AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : बासमतीच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची आशा

गतवर्षी बासमतीच्या दरात घट झाल्याने यंदा शेतकऱ्यांनी उत्पादनच घेतले नाही. परिणामी आता दरात वाढ झाली आहे तर आवक ही कमी आहे. त्यामुळे भविष्यातही बासमती तांदळाचे भाव हे वाढणारच असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बासमती तांदळाच्या विविध जातींच्या किंमती ह्या वाढत आहेत.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : बासमतीच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची आशा
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 24, 2021 | 6:46 PM
Share

मुंबई : शेतीमालाच्या दरात कायम चढउतार हा ठरलेलाच आहे. मात्र, या दराचे परिणाम आगामी काही दिवस तरी शेतकऱ्यांवर होतातच. अगदी त्याप्रमाणेच बासमती तांदळाचे झाले आहे. गतवर्षी बासमतीच्या दरात घट झाल्याने यंदा शेतकऱ्यांनी उत्पादनच घेतले नाही. परिणामी आता दरात वाढ झाली आहे तर आवक ही कमी आहे. त्यामुळे भविष्यातही बासमती तांदळाचे भाव हे वाढणारच असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बासमती तांदळाच्या विविध जातींच्या किंमती ह्या वाढत आहेत.

हरियाणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बासमतीचे उत्पादन घेतात मात्र, यंदा परस्थिती ही वेगळी आहे. कारण बासमतीला योग्य दर मिळाला नसल्याने क्षेत्रात घट झाली आहे. तर एकरी उत्पादनही घटले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले आहे त्यांना अच्छे दिन येणार असाच अंदाज कृषितज्ञ व्यक्त करीत आहेत.

बासमतीची लागवडी घट

साधारणत: नुकसान टाळण्यासाठी शेतकरी हे बासमती तांदळाची कमी लागवड करतात आणि इतर प्रकारच्या तांदळाचे उत्पादन घेतात. यातच गतवर्षी बासमतीच्या दरामध्ये 5 ते 10 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे यंदा क्षेत्र कमी झाल्यामुळे उत्पादनही कमी झाले आहे. पण आता मागणी वाढली आहे. बसमतीला चांगला भाव मिळाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे त्यांच्यामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी भविष्यातील तोटा टाळण्यासाठी व किंमतीमध्ये सातत्य राखण्यासाठी कायदे करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. बासमती उत्पादक क्षेत्रांसाठी नियामक प्रणाली असावी जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य किंमती आणि टिकाऊ दर मिळेल असे अखिल भारतीय तांदूळ निर्यातदार संघटनेचे माजी अध्यक्ष विजय सेटिया यांनी सांगितले आहे.

बासमती तांदळाच्या किमती काय आहेत?

गेल्या वर्षी बासमतीच्या सी-30 जातींची प्रतिक्विंटल सुमारे 3500 रुपये विक्री झाली होती. पण यावेळी तो तांदुळ 4300 रुपयांवर पोहोचला आहे. सर्वात जास्त 1121 या वाणाची अधिकची लागवड केली जाते. गेल्या वर्षी या वाणाची किंमत प्रतिक्विंटल 2700 रुपयांपर्यंत खाली आली होती. परंतु यावर्षी त्यात वाढ झाली असून शेतकरी या विविध प्रकारच्या बासमतीची विक्री 4200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत करत आहेत. भाव असाच चालू राहिला तर गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीची ही भरपाई यंदा भरुन काढता येणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर उत्पादनात घट झाल्यामुळे दर वाढले नाहीत तर वाहतूकीतील निर्बंध आणि मालवाहतूकीमुळे महामारीचा परिणाम दरावर झाला आहे. अनेक राज्यामध्ये बासमती तांदळाची वाहतूकच झाली नाही त्यामुळे दर वाढले असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

संबंधित बातम्या :

बैठकीचे फलीत : सोयाबीन दराबाबत सकारात्मक निर्णय, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर होणार गुन्हे दाखल

शेळीपालन करत आहात? शेळ्यांच्या उपयुक्त चाऱ्याबद्दल जाणूनच घ्या ..!

रेशन दुकानांमध्ये 5 किलो गहू अन् तांदुळ मोफत योजना सुरुच रहाणार- मोदी सरकारचा निर्णय

Follow Us
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...