PHOTOS : महाराष्ट्रात पावसाचं थैमान, ढगफुटी, पूर, दरडी कोसळल्या, घर-दुकानातही पाणी, पाहा फोटो

मुसळधार पावसाने औरंगाबादमध्ये थैमान घातलंय. औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात फसल्या आहेत. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झालाय. अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे.

1/12
मुसळधार पावसाने औरंगाबादमध्ये थैमान घातलंय.

2/12
संग्रहित.
संग्रहित.
3/12
दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात फसल्या आहेत.

4/12
दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झालाय.
दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झालाय.
5/12
अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे.

6/12
जोरदार पावसानंतर औरंगाबादमधील भिलदारी पाझर तलाव फुटलाय. यानंतर नागद परिसरात भीषण पूर आलाय. पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी बाहेर काढले. नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात हा प्रकार घडला.

7/12
जळगावातील चाळीसगावातही जोरदार पावसाने नद्यांना महापूर आला आहे

8/12
त्यामुळे अनेक घरं, दुकानं पाण्याखाली गेली आहेत.

9/12
तीतूर डोंगरी नदीच्या उगमस्थानावरील कोदगाव आणि वलथाण ही धरणं भरली असून जोरदार पावसामुळे नदीला महापूर आला आहे. अनेक दुकाने पुराच्या पाण्यात वाहून गेली.

10/12
अनेक घरात पाणी शिरले. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही पुलावरुन मोठया प्रमाणावर पाणी वाहत असल्याने चाळीसगाव शहरातून औरंगाबादकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.

11/12
चाळीसगावातील पीर मुसा कादरी दर्गा, शिवाजी घाट परिसरातील अनेक दुकाने वाहून गेली. तर सदर बाजार, देवळीवाडा आणि भीमनगर भागातील भिल्ल वस्तीत अनेक घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे.

12/12
अनेक कुटुंब सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेत. तर अचानक आलेल्या पुरामुळे काही जण वाहून गेल्याची भीतीही व्यक्त होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI