Weather Forecast : दिल्लीत पाणी तुंबलंय.. महाराष्ट्रात पुढच्या चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार, IMD कडून अलर्ट जारी

देशाची राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नवी दिल्लीत पाणी तुंबल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आजही नवी दिल्लीत सुरु असलेल्या पावसानं पाणी तुंबल्याचं समोर आलं आहे.

Weather Forecast : दिल्लीत पाणी तुंबलंय.. महाराष्ट्रात पुढच्या चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार, IMD कडून अलर्ट जारी
दिल्लीत पाणी तुंबलं

मुंबई: देशाची राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नवी दिल्लीत पाणी तुंबल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आजही नवी दिल्लीत सुरु असलेल्या पावसानं पाणी तुंबल्याचं समोर आलं आहे. तर, भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं मुसळधार पाऊस होऊ, शकतो, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.

दिल्लीत पाणी कुठं तुंबलं?

राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवासंपासून सातत्यानं जोरदार पाऊस पडतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या निवासस्थानी पाणी शिरल्याचं समोर आलं होतं. आज संततधार पावसामुळं दिल्लीच्या विविध भागाता पाणी तुंबल्याचं समोर आलं आहे. प्रामुख्यानं मोती बाग आणि आर के पुरम या भागात पावसाचं पाणी तुंबल्याची छायाचित्र एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रकाशित केली आहेत.

महाराष्ट्रात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामुळे राज्यात येत्या 4, 5 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळं ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत.

रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

12 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं रविवारी रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अ‌ॅलर्ट तर, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

13 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, नंदूरबार, भंडारा आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

14 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

इतर बातम्या:

Ratnagiri Rain | दापोलीच्या इतिहासातील थैमान घालणारा पाऊस, चिपळूणमध्येही 16 तासापासून मुसळधार, सतर्कतेचा इशारा

PHOTOS : महाराष्ट्रात पावसाचं थैमान, ढगफुटी, पूर, दरडी कोसळल्या, घर-दुकानातही पाणी, पाहा फोटो

Weather Forecast water lodging in New Delhi due to rain IMD issue heavy rain fall during next four days for Maharashtra

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI