मराठवाड्यातील आठही प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’, पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचाही प्रश्न मिटला

| Updated on: Sep 11, 2021 | 12:02 PM

मराठवाड्यात गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला असला तरी अनियमित पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सद्य:स्थितीला मराठवाड्यातील आठही प्रकल्प हे पाण्याने भरलेली आहेत. त्यामुळे पिण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे.

मराठवाड्यातील आठही प्रकल्प ओव्हर फ्लो, पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचाही प्रश्न मिटला
Manjra Dam
Follow us on

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्याची ओळख तशी दुष्काळी जिल्हे म्हणूनच आहे. परंतू, गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला असला तरी अनियमित पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सद्य:स्थितीला मराठवाड्यातील आठही प्रकल्प हे पाण्याने भरलेली आहेत. त्यामुळे पिण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे.

मराठवाड्यातील उस्मानााबाद, लातुर, बीड जिल्ह्यातील नागरिकांना कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस होत असल्याने शेती सिंचनाचेही अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत. उलट अधिकच्या पावसाने यंदा तर खरिपातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात जायकवाडी, मांजरा, निम्न तेरणा ही मोठी धरणे आहेत. यामध्ये औरंगाबादला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरणात 53.50 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्यात सबंध मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला होता. परिणामी, महत्वाचे आठही प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.

जायकवाडीमुळे औरंगाबादचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. तर उस्मानाबाद, लातुर आणि बीड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण हे 88 टक्के भरलेले आहे. त्यामुळे या तीनही जिल्ह्याचा पाणीप्रश्न हा मिटलेला आहे. दरवर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातले चित्र बदलते यंदा सप्टेंबर महिन्यातच सर्वकाही हिरवेगार झाले असून या परिसरातील धबधबे ओसंडून वाहत आहेत तर मराठवाड्याने जणू काही हिरवा शालू पांघरलेला आहे असे चित्र पाहवयास मिळत आहे.

अशी आहे मराठवाड्यातील प्रकल्पांची स्थिती

मराठवाड्यात सिंचनाच्या दृष्टीने आठ प्रकल्प महत्वाचे आहेत. यामध्ये माजलगाव धरण 94 टक्के, उस्मानाबाद, लातुर आणि बीडच्या सीमेवर असलेले मांजरा धरण 88 टक्के, निम्न दुधना 96 टक्के, येलदरी 100 टक्के, सिध्देश्वर 97 टक्के, पेनगंगा 96 टक्के, मानार 100 टक्के, निम्न तेरणा 72, विष्णूपुरी 92 टक्के ही प्रकल्पांची स्थिती आहे.

गतवर्षी उद्योग क्षेत्राला लागले होता ब्रेक

अनियमित पावसाचा परिणाम येथील शेती क्षेत्रवरच नाही तर उद्योग व्यवसयांवरही होता. दोन वर्षापुर्वी मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे लातुरसह बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली होती. मांजरा धरणातील पाणी हे केवळ पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले होते. परिणामी येथील उद्योगांना पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने काही काळ उद्योग व्यवसायाला ब्रेक लागले होते.

रब्बीतील पिकांनाही मुबलक पाणी

पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असते तरी रब्बी हंगामात ऐन गरजेच्या प्रसंगी पाणी मिळणार आहे. शिवाय मांजरा नदीकाठचा परिसर हा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. यंदा या शेती क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे. in-marathwada-eight-project-are-overflow-drinking-and-agriculture-water-supply-issue-solved

इतरही बातम्या :

ठाकरे सरकार स्थिर की अस्थिर?; संजय राऊत म्हणतात, विरोधकांना मनोमन खात्री पटली

1 ऑक्टोबरपासून खर्च वाढणार, CNG आणि PNG महागणार

Nashik Weather: नाशिकमध्ये दोन दिवस मोठा पाऊस नाही, पावसाळा लांबण्याची शक्यता