‍ॅग्री व कल्याणी वेअर हाऊसच्या भेटी दरम्यान राज्यपाल कोश्यारी

नाशिक : देशात अन्नधान्याचा पूरवठा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आता गरज आहे ती दर्जात्मक धान्याची. गेल्या काही वर्षांपासून उत्पादन वाढीसाठी (Chemical Fertilizer) रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत असून आता हीच योग्य वेळ आहे सेंद्रीय शेतीची. याकरिता केंद्र सरकारही वेगवेगळे उपक्रम राबवून (Organic Farming) सेंद्रीय शेतीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतीपध्दतीत बदल करुन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवणे तर गरजेचे आहे शिवाय काळाच्या ओघात जो खर्च होत आहे त्यावर देखील अंकूश लादणे गरजेचे असल्याचे मत (Governor) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शिवाय केवळ उत्पादन वाढून उपयोग नाही तर त्याबरोबर दर्जाही वाढणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. इगतपुरी घोटी येथील ए. एस.अ‍ॅग्री व कल्याणी वेअर हाऊसच्या भेटी दरम्यान राज्यपाल कोश्यारी बोलत होते. यावेळी त्यांनी सेंद्रीय शेतीचे क्षेत्र कसे वाढले त्याअनुशंगाने नवनवीन तंत्रज्ञान वाढवण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

कमी जागेत अधिकचे उत्पादन

ए. एस.अ‍ॅग्री समुहाने जागेचा चांगला वापर करीत सेंद्रीय शेतीवर भर दिला आहे. या समुहाने केलेले सेंद्रिय शेतीचे प्रयोग व त्यातील आधुनिक तंत्रज्ञान सामान्य शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार आहेत. दिवसेंदिवस आता क्षेत्रात घट होणार असल्याने कमी क्षेत्रात अधिकचे उत्पन्न यासाठी या समुहाने काम करण्याची गरज असल्याचेही कोश्यारी यांनी सांगितले. कमी जागेत सेंद्रिय पध्दतीने जास्त उत्पादन घेण्याचा ए. एस.अ‍ॅग्री समुहाने उभारलेला प्रकल्प उल्लेखनीय आहे. अशाच प्रकल्पांच्या माध्यमातून सामान्य शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वसमामान्य शेतकऱ्यांना व्हावा

राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान निर्माण झाले तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. याशिवाय तंत्रज्ञानाच्या शोधाचा उद्देश साध्य होणार नसल्याचेही यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी ए. एस.अ‍ॅग्री व कल्याणी वेअर हाऊसच्या प्रकल्पाच्या तीन पॉलीहाऊसला राज्यपाल यांनी भेट दिली. त्यावेळी त्या पॉलीहाऊस मध्ये उत्पादित करण्यात आलेल्या हळद, तांदूळ, केळी, फळभाज्या, मत्स्यपालन अशा विविध पिकांवर व प्रकल्पांवर करण्यात आलेल्या प्रयोगांची तेथील संचालक मंडळातील श्री. हाडोळ यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, इगतपुरीचे प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, ए.एस.अ‍ॅग्री समुहाचे मुख्य संचालक प्रशांत झाडे, साईनाथ हाडोळ, संदेश खामकर, शिरीष पारकर यांच्यासह ए. एस.अ‍ॅग्री समुहाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

ऊस बिलातून वीजबिल वसुलीचे पुन्हा संकेत, शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, काय म्हणाले सहकार मंत्री ?

Cotton : शेतकऱ्यांना मिळाला पांढऱ्या सोन्याचा आधार, आता केवळ फरदड शिल्लक, जाणून घ्या कसा राहिला हंगाम!

स्वप्न सत्यामध्ये : शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता, 1 किलोमीटरला 24 लाख रुपये

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI