Heavy Rain : मुख्यमंत्री शिंदेंचा डबल धमाका, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कमही अन् अतिवृष्टीने नुकसान झाल्यास अनुदानही, वाचा सविस्तर

पीक कर्जाचा लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी नियमित कर्ज अदा करण्यावर भर दिलेला आहे. असे असतानाही महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने जाचक नियम लावलेले आहेत. 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे.

Heavy Rain : मुख्यमंत्री शिंदेंचा डबल धमाका, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कमही अन् अतिवृष्टीने नुकसान झाल्यास अनुदानही, वाचा सविस्तर
शेतकऱ्या्ंना प्रोत्साहनपर रक्कम आणि अतिवृष्टीने नुकसान झाल्यास भरपाईही मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 3:58 PM

मुंबई : शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊनच राज्याचा विकास साधला जाणार असल्याचे (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून सांगत आहेत. आता त्यादृष्टीने निर्णय घेण्यासही त्यांनी सुरवात केला असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जे शेतकरी घेतलेल्या कर्जाची (Regular repayment) नियमित परतफेड करीत होते त्यांना (Heavy Rain) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेलच असे नव्हते. पण यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमूलाग्र असा बदल केला आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये हे प्रोत्साहनपर तर दिलेच जाणार आहे पण अशा शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले तर ते भरपाईसाठी देखील पात्र राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली प्रोत्साहनपर रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे हे म्हणाले आहेत. शिवाय अशाप्रकारचा अध्यादेश काढण्याच्याही सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

नियमित कर्ज अदा करुनही अन्याय

पीक कर्जाचा लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी नियमित कर्ज अदा करण्यावर भर दिलेला आहे. असे असतानाही महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने जाचक नियम लावलेले आहेत. 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. मात्र, यामध्ये बदल करुन पीक कर्ज घेणारे शेतकरी अतिवृष्टीचे अनुदान घेऊ शकणार आहेत.

हे सुद्धा वाचा

आमदार अन् खासदारांच्या मागणीला यश

राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापैकी काही शेतकरी हे नियमित कर्ज अदा करीत आहेत .असे असताना त्यांनाच अतिवृष्टीने नुकासन झाले तर भरपाई नाही अशी नियमावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. अशा शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी आ. प्रकाश आबिटकर आणि खा. धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा असा अध्यादेश काढला जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रोत्साहनपर रक्कमही लवकरच जमा

गेल्या दोन ते तीन वर्षापासून नियमित कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली होती. मध्यंतरी कोरोनामुळे ते शक्य झाले नव्हते. त्यानंतर महाविकास आघाडीने यंदाच्या अर्थसंकल्पात 10 हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगितले. एवढेच नाही 1 जुलैपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार होती. तेवढ्यात सरकारच बदलले. त्यामुळे हा प्रश्न रखडलेला आहे. मात्र, लवकरच 50 हजार ही प्रोत्साहनपर रक्कम लवकरच जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.