बदलत्या हवामानात असं करा पिकांचे संरक्षण, अन्यथा होईल मोठं नुकसान

या टिप्स अवलंबल्यास शेतकरी खराब हवामानातही आपली पिके वाचवू शकतात. थोडी काळजी घेतली आणि योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

बदलत्या हवामानात असं करा पिकांचे संरक्षण, अन्यथा होईल मोठं नुकसान
crops 1
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 8:03 PM

उष्णतेची लाट सुरू आहे. लवकरच पावसाळा सुरू होईल. या काळात वेळोवेळी पाऊस, गारपीट यांचा धोका कायम असतो. यामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त होते. खराब हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स आताच अवलंबल्या तर पिकांचे नुकसान टाळता येईल.

पिकांचे संरक्षण करण्यासाठी पाच टिप्स

1. संरक्षक आच्छादनाचा फायदा : पावसापासून वाचण्यासाठी आपण छत्री वापरतो, तसेच खराब हवामानापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी संरक्षक आच्छादन उपयोगी ठरते. हे आच्छादन फार महाग नसते. जुने कापड किंवा प्लास्टिकचा वापरही यासाठी करता येतो. या आच्छादनाने वादळ, गारपीट, दव किंवा मुसळधार पावसापासून पीक वाचवता येते. कीटकांपासून संरक्षणासाठी पॉली टनल किंवा प्लास्टिक शीट्स वापरता येतात. उष्णतेची लाट किंवा तीव्र सूर्यप्रकाशापासून बचावासाठी शेड नेटचा वापर उत्तम. शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन आच्छादनाची सामग्री निवडावी. बाजारात स्वस्त आणि टिकाऊ पर्याय उपलब्ध आहेत.

2. मल्चिंगचा वापर : उष्णतेची लाट येण्यापूर्वी पिकांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी सेंद्रिय मल्चिंग प्रभावी ठरते. पेंढा, पाने यांचा वापर मल्चिंगसाठी होतो. ही सामग्री आहे. पिकांच्या आसपास पेंढा किंवा पाने पसरवल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो. मल्चिंगमुळे तण वाढण्याचाही धोका कमी होतो. बाजारात मल्चिंग शीट्स उपलब्ध आहेत. या शीट्स पिकांवर पसरवून मुसळधार पाऊस किंवा उष्णतेपासून पिकांचे रक्षण करता येते. मल्चिंगसाठी स्थानिक पेंढा किंवा गवताचा वापर केल्यास खर्च कमी होतो. सेंद्रिय मल्चिंगमुळे जमिनीची सुपीकता वाढते.

3. पाण्याचे व्यवस्थापन : पावसाळा जवळ येत आहे. पिकांना योग्य प्रमाणात पाणी फायदेशीर ठरते. पण जास्त पाणी साचल्याने पिके सडतात. पाने आणि मुळे खराब होतात. यापासून बचावासाठी शेतात पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था आवश्यक आहे. उष्णतेमुळे पीक सुकत असेल तर ठिबक सिंचाई तंत्राचा अवलंब करावा. पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेतात खड्डे खणता येतात. हे पाणी गरज पडल्यास वापरता येते. ठिबक सिंचनासाठी सरकारकडून अनुदान मिळते.

4. हवामानाला अनुकूल वाण : आजकाल हवामानाला अनुकूल शेतीला प्राधान्य आहे. पारंपरिक वाण आता टिकणार नाहीत. विज्ञानाने प्रगती केली आहे. संशोधनातून हवामानाला अनुकूल बीजे आणि रोपवाटिका तयार झाल्या आहेत. अशी बीजे दुष्काळ, कीटक, पूर आणि उष्णता यांना प्रतिरोधक असतात. ही बीजे थोडी महाग असली तरी त्यापासून हमखास उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठे किंवा विश्वसनीय कंपन्यांकडूनच अशी बीजे खरेदी करावीत. यामुळे फसवणुकीचा धोका टळेल.

5. पीक विमा योजना : वर सांगितलेल्या उपायांबरोबर पीक विमा योजनेचा अवलंब करावा. नुकसानापासून वाचण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. याशिवाय राज्य सरकारच्या स्वतंत्र योजना आहेत. यात शेतकऱ्याला फार कमी रक्कम भरावी लागते. उरलेली रक्कम सरकार भरते. पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळते. यासाठी क्लेम करावा लागतो. तपासणीनंतर विमा कंपनी भरपाई देते. शेतकऱ्यांनी विमा योजनेची माहिती घेऊन वेळेत अर्ज केला आर्थिक जोखीम कमी होईल.