शेळीपालन करत आहात? शेळ्यांच्या उपयुक्त चाऱ्याबद्दल जाणूनच घ्या ..!

आजही जोडव्यवसाय म्हणलं की समोर येतो तो शेळीपालन. शेळीपालन व्यवसयाकडे तरुणांचा मोठा कल आहे. यामधून उत्पादनही वाढत आहे. मात्र, शेळ्यांची योग्य देखभाल होत नसल्याने अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेळ्यांना योग्य चारा योग्य वेळी देणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे शेळ्यांसाठी कोणता झाडपाला पोषक राहणार आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत.

शेळीपालन करत आहात? शेळ्यांच्या उपयुक्त चाऱ्याबद्दल जाणूनच घ्या ..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 4:50 PM

लातूर : वातावरणातील बदल आणि शासकीय धोरणे यामुळे केवळ शेती या मुख्य व्यवसयावर शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत नाही. त्याला जोड व्यवसाय हा काळाची गरजच झाला आहे. आजही जोडव्यवसाय म्हणलं की समोर येतो तो (Goat rearing) शेळीपालन. शेळीपालन व्यवसयाकडे तरुणांचा मोठा कल आहे. यामधून उत्पादनही वाढत आहे. मात्र, शेळ्यांची योग्य देखभाल होत नसल्याने अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे (fodder for goats) शेळ्यांना योग्य चारा योग्य वेळी देणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे शेळ्यांसाठी कोणता झाडपाला पोषक राहणार आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत.

शेळ्यांच्या अहारात महत्वाचा असतो तो हिरवा चारा. मात्र, बारमाही हिरवा चारा मिळणे तसे अशक्यच. त्यामुळे शेतकऱ्यांना झाडापाल्याचा आधार घ्यावा लागतो. मात्र कोणता झाडपाला चांगला, कोणता वाईट, याची माहिती शेतकऱ्यांना नसते. त्यामुळे शेत शिवारात असलेल्या झाडपाल्याचे महत्व काय याची माहीती आपण आज घेणार आहोत.

बाभूळ : बाभूळ ही सहज शेतावरच्या बांधावर आढळून येते. मात्र, शेळ्यांचा आहारात हिला अधिकचे महत्व आहे. या बाभळीचे दोन प्रकार असतात. यामध्ये छत्रीसारखी सावली देणारी आणि सरळ रेषेत वाढणारी बाभूळ, रामकाठी हे बाभळीचे झाड साधारणत: 15 ते 16 मीटर ऊंच वाढते याच झाडाचा पाला शेळ्या आवडीने खातात.

सुबाभूळ : सुबाभळीचा वापर गुरांना चारा म्हणूनही केला जातो. मात्र, या बाभळीच्या झाडांच्या पानामध्ये मायमोसीन विषारी द्रव्य असल्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त व सतत हा पाला शेळ्यांना खाऊ घातल्यास त्यांच्या अंगावरील केस गळून पडतात व त्यांची वाढ खुंटते. म्हणून शेळ्यांच्या एकूण आहाराच्या 20 व 25 टक्केच पर्यंतच सुबाभळीच्या पाल्याचा उपयोग करावा.

वेडीबाभूळ : वेडीबाभूळ ह्या बाभळीच्या शेंगा शेळ्या आवडीने खातात तर अंजन: शेळ्यांना चाऱ्याच्या दृष्टीने हा अतिशय चांगले असून, त्यापासून शेळ्यांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होतो. या वृक्षाचा पाला वाळवून त्याचा शेळ्यांना खाद्यासाठी उपयोग करता येतो.

खैर : खैराची झाडे डोंगर उतारावर, शेताच्या बांधावर आढळतात. सदैव हिरवेगार असणारे हे झाड सर्वसाधारणपणे १५ ते १६ मीटर उंच वाढते. याचा पाला शेळ्या आवडीने खातात.

सौदंड : हे दुष्काळी भागातील एक महत्वाचे झाड असून फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान जुनी पाने झडून नवीन पालवी फुटते व उन्हाळ्याच्या शेवटी याचा पाला शेळ्यांना उपयुक्त ठरतो तर बोराची पाने म्हणजे शेळ्यांचे उत्तम खाद्य आहे. याच्या पानात 13 ते 16 टक्के प्रथिने, 12टक्के तंतुमय पदार्थ व 10 ते 15 टक्के खनिज पदार्थ असतात.

शेवगा : शेवग्याचा पाला शेळ्यांना फार आवडतो. या पाल्यात शुष्क तत्वावर प्रथिने १५ टक्के, पचनीय प्रथिने १० तर एकूण पचनीय अन्नघटक ६० टके आढळतात. तर हादगा हे मध्यम आकाराचे झाड असून शेंगा व पाने शेळ्यांना खाद्य म्हणून वापरता येतात. चाऱ्यासाठी 1 ते 1.5 मीटर उंचीवर दर चार महिन्यांनी झाडाची तोड करावी लागते. पानामध्ये 5 ते 7 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

ग्लिरिसिडीया किंवा गिरीपुष्प : हा मध्यम उंचीचा वृक्ष असून त्यामध्ये क्षारांचे प्रमाण चांगले असते. ह्याचा पाला किंचित सुकवून शेळ्यांच्या आहारात वापरता येतो. यामुळे शेळ्यांची वाढ तर होतेच पण हा पोषक आहार असल्याने त्याचे वेगळे महत्व आहे.

संबंधित बातम्या :

रेशन दुकानांमध्ये 5 किलो गहू अन् तांदुळ मोफत योजना सुरुच रहाणार- मोदी सरकारचा निर्णय

भाजीपाल्याची आवक घटली दर वाढले, बाजारावर नियंत्रण नसल्याने किरकोळ विक्रेत्यांची चांदी

सोयाबीनबाबत शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांचा सल्ला, दर वाढीमागचे गणितही कळाले

Non Stop LIVE Update
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.