खतांवरील अनुदान कसं मिळणार?, DAP खत 1200 रुपयांना कसं मिळवायचं? ही कागदपत्रं आवश्यक

केंद्र सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वी डाई अमोनिया फॉस्फेट (डीएपी) खतावरील अनुदान वाढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. fertilizer subsidy on DAP

खतांवरील अनुदान कसं मिळणार?, DAP खत 1200 रुपयांना कसं मिळवायचं? ही कागदपत्रं आवश्यक
इफको
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 10:41 AM

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वी डाई अमोनिया फॉस्फेट (डीएपी) खतावरील अनुदान वाढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या निर्णयानुसार डीएपीच्या 50 किलोच्या एका पोत्यावरील अनुदान 700 रुपयांनी वाढवून 1200 करण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं डीएपीवरील अनुदान वाढवल्यानं शेतकऱ्यांना डीएपी 1200 रुपयांना उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. (how to get fertilizer subsidy on DAP given by central government for farmers )

अनुदानावरील डीएपी खत कसं मिळवायचं

शेतकऱ्यांना डीएपी खरेदी करण्यासाठी 1200 रुपये द्यावे लागतील. डीएपी खरेदी करताना शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड किंवा शेतकरी कार्डची प्रत द्यावी लागणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचे ठसे द्यावे लागतील. त्यानंतर केंद्र सरकार संबंधित कंपनीच्या खात्यात अनुदान जमा करेल. केंद्र सरकार एका पोत्यामागं 1211 रुपये कंपन्यांना अनुदान देणार आहे. डीएपीवरील अनुदानासाठी केंद्र सरकार 14 हजार 775 रुपये खर्च करणार आहे.

अनुदान का वाढवलं?

डीएपी आणि पीएंडके या खतांवरील अनुदानात वाढ केल्याची अधिसूचना 20 मे रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार वाढवण्यात आलेलं अनुदान 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. यानुसार, 2411 रुपयांचं डीएपीचं एक पोत 1200 रुपयांना शेतकऱ्यांना मिळेल. केंद्र सरकारनं डीएपीवरील सबसिडी 140 टक्के वाढवल्याचं म्हटलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे आखाती देशांनी डीएपी खताच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्चा मालाची किंमत वाढवल्यानं डीएपी खताच्या किंमती वाढल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. खतांच्या वाढत्या किंमतीवरुन शेतकरी आक्रमक झाल्यानंतर केंद्र सरकारनं डीएपी आणि पीएंडके खतावरील सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेतला.

19 मे रोजी अनुदान देण्याचा निर्णय

डीएपी खतासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम प्रत्येक बॅगेमागे 500 रुपयांवरून थेट 140 टक्‍क्‍यांनी वाढून 1200 रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय 19 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. त्यापूर्वी त्यांनी उच्च स्तरीय बैठक घेतली होती. DAP च्या आंतरराष्ट्रीय बाजारभावांमध्ये वाढ झाली असली तरी ती केवळ 1200 रुपयांच्या जुन्या दराने देण्याचा निर्णय घेतला गेला. केंद्र सरकारनेही दरवाढीचा संपूर्ण भार सोसावा, असा निर्णय घेण्यात आला होता.आतापर्यंत प्रति बॅग अनुदानाचे प्रमाण एकाच वेळी कधीही वाढविण्यात आले नाही. मागील वर्षी डीएपीची वास्तविक किंमत प्रति बॅग 1,700 रुपये होती.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी! मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; DAP वर आता 500 नव्हे, तर थेट 1200 रुपयांचे अनुदान मिळणार

डीएपीची 700 रुपयांनी दरवाढ, 73 वर्षात हे कधीचं घडलं नाही, हा अन्नदात्याला गुलाम करण्याचा डाव, काँग्रेसचा आरोप

how to get fertilizer subsidy on DAP given by central government for farmers

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.