AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soybean Market : सोयाबीनची आवक वाढली, आठवड्याच्या पहिल्या दिवशी दराचे काय?

सबंध चार महिन्याच्या हंगामात जे झाले नाही ते हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनबाबत पाहवयास मिळत आहे. आतापर्यंत दरात वाढ झाली तरी मोठ्या प्रमाणात आवक झालेली नव्हते. पण गेल्या 15 दिवासांपासून वाढत्या दराचा परिणाम हा आवक होऊ लागला आहे. गतआठवड्यात दरात घसरण झाल्यानंतर आठवडाच्या पहिल्या दिवशी सोयाबीनचे काय होणार याची उत्सुकता लागली होती. पण सोमवारी सोयाबीनची आवक तर वाढलीच पण दरही वाढले आहेत.

Soybean Market : सोयाबीनची आवक वाढली, आठवड्याच्या पहिल्या दिवशी दराचे काय?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या आवकमध्ये वाढ झाली आहे.
| Updated on: Mar 07, 2022 | 1:41 PM
Share

लातूर : सबंध चार महिन्याच्या हंगामात जे झाले नाही ते हंगामाच्या अंतिम टप्प्यात (Soybean Rate) सोयाबीनबाबत पाहवयास मिळत आहे. आतापर्यंत दरात वाढ झाली तरी मोठ्या प्रमाणात आवक झालेली नव्हते. पण गेल्या 15 दिवासांपासून वाढत्या दराचा परिणाम हा (Soybean Arrival) आवक होऊ लागला आहे. गतआठवड्यात दरात घसरण झाल्यानंतर आठवडाच्या पहिल्या दिवशी सोयाबीनचे काय होणार याची उत्सुकता लागली होती. पण सोमवारी सोयाबीनची आवक तर वाढलीच पण दरही वाढले आहेत. प्रति क्विंटलमागे सोयाबीनच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली असून 7 हजार 350 वर सोयाबीन स्थिरावले आहे तर (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 30 हजार पोत्यांची आवक झाली होती. सध्या खरिपातील सोयाबीन आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या आवकमध्ये जणूकाही स्पर्धाच लागली आहे असे चित्र आहे. मात्र, दरामध्ये सोयाबीन हेच आघाडीवर आहे.

सध्याच्या दरावर सोयाबीन स्थिरावेल

गेल्या काही दिवासांपासून सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार राहिलेला आहे. मात्र, 7 हजार 300 ते 7 हजार 400 च्या दरम्यान सोयाबीनचे दर राहिलेले आहेत. सध्या आवक वाढूनही दरावर परिणाम होत नाही. बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने दर हे स्थिर आहेत. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन बाजारपेठेत दाखल होत आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा असली तरी सोयाबीन हे सध्याच्या दरावरच स्थिरावेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.

हरभऱ्याची सर्वाधिक आवक

सध्या रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या काढणीची कामे जोमात सुरु आहेत. हरभरा खरेदी केंद्र सुरु केली असतानाही शेतकरी हे खुल्या बाजारपेठेतच विक्रीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक ही 35 हजार पोत्यांवर आहे तर 4 हजार 600 ते 4 हजार 700 चा दर मिळत आहे. सध्या हरभरा आणि सोयाबीनच्या आवकमध्ये स्पर्धा असली तरी सोयाबीनचे दर हरभऱ्याच्या तुलनेत दुप्पट आहेत.

सूर्यफुलाला 6 हजार 700 चा दर

रब्बी हंगामातील हरभरा आणि सुर्यफूलाची आवक वाढत आहे. सूर्यफुलाला प्रति क्विंटल 7 हजार 600 चा दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करीक कडधान्यावर भर दिला होता. पीक पध्दतीमधील बदलाचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

कृषी पंपावरुन रणकंदन : राज्य सरकारच्या सुल्तानी कारभारामुळेच ‘सुरज’ सारख्या शेतकऱ्याचा अस्त

Grape : सर्वकाही व्यर्थ, हंगामाच्या अंतिम टप्प्यात उत्पादनही घटले अन्…

Photo Gallery: अहो खरंच का… गायीच्या पोटी जुळ्या वासरांची जोडी, गाव म्हणतंय मारुतीरायाच्या सेवेचा प्रसाद!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.